निर्धारित मार्ग बदलून 800 देशी दारुचे बॉक्स घेऊन जाणारे दारुचे वाहन बुलडाणा एलसीबी ने पकडले

🔹2 छोटे वाहनात क्रोसिंग केले जात होते दारुचे बॉक्स
🔸बुलडाणा व मोताळा येथील ते दारू दुकानदार कोण?
बुलडाणा - (कासिम शेख)16 सेप्टेंबर)
नियम मोडत आपला निर्धारित मार्ग बदलून इतर दोन वाहनात दारूचे बॉक्स पलटी मारताना बुलडाणा एलसीबीच्या पथकाने आज 16 सप्टेंबर रोजी भादोला गावाजवळ तीन वाहने पकडले असून तीन्ही वाहन बुलडाणा ग्रामीण ठाण्यात लावण्यात आले आहे.ज्या दोन छोटे वाहनात दारूचे बॉक्स टाकले जात होते ते दारू विक्रेते कोण?बिल्टी औरंगाबाद च्या नावाने होती तर भादोला जवळ ही क्रोसिंग का केली जात होती,असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
        पोलिसांनी दिलेली माहिती अशी की देशी दारू संत्राचे 800 बॉक्स घेऊन आयशर वाहन नागपूर हुन औरंगाबाद कडे निघाला होता.सदर दारु मे.निर्मल ट्रेडर्स,सर्वे नं.211,शॉप नं.5,हरसुल सांवगी, औरंगाबाद यांच्या नावाने होता. सदर वाहनाचा निर्धारित रुट नागपुर अमरावती अकोला खामगाव चिखली जालना व औरंगाबाद असा होता मात्र खामगाव नंतर चिखली कडे ना जाता सदर वाहन बुलढाण्याच्या दिशेने निघाला व बुलढाणा ग्रामीण ठाणे हद्दीतील ग्राम भादोला जवळ सदर मोठ्या वाहनातून दोन मिनी मालवाहू वाहनात माळ पलटी मारल्या जात असताना त्या ठीकाणी बुलढाणा एलसीबीचे पीएसआय मुकुंद देशमुख, अनिल भुसारी, भरत जंगले, विजय दराडे व श्रीकांत चिंचोले पोहोचले व त्यांनी वाहनाची बिल्टी चेक केली असता त्यांच्या लक्षात आले की वाहनचालकाने आपला निर्धारित मार्ग बदललेला आहे.त्यामुळे सदर तिन्ही वाहन ताब्यात घेऊन त्यांना बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात लावण्यात आले आहे.पलटी मारलेली दारू बुलडाणा येथील 2 व मोताळा येथील एक देशी दारू दुकानावार जात असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेचा पंचनामा करून आता पुढील कारवाईसाठी अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा एलसीबीचे पीआय महेंद्र देशमुख यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget