बेलापूर (प्रतिनिधी )- शासनाने ग्राहकांच्या हिताचा विचार करुन वन नेशन वन रेशन सुरु केलेल्या योजनेचे ग्राहक पंचायतीच्या वतीने स्वागत करण्यात आले असुन या उपक्रमामुळे ग्राहकांची गैरसोय दुर होणार असल्याचे मत नाशिक विभाग ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड यांनी व्यक्त केले आहे . ग्राहक पंचायतीच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात श्रीगोड यांनी पुढे म्हटले आहे की आज पर्यत कार्डधारकाला ज्या स्वस्त धान्य दुकानाचे रेशन कार्ड असेल त्याच दुकानातून धान्य घेण्याची मूभा होता रोजगाराच्या शोधार्थ अनेक कुटुंब दुसर्या जिल्ह्यात दुसऱ्या राज्यात जात असतात त्या ठिकाणी मोल मजुरी करत असताना त्यांना रेशनकार्ड असुन देखील जादा भावाने धान्य खरेदी करावे लागत होते तीच अवस्था ऊस तोडणी कामगारांची होती ऊस तोडणी करीता हे लोक आपल गाव सोडून दुसर्या जिल्ह्यात चार पाच महीने जातात त्या वेळी त्यांना आपले हाक्काचे राशन खरेदी करता येत नव्हते या बाबीचा शासनाने गांभिर्याने विचार करुन वन नेशन वन रेशन ही योजना सुरु केली शासनाच्या या उपक्रमामुळे आता ग्राहाकाला आपल्या पध्दतीने कुठल्याही दुकानातुन आपले हक्काचे राशन घेता येणार आहे केवळ राशन घेण्याकरीता ग्राहकाला आपल्या गावी जाण्याची गरजच भासणार नाही ग्राहकाचे हित लक्षात घेवुन शासनाने घेतलेल्या निर्णयाचे ग्राहक पंचायतीचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष रणजीत श्रीगोड श्रीरामपूर तालुकाध्यक्ष गोरख बारहाते संदिप अग्रवाल रमेश चंदन अनिता आहेर सुजाता मालपाठक आदिनी स्वागत केले आहे.
Post a Comment