शासनाच्या वन नेशन वन रेशन योजनेचा श्रीरामपूरातही प्रचार आपल्या सोयीने कुठेही घ्या धान्य.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी  )-केंद्र शासनाने सुरु केलेल्या "एक देश एक रेशनकार्ड " या योजनेचा प्रचार व प्रसार व्हावा या करीता  श्रीरामपूर तहसील कार्यालय तसेच स्वस्त धान्य दुकान या ठिकाणी विशेष मोहीम राबविण्यात आली.शासनाच्या "वन नेशन वन रेशन " या योजनेंतर्गत आता रेशन कार्डधारकाला सोयी नुसार कुठल्याही धान्य दुकानात आपल्या हक्काचे धान्य खरेदी करता येणार आहे .या पूर्वी ज्या स्वस्त धान्य दुकानात संबंधित कार्डधारकाचे रेशनकार्ड होते त्याच स्वस्त धान्य दुकानातुन माल खरेदी करावा लागत होता. काही कारणास्तव कार्डधारक बाहेरगावी गेला तर पाँज मशिनवर अंगठा न देता आल्यामुळे संबधीत कार्डधारकाला अन्न धान्यापासुन वंचित रहावे लागत होते . अनेक नागरीक रोजगाराच्या शोधार्थ एका राज्यातून दुसर्या राज्यात एका जिल्ह्यातून दुसर्या जिल्ह्यात जात असत . त्या ठिकाणी रोंजदारीची कामे करत असताना त्या कुटुंबाचे रेशनकार्ड असुन देखील त्यांना चढ्या भावाने धान्य खरेदी करावे लागत होते . या बाबीचा शासनाने गांभीर्याने विचार करुन संपूर्ण भारत देशात "एक देश एक रेशनकार्ड "ही योजना सुरु करण्याची  संकल्पना सुरु केली . सुरुवातीला काही राज्यात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरु केली . या योजनेला मिळालेला प्रतिसाद पहाता आता सर्वत्र ही योजना सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला . त्या करीता जिल्हा व तालुका पातळीवर या योजनेचा प्रचार व प्रसार करण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी यांना देण्यात आल्या . अहमदनगरच्या जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी तातडीने सर्व उपविभागीय अधिकारी ,तहसीलदार यांना या योजनेची नागरीकांना माहीती देण्याच्या सूचना केल्या . त्यांच्या सुचनेनुसार श्रीरामपूर तहसील कार्यालय , तालुक्यातील धान्य दुकाने यां ठिकाणी फलकाव्दारे जनजागृती करण्यात आली उपविभागीय आधिकारी अनिल पवार, तहसीदार प्रशांत पाटील यांच्या सूचनेनुसार पुरवठा अव्वल कारकून चारुशिला मगरे , गोदामपाल शिवाजी वायदंडे , पुरवठा निरीक्षक अतुल भांगे , पुरवठा विभागाचे  शिवशंकर श्रीनाथ , धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई , लाला गदिया , नरेंद्र खरात  , माणिक जाधव, किशोर छतवाणी , दक्षता समितीचे संदीप वाघमारे यांच्या उपस्थितीत फलकाद्वारे या योजनेची माहीती लाभधारकांना देण्यात आली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget