ब्राह्मण कवयित्री व समाजसेवीकेचा मुस्लिमांकडून अंत्यसंस्कार. खऱ्या अर्थाने माणुसकीचे नाते..

पुणे सुप्रसिद्ध अंध कवयित्री व अंध जनांसाठी भरीव असे सामाजिक कार्य करणाऱ्या डॉ. प्रतिभा मोरेश्वर भोळे यांचे 1 सप्टेंबर रोजी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले. कोरोना  कालावधीमध्ये त्यांची अंत्यसंस्कार करणेदेखील दुरापास्त झाले होते. अशा वेळेला माणुसकीच्या दृष्टिकोनातून कोरोना कालावधी मध्ये काम करणाऱ्या मूलनिवासी मुस्लिम मंच या संस्थेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे डॉ. प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार पुणे वैकुंठ स्मशानभूमी येथे करून जाती-धर्माच्या भिंतींना पुण्यामध्ये थारा राहणार नाही असे उदाहरण दाखवून दिले.मराठी सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत मानाचे स्थान असणाऱ्या ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांच्या नात असणाऱ्या प्रतिभा हे अंध असल्यामुळे साहित्य क्षेत्रात मोठा संघर्ष करावा लागला होता तरी देखील आपल्या प्रतिभा आणि सातत्याच्या जोरावर त्यांनीही कवयित्री म्हणून तसेच अंध व अपंग जनांसाठी काम करणारी  स्वयंसेविका म्हणून मोठे नाव कमावले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत शासकीय व खाजगी संस्थांमार्फत विविध स्वरुपाचे पुरस्कार मिळालेले आहेत.अत्यंत मोठा मित्र परिवार व नातेसंबंधातील गोतावळा असतानाही अखेरच्या क्षणी मात्र त्यांच्या पतीशिवाय कोणी सोबत राहिले नाही. पत्नी मेल्याचे दुःख असताना अंतिम संस्कार करण्यासाठी जवळचे मित्र व नातेवाईक कोणीही उपलब्ध नसल्यामुळे भोळे यांचे पती सुनील परमार यांनी मूलनिवासी मुस्लिम मंचाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधाला यावेळी मूलनिवासी मुस्लिम मंचाने देखील  अवघ्या 20 मिनिटांमध्ये डॉक्टर भोळे यांच्या मदतीला पोहोचले सर्व आवश्यक ते सोपस्कार पूर्ण करून दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथून डेड बॉडी घेऊन पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमी येथे हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. मूलनिवासी मुस्लिम मंचं यांनी आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या चारशे पेक्षा अधिक लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहेत. यात मुस्लिम समाजा सोबतच हिंदू, ख्रिश्चन,लिंगायत,बौद्ध आदी सर्व धर्मीय लोकांचे अंतिम संस्कार केलेले आहे.जात-पात न पाहता मदत करणे हेच पुणेकरांचे वैशिष्ट्य असून सर्व मानवतावादी महापुरुषांची परंपरा पुढे चालवत आम्हीदेखील जात-धर्म विरहित काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याने आम्हाला सर्व लोकांचे सहकार्य मिळत आहे.सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर प्रतिभा भोळे यांचा अंत्यसंस्कार आमच्या हातून होणे हे आमच्यासाठी भाग्याचे लक्षण आहे.असे आम्ही मानतो अशी भूमिका मनोगत मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार व त्यांचे सहकारी साबीर शेख तोपखाना, झमीर मोमिन, मोलाना शकिल शेख,साबीर सय्यद,दानिश खान,अमजद शेख व्यक्त केली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget