Latest Post

🔹धास्तावलेल्या ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निश्वास..
बुलडाणा - 27 ऑगस्ट
तालुक्यातील देऊळघाट येथील 60 वर्षीय इसमाला श्वासनाचा त्रास होत असल्याने 4 दिवसापूर्वी  बुलडाणा येथील कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यामूळे त्यांचा मृत्यू कोरोनाने झाल्याची शक्यता व्यक्त होत असतांना, त्यांचा स्वॅब रिपोर्ट आज 27 ऑगस्टला निगेटिव्ह आला असून धास्तवलेल्या परिवारासह गावकरी व प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
     बुलडाणा जिल्ह्यातील अल्पसंख्यक बहुल गावापैकी एक देऊळघाट आहे.येथे अद्याप पर्यंत एक ही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, हे विशेष .सुरुवातीपासुनच स्थानिक ग्राम पंचायत,आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन व गावकऱ्यांनी घेतलेले निर्णय व उचलले पाऊल तसेच नियमांचे पालन केल्याने आता पर्यंत या गावात रुग्ण संख्या "नो-कोरोना" अशी आहे. जिल्ह्यात सर्वात आधी देऊळघाट ग्राम पंचायतने गावकऱ्यांची आरोग्याची काळजी घेत लॉकडाऊनच्या पूर्वी महानगरातून आलेल्या जवळपास 300 पेक्षा जास्त लोकांना होम क्वारनटाईनचे शिक्के लावून घरी बसवले होते.आता हळू हळू लॉकडाऊन मध्ये शिथिलता येत आहे. कोरोना बुलडाणा जिल्ह्यातील मोठ्या शहरासह गांव-खेड्यात जावून पोहोचला आहे.अशात काही दिवसापूर्वी देऊळघाट येथील सय्यद खलील पहेलवान (60) यांची प्रकृती बिघडली व त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना बुलडाणा येथील महिला रुग्णालयचे कोविड सेंटर मध्ये अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले.त्यांचे स्वेब नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठविन्यात आले मात्र स्वेब रिपोर्ट येण्यापूर्वीच 25 ऑगस्टला सायंकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यु झाला.माहिती मिळताच माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ,नगरसेवक पति मो.अज़हर रुग्णालयात पोहोचले प्रशासनाशी समन्वय साधुन प्रोटोकॉल प्रमाणे त्यांचे पार्थिव नातेवाईकांच्या सुपुर्द करण्यात आले. गावात कोरोना मुळे मृत्यु झाल्याची अफवा व  भितीचे वातावरण पसरले होते.शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले. मृतकाच्या चाचणी अहवालाकडे सर्वांचे लक्ष  लागले असतांना 27 ऑगस्टला सकाळी त्यांचा कोरोना अहवाल "निगेटिव्ह" आल्याने फक्त नातेवाईकच नव्हे तर गावकऱ्यांसह प्रशासनाने ही सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बुलडाणा - 26 
बुलढाणा शहरात चोरीच्या घटना वाढल्या असून 23 ऑगस्टच्या रात्री शहरातील तुळशिनगर भागातून एक मोटारसायकल चोरी गेले होते. मोटरसायकलचे मालक सचिन जुमळे यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये 24 ऑगस्ट रोजी तक्रार दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल कण्यात आला होता. या प्रकरणाचे तपास करीत डीबी ब्रांचचे मोरे व नागरे यांनी दोन संशयित युवक रामेश्वर पांडुरंग सूर्यवंशी वय 19 वर्ष तसेच सचिन जनार्दन घुले 19 वर्ष, दोन्ही रा. गायरान, सागवन यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कडून सचिन जुमळेची मोटरसायकल तसेच इतर एक असे दोन मोटारसायकल जप्त करण्यात आले आहे तसेच अजून एक मोटर सायकल त्यांनी चोरून विल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून कोर्टात हजर केले असता त्यांना 27 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली बिटजमादार बाजड करीत आहे.

बुलडाणा - 26 ऑगस्ट
बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट या गावाचे रहिवासी शिक्षक शेख रहीम शेख ऊमर वय 53 वर्ष यांचा आज 26 ऑगस्ट रोजी दुपारी शाळेत काम करत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.ते देऊळघाटचे माजी सरपंच बिस्मिल्लाह खाँ यांचे जावई होते. अत्यंत मनमिळावू व मितभाषी शिक्षक शेख रहीम हे देऊळघाट येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत कार्यरत होते. आपल्या कामाशी प्रामाणिक शिक्षक शेख रहीम आज सुटी असतानाही शाळेत जाऊन काही पेंडिंग कामे करीत असताना अचानक त्यांना जोरदार हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही वार्ता गावात पसल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी 3 मुले 1 मुलगी नातवंड असा आप्त परिवार आहे.

बुलडाणा - 26 ऑगस्ट
कोरोना बाधितांच्या संख्या दिवसागणिक वाढत आहे. बुलडाणा जिल्ह्यात एकुण 2744 कोरोना बाधित रुग्ण संख्या झाली असून सध्या 761 रुग्णांवर उपचार सुरु आहे. अशा स्थितीत बुलडाणा शहरात हायटेक कोविड रुग्णालयांसह मकबधीर विद्यालय,आयुर्वेद महाविद्यालय या 2 कोविड केअर सेंटरमध्ये कोरोना बाधितांसह संशयितांवर उपचार केले जात आहे. सर्वच डॉक्टर अहोरात्र सेवा करत, घरापासून लांब राहून आपले कर्तव्य बजावत असून हे डॉक्टर्स कोरोनाच्या कुरुक्षेत्रात समाजासाठी देवदूतच बनले  आहे.या 2 कोविड सेंटर मध्ये 10 डॉक्टरांचा चमू आळीपाळीने ड्युटी करत आहेत. एका डॉक्टरला आठ तास ड्युटी करावी लागत आहे. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन २४ ऑगस्टला बुलडाणा जिल्हाधिकारी यांनी व्हिसी द्वारे दिलेल्या निर्देशानुसार बुलडाणा इंन्सीडंट कंमाडर तथा तहसिलदार संतोष शिंदे यांनी नव्या ८२ खाजगी आयुष डॉक्टरांची ड्यूटी यादी प्रसिद्ध केली असून रुग्णसेवा आणखी सुकर होणार आहे.या बाबत तहसिलदार संतोष शिंदे म्हणाले की बुलडाणा तालुक्यातील ८२ खाजगी आयुष डॉक्टरांना अधिग्रहीत करण्यात आले असुन मुकबधिर विद्यालय व आयुर्वेदिक महाविद्यालय या २ कोवीड सेंटर येथे वेगवेगळ्या वेळेत आपली सेवा देणार असून त्यांचे ड्यूटीचे वेळ पत्रक ही ठरवून दिलेले आहे.

बुलडाणा - 25 ऑगस्ट 
बुलडाणा विधानसभा मतदार संघात शिवसेनाकडून 3 वेळ आमदार राहिलेले विजयराज शिंदे आखेर आज मुंबईत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपात दाखल झाले आहे.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचा दुप्पटा त्यांच्या गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
     विजयराज शिंदे शिवसेनेत असतांना खासदार प्रतापराव जाधव यांच्या कडून त्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याचा आरोप शिंदे यांनी पक्ष श्रेष्ठींकडे केला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विजयराज शिंदे यांचे उमेदवारीचे तिकीट कापुन खासदार प्रतापराव जाधव यांचे खंदे समर्थक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.विजयराज शिंदे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढविली. मात्र त्यांना शिवसेनेचे गायकवाड यांनी पराजित केले. त्यांनी दुसऱ्या क्रंमाकाची मते घेतली होती. अशात आपला राजकीय पुनर्वसन व्हावे म्हणून विजयराज शिंदे काही पक्षांच्या नेत्यांशी भेटत होते. आज 25 ऑगस्ट रोजी विजयराज  शिंदे यांनी भाजपा च्या शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई स्थित सागर या निवासस्थानी भाजपा मध्ये प्रवेश घेतला.यावेळी भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व जळगाव जामोदचे आ.डॉ.संजयजी कुटे,भाजपा जिल्हाध्यक्ष व खामगांव आ.एड आकाश फुंडकर, चिखली आमदार श्वेताताई महाले, बुलढाणा भाजपाचे नेते योगेंद्र गोडे सह विजयराज शिंदे यांचे काही समर्थक ही उपस्थित होते.

बुलडाणा - 25 ऑगस्ट
महावितरणच्या वतीने ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळातील वीजबिले ही अत्यंत वाढीव आणि चुकीच्या रिडींगद्वारे देण्यात आली आहेत. नेहमीपेक्षा तीप्पट तर काहींना पाचपट रकमेची बिले आल्याने ग्राहकांना धक्का बसला आहे. याबाबत सर्वसामान्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता चुकीची वीजबिले माफ करावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी लाऊन धरली आहे. यासाठी त्यांनी आंदोलनेही केले मात्र त्याउपरही कोणतीच दखल न घेतल्याने त्यांनी आक्रमक होत २४ ऑगस्टच्या सायंकाळी बुलडाणा अधीक्षक अभियंता देव्हाते यांचे कक्ष गाठले, त्यांनी चुकीची उत्तरे दिल्याने तुपकरांनी कार्यालयातच ठिय्या मांडला व तब्बल चार तास ठिय्या मांडल्यानंतर रविकांत तुपकर अधिक आक्रमक झाल्याचे पाहून अधीक्षक अभियंता यांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत आलेली संपूर्ण चुकीची वीजबिले माफ करण्याचे आश्वासन दिले आहे. तुपकरांच्या या आंदोलनामुळे हजारो सर्वसामान्य विद्युत ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. चुकीच्या वीजबिले आणि महावितरणाचा सावळा गोंधळ याबाबत माहिती देण्यासाठी रविकांत तुपकर यांनी आज 25 ऑगस्ट रोजी बुलडाणा येथील पत्रकार भवन मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.या वेळी तुपकरांनी मीटर रीडिंग, विज बिल वाटप करणाऱ्या विविध एजन्सी व महावितरणच्या अधिकाऱ्यां मध्ये साटेलोटे असल्याचा आरोप ही करत या  पुढे जर विज कनेक्शन कट करायला एमएसईबीचा कोणी अधिकारी आला तर त्याला कपडे काढून नागडा फटके देऊ,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्य मंत्री रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

बुलडाणा - 24 ऑगस्ट
बुलडाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे आपला राजकीय पुनर्वसन करण्याच्या तैयारीत असून ते भाजपची वाट धरणार असल्याची जोरदार चर्चा बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात रंगू लागली असून उद्या 25 ऑगस्ट रोजी ते भाजपात आपले काही कार्यकर्त्यां सोबत प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
      भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी विजयराज शिंदे यांचे बोलणेही झाल्याचे समजते. याबाबत विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की मला नेहमी भरभारुन साथ देणारे व माझी ताकत असलेले माझे कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे लवकरच बुलडाण्याच्या राजकारणात भूकंप घडणार आहे .1995 पासून तब्बल तीन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर  निवडून येवून बुलडाणा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांचे शिवसेना पक्षवाढीत खूप मोठे योगदान आहे.शिवसेनेचे शाखाप्रमुख ते आमदार,जिल्हा प्रमुख असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचा विजयरथ रोखला होता.शिवसेनेचे बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव यांच्याशी असलेल्या मतभेदांमुळेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शिवसेने कडून उमेदवारी मिळाली नव्होती व त्यांचे कट्टर राजकीय विरोधक संजय गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली होती.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तिकीट कापल्याने विजयराज शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बुलडाणा विधानसभा मतदार संघातुन निवडणूक लढवत दुसर्‍या क्रमांकाची मते घेतली मात्र त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गायकवाड आमदार झाले आहे.आता आपला राजकीय पुनर्वसन व्हावा म्हणून विजयराज शिंदे आता भाजपाच्या वाटेवर असून उद्या मुंबई येथे त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget