Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी) सध्या सर्वत्र कोरोनाच्या महामारी ने थैमान घातले असून प्रत्येक गावात आणि शहरात को रोना रुग्णांची संख्या वाढत आहे . त्यामुळे सर्वसामान्य लोक हवालदिल झाले आहेत . शासकीय लॅब मध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर लागत असल्यामुळे खाजगी लॅबला शासनाने परवानगी दिली . मात्र गेल्या काही दिवसातील त्यांचे अहवाल हे विश्वसनीय वाटत नसल्याने लोक संभ्रमात सापडले आहेत . येवल्याचे आमदार दराडे बंधू यांच्या घरात दोन दिवसात दोन वेगवेगळे अहवाल आल्याने आमदारांची ही कथा तर सर्वसामान्यांची कोण ऐकणार व्यथा अशा प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहेत . आमदार नरेंद्र दराडे यांच्यासह कुटुंबातील लोक येवला येथे पॉझिटिव्ह दाखवण्यात आले . दुसऱ्या दिवशी त्यांनी स्वतःची मुंबईमध्ये चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली .नंतर त्यांनी मुंबईचे लॅबवाले येवल्याला पाठवून आपल्या कुटुंबीयांची पुन्हा चाचणी केली असता ती देखिल निगेटिव्ह आली . म्हणजे दोन दिवसात दोन प्रकारचे रिपोर्ट प्राप्त झाल्याने राज्यांमध्ये तो एक चर्चेचा विषय झाला आहे . एकाच घरामध्ये दोन आमदार असल्याने त्यांचा जनसंपर्क दांडगा असून सर्व शासकीय यंत्रणा दिमतीला असताना अशा पद्धतीने संभ्रमीत करणारे रिपोर्ट येत असतील तर सामान्य लोकांची काय कथा आणि त्यांनीकुणाला सांगायचे आपल्या व्यथा अशी अवस्था लोकांची झाली आहे . खासगी रुग्णालयात  इलाज करण्यासाठी मोठा खर्च येतो . त्याचबरोबर शासकीय अहवाल उशिरा येत असल्याने लोक खाजगी लॅबमध्ये स्त्राव चाचणी करीत आहेत . परंतु तेथून मिळणारे रिपोर्ट मात्र धक्कादायक असतात . कोणताही त्रास नसताना पॉझिटिव अहवाल ही एक नित्याची बाब झाली आहे . मात्र असे अहवाल आले तरी लोकांनी घाबरून न जाता या कोरोनाचा मुकाबला करावा असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी केले आहे . बरेचसे रुग्ण हे केवळ भीतीनेच गर्भगळीत होऊन मृत्यूला सामोरे जात आहेत . तेव्हा कोरोना रोगाची विनाकारण कोणीही भीती बाळगू नये . अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी योग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत . न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा . असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे .
                                                          *श्रीरामपुरात वैद्यकीय गोंधळ*
 शहर आणि तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये कोरोना रुग्ण सापडत असले तरी त्यांची नेमकी संख्या किती हा महत्त्वाचा प्रश्न गेले चार दिवस तालुक्यात चर्चिला जात आहे . कारण तालुका वैद्यकीय अधिकारी व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या तिघांमध्ये कोणताही ताळमेळ नसल्याने तसेच खासगी अहवाल वेळेत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे पोहोचत नसल्याने आकडेवारीमध्ये तफावत दिसून येत आहे . कोरोना रुग्णाच्या संख्येबाबत शहरात मोठ्या प्रमाणावर अफवांचे सुद्धा पीक आले असून या भागात दोन लोकांना कोरोना झाला, त्या भागात चार लोकांना कोरोना झाला अशा कपोलकल्पित चर्चा आहे त.
*नागरी आरोग्य केंद्र म्हणजे असून ताप नसून संताप*
नगरपालिके मार्फत चालवले जाणारे नागरी आरोग्य केंद्र म्हणजे सरकारी दवाखाना ही सध्या शोभेची वस्तू बनली आहे. एकेकाळी नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्याचा मोठा नावलौकिक होता. त्या ठिकाणी महिलांचे बाळंतपण, आवश्यक तपासण्या, छोटे ऑपरेशन केले जात होते. मात्र सध्या अशा कोणत्याही सुविधा येथे उपलब्ध नाही. फक्त लहान मुलांचे लसीकरण करण्याचे काम या ठिकाणी होते. गर्भवती महिलांना बाळंतपणासाठी शिरसगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचा रस्ता धरावा लागतो. मात्र शहरापासून लांब असल्याने बरेच लोक त्या ठिकाणी जाणे टाळतात. नगरपालिकेने स्वतःचे सुसज्ज असे सरकारी रुग्णालय उभारावे. त्याचबरोबर त्याचा विस्तार शहराच्या इतर भागातही करावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे. इतर प्रश्नांवर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आरडाओरडा करणारे नगरसेवक सरकारी दवाखान्याच्या प्रश्नावर मात्र गप्प आहेत. याबाबतही शहरातील जनतेत नाराजीची अशी भावना दिसून येत आहे .

बेलापूर  (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली असुन विनाकारण  तसेच मास्क न लावता फिरणार्या दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे. बेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे लग्न अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे  लोक विनाकारण मास्क शिवाय गावात फिरत आहेत बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की रमेश नामदेव होले हा बेलापूर बु!!बेलापूर बायपास येथे एम एच 17 बी एच 57 या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे राहणार दत्त नगर हा हीरो होंडा मोटार सायकल एम एच 17 जे 6627 वर विना मास्क विनाकारण फिरताना आढळून आला पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे   बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असुन कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )- आरोग्य सेवका प्रमाणे स्वस्त धान्य दुकानदाराचा मृत्यू कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे झाल्यास त्यांनाही विमा कवच मिळावे या बाबत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनने दाखल याचीकेवर चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश मुंबई  उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय आहुजा यांनी  शासनाला दिले आहे .   कोरोना योध्दा म्हणून सेवा देताना वैद्यकीय अधीकारी आरोग्य सेवक पोलीस होमगार्ड अंगणवाडी सेविका कर्मचारी  लेखा व कोषागरे अन्न व नागरी पुरवठा इत्यादी विभागातील  कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यास ५० लाख रुपये विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने मार्च महीन्यात घेतला होता हे विमा कवच राज्यात अन्न धान्य वितरण करणारे स्वस्त धान्य दुकानदार यांना लागू असल्याचे शासनाने अद्याप पर्यत घोषीत केलेले नाही त्यामुळे आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  बाबुराव ममाणे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर यांनी संघटनेच्या वतीने याचीका दाखल केली होती संघटनेच्या वतीने दाखल याचिकेत असे म्हटले होते की ही संघटना राज्यातील ५५ हजार स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रतिनीधीत्व करत असुन कोरोना मुळे शासनाने घोषीत केलेल्या लाँक डाऊनच्या काळात लोकांना अन्न धान्य पुरविण्याचे जबाबदारीचे  काम हे राज्यातील धान्य दुकानदार करत होते  धान्य वाटपाचे काम हे अत्यावश्यक सेवेमध्ये येते धान्य वाटप करत असताना दुकानदाराचा दिवसभरात १०० हुन अधिक कार्डधारकाशी प्रत्यक्ष संपर्क येतो  दुकानदार समुह संसर्गाच्या टप्प्यात पोहोचल्याने दुकानदारांच्या जिवीतास धोका वाढला आहे हे काम करत असताना कोरोनाची बाधा झाल्यामुळे काही दुकानदारांना आपला जिव गमवावा लागला आहे कोरोना सकट काळात सेवा देणार्या त्या दुकानदारांचे कुटुंब उघड्यावर पडले आहे या बाबत शासनाकडे वेळोवेळी मागणी करुन निवेदन देवुनही काहीही उपयोग झाला नाही त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना विमा सुरक्षा कवच देण्याचे निर्देश देण्यात यावेत असेही याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती  नितीन जामदार व न्यायमूर्ती अभय अहुजा यांचे समोर सुनावाणी झाली त्या वेळी सरकारी वकीलांनी हा शासनाचा धोरणात्मक निर्णय असल्याने अंतिम निर्णय घेण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली त्या वेळी चार आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायमूर्ती नितीन जामदार व न्यायमूर्ती  अभय आहुजा यांनी देत यांचिका निकाली काढली आँल  महाराष्ट्र  फेअर प्राईज शाँपकिपर्स  फेडरेशनच्या वतीने प्रसिध्द विधीज्ञअँड सुधाकर आव्हाड व अँड चेतन नागरे यांनी काम पाहीले तर शासनाच्या वतीने अँड रुपाली शिंदे यांनी काम पाहीले.

श्रीरामपूर  (प्रतिनिधी )-शिवसेना नेते सदा कराड हे बिबट्याच्या हल्ल्यात गंभिर जखमी झाले असुन नशिबाने साथ दिल्यामुळे ते थोडक्यात बाचले          शिवसेनेचे नेते सदा कराड हे सायंकाळी मोटारसायकलवरुन अशोकनगर येथे आपल्या  घरी जाण्यासाठी  निघाले असता बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली ते स्वतः मोटारसायकल चालवत होते त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे  नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात वाचले   त्यांच्या हाताला मोठी जखम झाली आहे झडप घालुन बिबट्या पसार झाला त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले

अहमदनगर  (प्रतिनिधी  )- शेवगाव तालुक्यातील दुकानदारावर द्वेषभावनेतुन केलेली कारवाई मागे घ्यावी या करीता करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगीत केले असल्याचे संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .या बाबत सविस्तर असे की तीन महीन्यापूर्वी लाँक डाऊन असताना  शेवगाव तालुक्यातील कुठल्याही कार्डधाराकांची तक्रार नसताना हेतूपूरस्पर काही दुकानाची तपासणी करण्यात आली दुकान तपासणीत साठा रजिस्टर प्रमाणे साठा आढळून आला असतानाही काही कारण नसताना दहा दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला त्यातील काही दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर पाच दुकानावर कडक कारवाई करुन दुकाने सील करण्यात आली व काहीही कारण नसताना ती दुकाने इतरत्र जोडून देण्यात आली १२ नोव्हेंबर च्या शासकीय आदेशा प्रमाणे दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असताना या दुकानदारांना संधी न देता कारवाई करण्यात आली तसेच एकाच प्रकारच्या गुन्ह्याकरीता एकाच अधीकार्याकडून वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारची दंडनीय कारवाई समर्थनीय नसल्याचा शासन निर्णय असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन पाच दुकानावर सुडबुध्दीने व द्वेषभावनेतुन करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा दिनांक २३ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा ईशारा देण्यात आला होता परंतु शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पासुन सुरु करण्यात येणारे उपोषण स्थगीत करण्यात येत असल्याचे कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे प्रकाश गजभिय मनिषा साळवे ओमप्रकाश कवडे यांनी कळविले आहे.

श्रीरामपूर- नुकताच इयत्ता १२वी कला शाखेचा निकाल जाहीर झाला असून येथील रावबहादूर नारायणराव बोरावके (आर.बी.एन.बी.) कला महाविद्यालयात अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा ७९.००७ गुण संपादन करुन महाविद्यालयात तीसरा आला आहे,
अरबाज अकबर आदमाने (खाटीक) हा स्व. मोहम्मद अली खाजाभाई आदमाने (खाटीक) यांचा नातू असून त्यास प्राचार्य के.एच.शिंदे (सर), वर्गशिक्षक पवार (सर) यांचे मार्गदर्शन लाभले आहे,त्याने संपादन केलेल्या या यशाबद्दल खाटीक समाज सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

श्रीरामपूर   (प्रतिनिधी  )-  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल  मे व जुन या तीन महीन्यासाठी मोफत वितरीत करण्यात आलेल्या तांदुळाचे प्रति क्विंटल दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन धान्य दुकानदारांना लवकरच मिळणार असुन जिल्ह्यातील १८८२ दुकानदारांना मार्जिन पोटी जवळपास साडेचार कोटी रुपये मिळणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे. देशात आलेल्या कोरोनाचा गोर गरीबांना  मुकाबला करता यावा या करीता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ  मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकाना मार्फत ७२५५८ अंत्योदय शिधापत्रीका धारक व ४६५९४० प्राधान्य कुटुंब शिधापत्रीका धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदळाचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकानदारा मार्फत अंत्योदय कार्डधारकांना ५२६५. ५१मेट्रीक टन व प्राधान्य  कुटुंब लाभार्थी कार्डधारकांना ३११९५ .४३ मेट्रीक टन असे एकुण ३६४६१.९४ मेट्रीक टन तांदळाचे वाटप करण्यात आले होते कोरोनांच्या जिवघेण्या संकट काळात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी जिव मुठीत धरुन शासकीय नियमांचे पालन करुन कार्डधारकाना मोफत तांदळाचे वाटप केले हे करत असाताना काही दुकानदारांना कोरोनाची लागण झाली त्यात त्यांचा मृत्यू  झाला  त्यामुळे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर  सचिव बाबुराव ममाणे गणपतराव डोळसे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर व नगर जिल्हा  संघटनेने मोफत तांदूळ वाटपाचे दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन देण्यात यावे धान्य दुकानदारांना विमा संरक्षक मिळावे त्यांची आरोग्य तपासणी केली जावी  अशी मागणी केली होती त्या नुसार राज्यातील दुकानदारांना मार्जिन पोटी १ अब्ज,३६ कोटी ४२ लाख ५१ हजार ११०रुपये मिळणार आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील १८८२ धान्य वितरण करणार्या धान्य दुकानदारांना ५ कोटी ४६ लाख ९२ हजार ९०९ रुपये मार्जिन पोटी मिळणार आसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे दुकानदारांना मोफत तांदळाचे मार्जिन  मिळवुन दिल्याबद्दल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन  बाबर बाबुराव ममाणे मुबारक मौलवी विजय गुप्ता नितीन पेंटर गणपत डोळसे निवृत्ती कापसे देविदास देसाई मिनाताई कळकुंबे रज्जाक पठाण आदिंचे सुरेश उभेदळ सुरेश कोकाटे विश्वासराव जाधव विजय दिघे गजानन खाडे गणपत भांगरे ज्ञानेश्वर वहाडणे बाबा कराड मोहीते कैलास बोरावके विजय गायकवाड रावसाहेब भगत खताळ बजरंग दरंदले चन्द्रंकात झुरंगे मणीक जाधव नरेंद्र खरात आदिंनी अभिनंदन केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget