अहमदनगर (प्रतिनिधी )- शेवगाव तालुक्यातील दुकानदारावर द्वेषभावनेतुन केलेली कारवाई मागे घ्यावी या करीता करण्यात येणारे उपोषण तूर्त स्थगीत केले असल्याचे संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे .या बाबत सविस्तर असे की तीन महीन्यापूर्वी लाँक डाऊन असताना शेवगाव तालुक्यातील कुठल्याही कार्डधाराकांची तक्रार नसताना हेतूपूरस्पर काही दुकानाची तपासणी करण्यात आली दुकान तपासणीत साठा रजिस्टर प्रमाणे साठा आढळून आला असतानाही काही कारण नसताना दहा दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला त्यातील काही दुकानावर दंडात्मक कारवाई करण्यात आली तर पाच दुकानावर कडक कारवाई करुन दुकाने सील करण्यात आली व काहीही कारण नसताना ती दुकाने इतरत्र जोडून देण्यात आली १२ नोव्हेंबर च्या शासकीय आदेशा प्रमाणे दुकानदारांना म्हणणे मांडण्याची संधी देणे आवश्यक असताना या दुकानदारांना संधी न देता कारवाई करण्यात आली तसेच एकाच प्रकारच्या गुन्ह्याकरीता एकाच अधीकार्याकडून वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या प्रकारची दंडनीय कारवाई समर्थनीय नसल्याचा शासन निर्णय असताना सर्व नियम धाब्यावर बसवुन पाच दुकानावर सुडबुध्दीने व द्वेषभावनेतुन करण्यात आलेली कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा दिनांक २३ जुलै पासुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषणास बसण्याचा ईशारा देण्यात आला होता परंतु शहर व जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज पासुन सुरु करण्यात येणारे उपोषण स्थगीत करण्यात येत असल्याचे कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे प्रकाश गजभिय मनिषा साळवे ओमप्रकाश कवडे यांनी कळविले आहे.
Post a Comment