बेलापूर (प्रतिनिधी )- सध्या कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता बेलापूर पोलीसांनी कडक पावले उचलली असुन विनाकारण तसेच मास्क न लावता फिरणार्या दोन व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहीती पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे यांनी दिली आहे. बेलापूर व परीसरात कोरोनाचा हळूहळू फैलाव सुरु झाला आहे त्याचे एकमेव कारण म्हणजे लग्न अंत्यविधी व बाहेर गावहुन येणारे पाहुणे यांचा संपर्क वाढल्याने परिसरात कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे लोक विनाकारण मास्क शिवाय गावात फिरत आहेत बेलापूर पोलीसांनी विनाकारण मास्क न लावता दोन जणावर कारवाई केली आहे पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हाटले आहे की रमेश नामदेव होले हा बेलापूर बु!!बेलापूर बायपास येथे एम एच 17 बी एच 57 या मोटार सायकलवर मास्क न लावताच फिरत होता तसेच विशाल पांडूरंग दिवे राहणार दत्त नगर हा हीरो होंडा मोटार सायकल एम एच 17 जे 6627 वर विना मास्क विनाकारण फिरताना आढळून आला पोलीसांनी दोघावरही भारतीय दंड संहिता कलम 188 व 269 नुसार कारवाई केली आहे बेलापूर पोलीसांनी गावात व परिसरात रात्रीच्या गस्त बरोबरच दिवसाही गस्त सुरु केली आहे काही ठिकाणी विनाकारण फिरणाराला उठबशा तर काहींना दंडूक्याचा प्रसाद मिळत असल्यामुळे सायंकाळी पाच नंतर गावात सामसुम दिसू लागली आहे ग्रामस्थांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असुन कोरोनाचा प्रसार थांबावयाचा असेल तर काही कडक नियम करावेच लागणार असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे
Post a Comment