श्रीरामपूर (प्रतिनिधी )- पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत माहे एप्रिल मे व जुन या तीन महीन्यासाठी मोफत वितरीत करण्यात आलेल्या तांदुळाचे प्रति क्विंटल दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन धान्य दुकानदारांना लवकरच मिळणार असुन जिल्ह्यातील १८८२ दुकानदारांना मार्जिन पोटी जवळपास साडेचार कोटी रुपये मिळणार असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे. देशात आलेल्या कोरोनाचा गोर गरीबांना मुकाबला करता यावा या करीता पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असलेल्या कार्डधारकांना प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकाना मार्फत ७२५५८ अंत्योदय शिधापत्रीका धारक व ४६५९४० प्राधान्य कुटुंब शिधापत्रीका धारकांना प्रति व्यक्ती पाच किलो तांदळाचे वाटप करण्यात आले जिल्ह्यातील १८८२ धान्य दुकानदारा मार्फत अंत्योदय कार्डधारकांना ५२६५. ५१मेट्रीक टन व प्राधान्य कुटुंब लाभार्थी कार्डधारकांना ३११९५ .४३ मेट्रीक टन असे एकुण ३६४६१.९४ मेट्रीक टन तांदळाचे वाटप करण्यात आले होते कोरोनांच्या जिवघेण्या संकट काळात जिल्ह्यातील सर्व दुकानदारांनी जिव मुठीत धरुन शासकीय नियमांचे पालन करुन कार्डधारकाना मोफत तांदळाचे वाटप केले हे करत असाताना काही दुकानदारांना कोरोनाची लागण झाली त्यात त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर सचिव बाबुराव ममाणे गणपतराव डोळसे विजय गुप्ता मुबारक मौलवी नितीन पेंटर व नगर जिल्हा संघटनेने मोफत तांदूळ वाटपाचे दिडशे रुपये प्रमाणे मार्जिन देण्यात यावे धान्य दुकानदारांना विमा संरक्षक मिळावे त्यांची आरोग्य तपासणी केली जावी अशी मागणी केली होती त्या नुसार राज्यातील दुकानदारांना मार्जिन पोटी १ अब्ज,३६ कोटी ४२ लाख ५१ हजार ११०रुपये मिळणार आहे त्यात अहमदनगर जिल्ह्यातील १८८२ धान्य वितरण करणार्या धान्य दुकानदारांना ५ कोटी ४६ लाख ९२ हजार ९०९ रुपये मार्जिन पोटी मिळणार आसल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे दुकानदारांना मोफत तांदळाचे मार्जिन मिळवुन दिल्याबद्दल राज्य फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर बाबुराव ममाणे मुबारक मौलवी विजय गुप्ता नितीन पेंटर गणपत डोळसे निवृत्ती कापसे देविदास देसाई मिनाताई कळकुंबे रज्जाक पठाण आदिंचे सुरेश उभेदळ सुरेश कोकाटे विश्वासराव जाधव विजय दिघे गजानन खाडे गणपत भांगरे ज्ञानेश्वर वहाडणे बाबा कराड मोहीते कैलास बोरावके विजय गायकवाड रावसाहेब भगत खताळ बजरंग दरंदले चन्द्रंकात झुरंगे मणीक जाधव नरेंद्र खरात आदिंनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment