बुलडाणा - 22 जुलै
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापुर शहरा जवळ एका गोदामात खामगांव अतिरिक्त पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने धाड टाकली. मात्र गुटखा व रेशन धान्याची तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलीसाने का फरार केले?या सर्वसामान्य जनतेच्या मनात पडलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री व बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या गौडबंगालची स्वतंत्र चौकशी लावली तर कोणाचे हात "ओले-ओले" झाले हे स्पष्ट होणार आहे.
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरु असतांना केवळ राज्यातच नव्हे तर अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या बुलडाणा जिल्ह्यात ही मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा सर्वत्र नाकेबंदी असतांना वाहना द्वारे संपूर्ण जिल्हाभरात पोहोचवले जात असल्याचा आरोप होत आहे. या लॉकडाउनचा फायदा उचलत गुटखा माफियांनी जास्त दराने विक्री करुन बेहिशोब कमाई केल्याची चर्चा आहे.मलकापुर जवळ 14 जुलैला एका गोदामावर खामगांव एएसपी यांच्या पथकाने धाड टाकल्या नंतर लाखोंचा प्रतिबंधित गुटखा व रेशनचा धान्य जप्त केला व त्या ठीकाणी तस्कर अतिकुर रहमान हजर असतांना फक्त गुटखा व रेशन धान्य जप्त करण्यात आले. य माला सोबत त्या तस्कराला ही ताब्यात का घेण्यात आले नाही?
त्याला कोणी व का सोडून दिले?काही तडजोड करुन त्याला घटनास्थळावरुन फरार करण्यात आले का?या सर्व प्रश्नांचे उत्तर सद्या अनुत्तरित आहे.रेशन धान्यची काळाबाजारी व प्रतिबंधित गुटखा विक्री अश्या दोन प्रकरणात आरोपी तस्कर "अतीक" विरुद्ध मलकापुर शहर ठाण्यात 2 गुन्हे दाखल करण्यात तर आले मात्र आरोपी आहे तरी कुठे?त्याला अटक करण्यात आली का? या बाबीवर कर्तव्यदक्ष अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी स्वता: लक्ष देऊन चौकशी करावी व आपल्या कर्तव्यता जाणूनबुजुन कसूर करून एका तस्कराला फरार करणाऱ्यांना समोर आणले पाहिजे, अशीही चर्चा उघडपणे होत आहे.
Post a Comment