दोन वर्षापासुन फरार असलेल्या खुनाचे गुन्ह्यातील आरोपीस अटक.


श्रीरामपूर (प्रतिनीधी) दि. ०२/०३/२०१८ रोजी १७/०० वा.सुमारास हुसैननगर फकिरवाडा श्रीरामपुर येथे जागेच्या वादातुन आम्हाला जागा घ्यायची होती ती तुम्ही का घेतली असं म्हणून व आमचे विरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद का दिली असे म्हणुन १० लाख रुपये खंडणी मारगीतली व तलवारीने, लोखंडी गज,लाकडो दांडक्यांनी व चाकुने मारहाण करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन मयत साजीद इब्राहीम मिर्झा याचा खुन केला वगैरे फियादी वरुन श्रीरामपुर शहर पोस्टे गु.र.नं. ७३/२०१८ भादविकलम ३०२,३०७, ३८७,४५२,१४३ १४७,१४८,१४९,४२७, १२०(ब), २०१, २१२,२२५ सह आम अँक्ट ४/२५ प्रमाणे दाखल आहे.
सदरचा गुन्हा घडलेपासुन गुन्ह्यातील आरोपी नामे निलेश अशोक शिंदे वय ३५ वर्षे रा. स्वप्ननगरी,वार्ड नं. १, श्रीरामपूर हा स्वत:चे अस्तित्व लपवुन फरार झालेला होता व तो श्रीरामपुर येथे त्याचे घरी येणार असल्याची गोपनीय
माहीती मिळाल्याने स्वप्ननगरी, वॉर्ड नं. १,श्रोरामपुर भागात सापळा लावून शिताफीने ताब्यात घेतले असुन त्यास गुन्ह्यात
अटक केली असुन त्याची पोलीस कस्टडी घेवून तपास करत आहोत. सदरची कारवाई मा.श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, मा. डॉ.दिपाली काळे, अपर
पोलीस अधिक्षक,श्रीरामपुर व मा.श्री.राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभाग यांचे सुचना व 
मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह तपास पथकाचे पोहेकों/ जालिंदर लोंढे,
पोकॉ/ महेंद्र पवार, पोकॉ/ अर्जुन पोकळे, पोकॉ/ सुनिल दिघे, पोकॉ/ पंकज गोसावी, पोकों/ किशोर जाधव, पोकॉ/ गणेश
गावडे, पोकॉ/संतोष दरेकर यांनी केली आहे.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget