चिचोंडी पाटील येथे बनावट गायछाप तंबाखूचे कारखान्यावर छापा, ३,११,६००/-रु. किं. चा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

दि. २०/०७/२०२० रोजी श्री. दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना
गोपनिय बातमीदारांकडून माहीती मिळाली कि, चिचोंडी पाटील गावचे शिवारात, चिोंडी पाटील ते पिंपळा जाणारे रोडवर एका पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये इसम नामे नदीम जहीर खान उर्फ शेख, रा. मुकुंदनगर, अ.नगर हा त्याचे हस्तकामार्फत गाय छाप तंबाखूचे अधिकृत चिन्ह व पॅकींगचे साहित्य वापरुन बनावट गाय छाप तंबाखूच्या पुड्या
विक्री करण्याचे उद्देशाने तयार करीत आहेत. अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने सदरची माहीती गाय छाप तंबाखूचे
अधिकृत उत्पादक मालपाणी ग्रुप, संगमनेर व फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री. संकल्प नंदकिशोर लाहोटी, रा. आश्वी बुद्रुक,ता- संगमनेर यांना कळविली. त्यांनी सदरची माहीती त्यांचे कंपणीस कळविल्यानंतर फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर यांनी त्यांना मिळालेल्या माहीतीनुसार कार्यवाही करणेयायत लेख त्यानंतर पोनि दिलीप पवार, स्थानिक गुन्हे शाख, अहमदनगर यांनी त्यांचे पथकातील सफी/नानेकर. पोहेकॉ/मनोहर गोसावी, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना रविन्द्र कर्डीले, सचिन आडबल, संतोष लोढे, विजय ठोंबरे, चालक पोना/भरत बुधवंत अशांनी मिळून दोन पंच व फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री.
संकल्प लाहोटी यांचेसह चिचोंडी गावचे शिवारातील चिचोंडी पाटील ते पिंपळा जाणारे रोडवर जावून सदर ठिकाणी
शेतामध्ये असलेल्या पोल्ट्री फार्मचे शेडमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी एक इसम गायछापचे चिन असलेल्या कागदी पुड्यामध्ये तंबाखू भरत असताना दिसला. त्यांस ताब्यात घेवून त्यांस पोलीस स्टाफची पंचाची ओळख सांगून त्यांस त्याचे नांव, पत्ता विचारले असता त्याने त्याचे नांव, पत्ता १) जब्बार शमशुद्दीन शेख, वय-३० वर्षे, रा. जुना मुकुंदनगर, अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. सदर पोल्ट्री फार्मची झडती घेतली असता सदर ठिकाणी गाव छाप तंबाखूचे प्रत्येकी २० पुडे असलेल्या प्लॅस्टीकच्या पांढन्या रंगाच्या एकूण ३९ गोण्या, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले, गाय छाप तंबाखूचे पुडे पॅकींग करण्याचे फिक्कट विटकरी रंगाचे एकूण १००० नग कागद, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले. तंबाखूचे पुढे पॅकींग करण्यासाठी लागणारा लोखंडी पत्र्याचा साचा. दोन वजन काटे, सुट्या तंबाखूच्या प्रत्येकी ३० किलो वजनाच्या प्लॅस्टीकच्या एकूण चार गोण्या. तंबाखू गोणी पॅकींगचे इलेक्ट्रीक मशिन, गाय छाप तंबाखूच्या रिकाम्या कागदी पुड्या, त्यावर गाय छाप तंबाखूचे चिन्ह असलेले. तंबाखूचे पुडीवर लावण्याचे कागदी लेबल. त्यावर गाय छाप मार्क असलेले. असा एकूण ३,११,६००/-रु. गाय छाप तंबाखूचा बनावट माल मिळून आल्याने तो पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेली तंबाखू व पैकीग साहीत्य कोठून आणलेले आहे या बाबत ताब्यात घेतलेल्या
इसमाकडे विचारपूस केली असता त्याने सदरची तंबाखू व जप्त करण्यात आलेले साहीत्य हे २) नदीम जहीर खान
उर्फ शेख, रा. मुकुंदनगर, अ.नगर याचे असल्याचे सांगीतले. इसम नामे जब्बार शमशुद्दीन शेख, वय-३० वर्षे, रा.
जुना मुकुंदनगर, अहमदनगर यांस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह नगर तालूका पो.स्टे. ला हजर करण्यात
आले असून सदर बाबत गाय छाप तंबाखूचे उत्पादक फास्ट्रॅक पॅकर्स प्रा. लि. संगमनेर चे अधिकृत प्रतिनिधी श्री.
संकल्प नंदकिशोर लाहोटी, वय- २६ वर्षे, (डेपो मॅनेजर, गायछाप तंबाय, अहमदनगर शहर), रा. आश्वी बुदूकता- संगमनेर यांनी नगर तालूका पो. स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुरनं. I ३६०/२०२०, भादवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४६९, ४७२, ४७५ सह कॉपी राईट अॅक्ट कलम ७ प्रमाणे दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही नगर तालूका पो.स्टे. करीत आहेत. सदरची कौतुकास्पद कामगीरी ही मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. डॉ. श्री. सागर पाटील साहेब, अपर पोलिस अधीक्षक, अहमदनगर व श्री. अजित पाटील साहेब, उप विभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget