Latest Post

बुलडाणा - 9 जून
8 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मका खरेदी करण्यासाठी आदेश दिलेले असतांना बुलडाणा जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठेही मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. याबाबत दिनांक प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही  मका खरेदी सुरु झाले नसल्याने आज 9 जून रोजी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकन्यांच्या हितासाठी ठियया आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला आहे.
    बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजाराच्या वर शेतकन्यांनी मका हमीभाव केंद्रात मका देण्यासाठी नोंदणी केलेली आहे . मका नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एकाच सेंटर असल्याने जिल्हा भरात अनेक मका उत्पादक शेतकरी असतांना केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नोंदणी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी पासून वंचित राहावे लागले आहे .शासनाने खरेदी केलेल्या तूर , हरभरा , कापूस याचे पैसे मिळालेले नाही . मका घरात असूनही शासन खरेदी करीत नाही आणि खुल्या बाजारात मकाला किंमत नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता तातडीने हमीभावाने मका खरेदी करण्यात यावी . शासनाने खरेदी केलेल्या कापूस , तूर , हरभरा याचे पैसे शेतकन्याच्या खात्यात जमा करा . पीककर्जाचे वाटप जलद गतीने करा .नोंदणी केलेल्या शेतकन्यांची राहिलेली तूर , हरभरा तात्काळ घेण्यात यावे .अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आमदार श्वेता महाले यांनी देत शासकीय धोरणचा निषेध व्यक्त करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.या वेळी आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संक्रापूर  ( प्रतिनिधी  )- पाच सहा गावातील नागरीकांना जाण्यासाठी एका शेतकऱ्यांने आपल्या शेतातून रस्ता करुन दिला असुन फुटभर बांधावरुन एकमेकाची डोकी फोडणार्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.गळनिंब तालुका श्रीरामपूर येथुन संक्रापूर येथे जाण्याकरीता प्रवरा नदीवरील  बंधार्या रुन जावे लागते परंतु बधार्या लगत गळनिंब येथील पोपटराव गाडेकर यांची शेत जमीन आहे याच शेत जमीनीतून संक्रापूर आबी दवणगाव अंमळनेर गंगापुर येथील नागरीकांना कसे बसे  वाट काढत जावे लागत होते या बाबत संक्रापूरचे सरपंच रामा पांढरे यांनी पोपटराव गाडेकर यांची भेट घेवुन आपल्या जमीनीतून रस्ता करुन देण्याची विनंती केली पाच सहा गावातील नागरीकांची गैरसोय लक्षात घेता सरपंच पांढरे याच्या मागणीला शेतकरी गाडेकर यांनी लगेच संमती दिली कसलाही गाजावाजा न करता गाडेकर यांनी आपल्या शेतातून चार चाकी वाहन जाईल ईतका रस्ता करुन देण्यास संमती दिली गाडेकर यांची संमती मिळताच सरपंच पांढरे यांनी तातडीने जे सी बी आणला पत्रकार देविदास देसाई  सुभाष जगताप रोहीदासा खपके सुभाष दाते ईब्राहीम शेख राजु चिंधै गंगा भोसले कैलास जाटे संदीप वडीतके गोरख वडीतके यांच्या उपस्थितीत रस्ता तयार करण्यात आला कच्चा मातीचा आसणार्या या रस्त्यावर आता लोकवर्गणीतून मुरुम टाकला जाणार आहे पाच सहा गावातील नागरीकांना जाता येताना त्रास होत होता शेतकरी गाडेकर यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे व सरपंच रामा पांढरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील नागरीकांनी गाडेकर व पांढरे यांना धन्यवाद दिले आहे .

श्रीरामपूर - येथील बैतुशशिफा हाँस्पिटल व अल-आफाक फौडेशन चे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात रमजान व कोरोना ,कोविड१९ विषयी अतिविशेष सामाजिक जनजागृती वर महिनाभर अतिउत्तम प्रतिपद्धतीने " ईसलाम समजुन घेताना " ही ३० लेखाची सर्व धार्मियांना समजेल आशी लेख मालिका लिहीली .त्याचबरोबरीने corona,covid वर जानजाग्रुती उत्तम प्रकारे केली ,
मागील १९९९  पासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दैनिक पेपर्स मधून डॉ. सलीम शेख हे आपल्या आभ्यासु लेखातून सामाजिक ,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील आपले बहुमुल्य योग दान देऊन सर्व समाजात ईसलाम धर्माविषयी गैरसमज दुर व्हावे व ईसलाम विषयी चांगली माहिती सर्व धार्मिय लोकांपर्यंत पोहचवावी   म्हणून सलग महीनाभर ३० लेख व स्वतः रोजे ठेवून व आपले वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व उत्तम प्रकारे पारपाडुन ईसलाम समजुन घेताना ही लेख विविध दैनिक पेपर्सच्या  व सोशल मेडीयाच्या माध्यमातून सर्व स्थरातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले .यावर्षी हि अगदी उत्तम प्रकारे दैनिक राष्ट्र सह्याद्री या दैनीकातून केले. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यभरातुन त्यांचे विविध स्थरातुन कौतुक होत आहेत व विविध सामाजिक संघटना कडून त्यांचे अभिनंदन व विशेष सत्कार होत आहेत 
आशिच सामाजिक बांधीलकी जपणारे डॉ सलीम यांचा श्रीरामपूर शहरातील सामाजिक संघटनेचे "मिल्लत-ऐ-ईब्राहीम '
व" संविधान बचाव संघटना " यांच्या वतीने अध्यक्ष अहमदभाई जाहागीरदार ,हाजी साजिदभाई  मिर्जा, आदिलभाई मखदुमी ,राजूभाई दारूवाला ,हाजी ऐजाजभाई दारूवाला व ईकबाल ईसमाईल काकर सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर. डॉ. सलीम यांनी दिले की जो चांगले काम करील त्या सर्वांचे असेच हिम्मत व ऊर्जा देत राहा व धण्यवाद दिले.

बुलडाणा - 7 जून
काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने एका खोलीत साठवून ठेवलेला शासकिय वितरन प्रणालीचा तांदुळ पोलीसाने पकडला.ही कार्यवाही 6 जून रोजी सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टिन पत्र्याच्या गोडावुन वर करण्यात आली.या कार्यवाहीत 1 लाख 62 हजार 180 रुपयाचा माल जप्त करण्यात आला तर 3 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही बुलडाणा ग्रामीण पोलिसने केली आहे.
       बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे गस्तीवर असतांना त्यांना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह 6 जून रोजी सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टिन पत्र्याच्या गोडावुनवर धाड टाकली.तेथे शासकिय वितरण प्रणालीचा तांदुळ काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवुन ठेवलेले आढळून आले. याठिकाणी अ‍ॅटो चालक दिलदार जिलानी शहा (38) रा. धोत्रा भनगोजी ता. चिखली, अ‍ॅपे चालक सरदारशहा तुराबशहा (29) रा. वरवंड, हे शासकिय प्रणालीचा तांदुळ काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करतांना मिळून आले. यावेळी गोडावूनची पाहणी केली असता पांढऱ्या रंगाचे पोत्यांमध्ये साठवीलेले तांदुळ मिळून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या जवळ कोणतेही कागदपत्र नसुन सदर तांदुळ हा  संजय ढोले रा. दुध डेअरी जवळ चिखली यांच्या सांगण्यावरुन गावागावात जावून लोकांकडून हा विकत घेऊन तांदुळ गोडावूनमध्ये साठवितो.बुलडाणा ग्रामीणचे पोनी सारंग नवलकार व तहसिलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली.यावेळी त्यांनी नायब तहसिलदार शाम भांबळे, पुरवठा निरीक्षक भिमराव जुमडे हे घटनास्थळी जावून तपासणी केली असता सदर तांदुळ शासकिय वितरण प्रणालीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोडावूनमध्ये ठेवलेले तांदुळाचे 103 पोते एकूण वजन 46 क्विंटल 12 किलो भरले. त्याची बाजार भावाने एकुण किंमत 69 हजार 180 रुपये व तांदुळाची साठवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेला एक लाल रंगाचा जुना माल वाहु अ‍ॅपे क्र. एम.एच. 20ए.टी.5883 अंदाजे किंमत 50 हजार व एक जुना काळ्या रंगाचा प्रवासी अ‍ॅपे एम.एच.20 सी.एस 1427 अंदाजे किंमत 40 हजार रुपये यासह इलेक्ट्रीक काटा किंमत 3 हजार रुपये असा एकूण 1 लाख 62 हजार 180 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. यावरुन आरोपी दिलदार शाह जिलानी शाह (38), सरदार शाह तुराब शाह (29) यांना अटक करण्यात आली आहे. तर संजय ढोले हा पसार झाला आहे. उपरोक्त तिन्ही आरोपी विरुध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियमनचे कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे करीत आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपूर तालुक्यात सर्वात मोठी असणार्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असुन या सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांनी केली असुन या मागणीमुळे सत्ताधार्यांना घरचाच आहेर मिळाला आहे. बेलापूर भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायतीत जनता अघाडी व विकासा अघाडी यांची सत्ता आहे ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीत अनेक गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्या असुन ग्रामपंचायतीने अंगणवाडी करीता तीन लाख रुपयाची खेळणी ई परचेसींग न करता सदस्यांची मंजुरी न घेताच खरेदी केली  तसेच पाण्याच्या टाकीवर बसविण्यात आलेल्या सि सि टिव्हीच्या कामाचे दोन महीन्याच्या अंतराने दोन वेगवेगळी बिले अदा केली केवळ ई निविदा टाळण्यासाठी दोन बिले दाखविण्यात आली तसेच काही महीन्यापूर्वी खरेदी केलेला संगणक सदस्यांनी विचारणा करताच अचानक कसा अवतरला मग तो संगणक कुणाच्या घरी होता अंगणवाडी करीता खरेदी केलेले साहीत्य कुणाच्या जागेत ठेवण्यात आले याची चौकशी करण्यात यावी सध्या लाँक डाऊन असताना बी-१निवीदा करुन गावात निकृष्ट दर्जाची कामे सुरु आहे ग्रामपंचायतीने १५% मागासवर्गीय निधीपासुन खर्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले असुन मागास वर्गीयांच्या नावावर दुसर्यांनाच वाटप केले आहे तसेच अंपगांच्या नावाखाली अनेकांना लाभ देण्यात आलेला आहे मयत असणार्या व्यक्तीना लाभ देण्यात आलेला आहे या सर्व बाबी अतिशय गंभीर असुन सविस्तर चौकशी करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी डावरे यांनी केली आहे.

बेलापूर  (प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशसनाने बेलापूरातील एका ठिकाणी छापा टाकुन साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन बेलापूर हे गुटखा अन मटका केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे.या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी मुळे हे पंच शकुर जब्बार शेख अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के जी गोरे सुर्यवंशी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदिसह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले त्या वेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच १८ए ए ६४५० ही आरोपी मदन विजय कणगरे घेवुन जात असताना सदर गाडी अडवुन चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात  ६० हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ९० हजार रुपयांचा राँयल  तंबाखू व टेम्पो असा ४ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन पोलीसांनी मुद्देमाल वाहन जप्त केले आहे                         शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बेलापूर गावात गुटखा अन मटका जोरात चालु होता अनेकाचा गुप्त आशिर्वाद या व्यवसायाला मिळत असल्यामुळे हा व्यवसाय खुले आम सुरु होता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटक्याच्या अहारी जावुन मटका खेळत आहे काही महीन्यापूर्वीही एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाली होती त्याही प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती इतक्या दिवस खुलेआम विकल्या जाणार्या गुटख्याची खबर अचानक कशी लागली  रात्री एक वाजता आलेले पथक चार वाजेपर्यंत  बेलापूरातील पढेगाव रोडवरील त्या ठिकाणी थांबले असल्याची चर्चा असुन केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे गुटख्या प्रमाणे बेलापूर गावात मटकाही जोमात चालु असुन त्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आनेक गोर गरीब लोक दिवसभर कष्ट करुन तो पैसा मटक्यात लावत आहे बेलापूर गाव हे मटका व गुटखा मूक्त करावे अशी मागणी केली जात आहे

बेलापूर  (प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशसनाने बेलापूरातील एका ठिकाणी छापा टाकुन साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन बेलापूर हे गुटखा अन मटका केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे                                    या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी मुळे हे पंच शकुर जब्बार शेख अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के जी गोरे सुर्यवंशी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदिसह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले त्या वेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच १८ए ए ६४५० ही आरोपी मदन विजय कणगरे घेवुन जात असताना सदर गाडी अडवुन चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात  ६० हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ९० हजार रुपयांचा राँयल  तंबाखू व टेम्पो असा ४ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन पोलीसांनी मुद्देमाल वाहन जप्त केले आहे                         शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बेलापूर गावात गुटखा अन मटका जोरात चालु होता अनेकाचा गुप्त आशिर्वाद या व्यवसायाला मिळत असल्यामुळे हा व्यवसाय खुले आम सुरु होता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटक्याच्या अहारी जावुन मटका खेळत आहे काही महीन्यापूर्वीही एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाली होती त्याही प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती इतक्या दिवस खुलेआम विकल्या जाणार्या गुटख्याची खबर अचानक कशी लागली  रात्री एक वाजता आलेले पथक चार वाजेपर्यंत  बेलापूरातील पढेगाव रोडवरील त्या ठिकाणी थांबले असल्याची चर्चा असुन केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे गुटख्या प्रमाणे बेलापूर गावात मटकाही जोमात चालु असुन त्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आनेक गोर गरीब लोक दिवसभर कष्ट करुन तो पैसा मटक्यात लावत आहे बेलापूर गाव हे मटका व गुटखा मूक्त करावे अशी मागणी केली जात आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget