बेलापूर (प्रतिनिधी )- श्रीरामपूर तालुक्यात सर्वात मोठी असणार्या बेलापूर ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या असुन या सर्व प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करण्याची मागणी भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांनी केली असुन या मागणीमुळे सत्ताधार्यांना घरचाच आहेर मिळाला आहे. बेलापूर भाजपाचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की बेलापूर ग्रामपंचायतीत जनता अघाडी व विकासा अघाडी यांची सत्ता आहे ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीत अनेक गंभीर बाबी चव्हाट्यावर आल्या असुन ग्रामपंचायतीने अंगणवाडी करीता तीन लाख रुपयाची खेळणी ई परचेसींग न करता सदस्यांची मंजुरी न घेताच खरेदी केली तसेच पाण्याच्या टाकीवर बसविण्यात आलेल्या सि सि टिव्हीच्या कामाचे दोन महीन्याच्या अंतराने दोन वेगवेगळी बिले अदा केली केवळ ई निविदा टाळण्यासाठी दोन बिले दाखविण्यात आली तसेच काही महीन्यापूर्वी खरेदी केलेला संगणक सदस्यांनी विचारणा करताच अचानक कसा अवतरला मग तो संगणक कुणाच्या घरी होता अंगणवाडी करीता खरेदी केलेले साहीत्य कुणाच्या जागेत ठेवण्यात आले याची चौकशी करण्यात यावी सध्या लाँक डाऊन असताना बी-१निवीदा करुन गावात निकृष्ट दर्जाची कामे सुरु आहे ग्रामपंचायतीने १५% मागासवर्गीय निधीपासुन खर्या लाभार्थ्यांना वंचित ठेवले असुन मागास वर्गीयांच्या नावावर दुसर्यांनाच वाटप केले आहे तसेच अंपगांच्या नावाखाली अनेकांना लाभ देण्यात आलेला आहे मयत असणार्या व्यक्तीना लाभ देण्यात आलेला आहे या सर्व बाबी अतिशय गंभीर असुन सविस्तर चौकशी करुन कठोर कारवाई करावी अशी मागणी डावरे यांनी केली आहे.
Post a Comment