काळ्या बाजारात जाणारा रेशनचा तांदूळ पकडला, 1 लाख 62 हजारचा माल जप्त,3 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल.

बुलडाणा - 7 जून
काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने एका खोलीत साठवून ठेवलेला शासकिय वितरन प्रणालीचा तांदुळ पोलीसाने पकडला.ही कार्यवाही 6 जून रोजी सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टिन पत्र्याच्या गोडावुन वर करण्यात आली.या कार्यवाहीत 1 लाख 62 हजार 180 रुपयाचा माल जप्त करण्यात आला तर 3 आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कार्यवाही बुलडाणा ग्रामीण पोलिसने केली आहे.
       बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे गस्तीवर असतांना त्यांना खबऱ्यामार्फत गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकासह 6 जून रोजी सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टिन पत्र्याच्या गोडावुनवर धाड टाकली.तेथे शासकिय वितरण प्रणालीचा तांदुळ काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी अवैधरित्या साठवुन ठेवलेले आढळून आले. याठिकाणी अ‍ॅटो चालक दिलदार जिलानी शहा (38) रा. धोत्रा भनगोजी ता. चिखली, अ‍ॅपे चालक सरदारशहा तुराबशहा (29) रा. वरवंड, हे शासकिय प्रणालीचा तांदुळ काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करतांना मिळून आले. यावेळी गोडावूनची पाहणी केली असता पांढऱ्या रंगाचे पोत्यांमध्ये साठवीलेले तांदुळ मिळून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या जवळ कोणतेही कागदपत्र नसुन सदर तांदुळ हा  संजय ढोले रा. दुध डेअरी जवळ चिखली यांच्या सांगण्यावरुन गावागावात जावून लोकांकडून हा विकत घेऊन तांदुळ गोडावूनमध्ये साठवितो.बुलडाणा ग्रामीणचे पोनी सारंग नवलकार व तहसिलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली.यावेळी त्यांनी नायब तहसिलदार शाम भांबळे, पुरवठा निरीक्षक भिमराव जुमडे हे घटनास्थळी जावून तपासणी केली असता सदर तांदुळ शासकिय वितरण प्रणालीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोडावूनमध्ये ठेवलेले तांदुळाचे 103 पोते एकूण वजन 46 क्विंटल 12 किलो भरले. त्याची बाजार भावाने एकुण किंमत 69 हजार 180 रुपये व तांदुळाची साठवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेला एक लाल रंगाचा जुना माल वाहु अ‍ॅपे क्र. एम.एच. 20ए.टी.5883 अंदाजे किंमत 50 हजार व एक जुना काळ्या रंगाचा प्रवासी अ‍ॅपे एम.एच.20 सी.एस 1427 अंदाजे किंमत 40 हजार रुपये यासह इलेक्ट्रीक काटा किंमत 3 हजार रुपये असा एकूण 1 लाख 62 हजार 180 रुपये किंमतीचा माल जप्त करण्यात आला. यावरुन आरोपी दिलदार शाह जिलानी शाह (38), सरदार शाह तुराब शाह (29) यांना अटक करण्यात आली आहे. तर संजय ढोले हा पसार झाला आहे. उपरोक्त तिन्ही आरोपी विरुध्द जिवनावश्यक वस्तु अधिनियमनचे कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनाखाली बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे करीत आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget