श्रीरामपूर - येथील बैतुशशिफा हाँस्पिटल व अल-आफाक फौडेशन चे अध्यक्ष डॉ. सलीम सिकंदर शेख यांनी पवित्र रमजान महिन्यात रमजान व कोरोना ,कोविड१९ विषयी अतिविशेष सामाजिक जनजागृती वर महिनाभर अतिउत्तम प्रतिपद्धतीने " ईसलाम समजुन घेताना " ही ३० लेखाची सर्व धार्मियांना समजेल आशी लेख मालिका लिहीली .त्याचबरोबरीने corona,covid वर जानजाग्रुती उत्तम प्रकारे केली ,
मागील १९९९ पासून दरवर्षी कोणत्या ना कोणत्या दैनिक पेपर्स मधून डॉ. सलीम शेख हे आपल्या आभ्यासु लेखातून सामाजिक ,शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील आपले बहुमुल्य योग दान देऊन सर्व समाजात ईसलाम धर्माविषयी गैरसमज दुर व्हावे व ईसलाम विषयी चांगली माहिती सर्व धार्मिय लोकांपर्यंत पोहचवावी म्हणून सलग महीनाभर ३० लेख व स्वतः रोजे ठेवून व आपले वैद्यकीय क्षेत्रातील कर्तृत्व उत्तम प्रकारे पारपाडुन ईसलाम समजुन घेताना ही लेख विविध दैनिक पेपर्सच्या व सोशल मेडीयाच्या माध्यमातून सर्व स्थरातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य केले .यावर्षी हि अगदी उत्तम प्रकारे दैनिक राष्ट्र सह्याद्री या दैनीकातून केले. त्यांच्या या कार्याबद्दल राज्यभरातुन त्यांचे विविध स्थरातुन कौतुक होत आहेत व विविध सामाजिक संघटना कडून त्यांचे अभिनंदन व विशेष सत्कार होत आहेत
आशिच सामाजिक बांधीलकी जपणारे डॉ सलीम यांचा श्रीरामपूर शहरातील सामाजिक संघटनेचे "मिल्लत-ऐ-ईब्राहीम '
व" संविधान बचाव संघटना " यांच्या वतीने अध्यक्ष अहमदभाई जाहागीरदार ,हाजी साजिदभाई मिर्जा, आदिलभाई मखदुमी ,राजूभाई दारूवाला ,हाजी ऐजाजभाई दारूवाला व ईकबाल ईसमाईल काकर सर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला .
सत्काराला उत्तर. डॉ. सलीम यांनी दिले की जो चांगले काम करील त्या सर्वांचे असेच हिम्मत व ऊर्जा देत राहा व धण्यवाद दिले.
Post a Comment