संक्रापूर ( प्रतिनिधी )- पाच सहा गावातील नागरीकांना जाण्यासाठी एका शेतकऱ्यांने आपल्या शेतातून रस्ता करुन दिला असुन फुटभर बांधावरुन एकमेकाची डोकी फोडणार्यांपुढे एक आदर्श ठेवला आहे.गळनिंब तालुका श्रीरामपूर येथुन संक्रापूर येथे जाण्याकरीता प्रवरा नदीवरील बंधार्या रुन जावे लागते परंतु बधार्या लगत गळनिंब येथील पोपटराव गाडेकर यांची शेत जमीन आहे याच शेत जमीनीतून संक्रापूर आबी दवणगाव अंमळनेर गंगापुर येथील नागरीकांना कसे बसे वाट काढत जावे लागत होते या बाबत संक्रापूरचे सरपंच रामा पांढरे यांनी पोपटराव गाडेकर यांची भेट घेवुन आपल्या जमीनीतून रस्ता करुन देण्याची विनंती केली पाच सहा गावातील नागरीकांची गैरसोय लक्षात घेता सरपंच पांढरे याच्या मागणीला शेतकरी गाडेकर यांनी लगेच संमती दिली कसलाही गाजावाजा न करता गाडेकर यांनी आपल्या शेतातून चार चाकी वाहन जाईल ईतका रस्ता करुन देण्यास संमती दिली गाडेकर यांची संमती मिळताच सरपंच पांढरे यांनी तातडीने जे सी बी आणला पत्रकार देविदास देसाई सुभाष जगताप रोहीदासा खपके सुभाष दाते ईब्राहीम शेख राजु चिंधै गंगा भोसले कैलास जाटे संदीप वडीतके गोरख वडीतके यांच्या उपस्थितीत रस्ता तयार करण्यात आला कच्चा मातीचा आसणार्या या रस्त्यावर आता लोकवर्गणीतून मुरुम टाकला जाणार आहे पाच सहा गावातील नागरीकांना जाता येताना त्रास होत होता शेतकरी गाडेकर यांनी दाखविलेल्या दातृत्वामुळे व सरपंच रामा पांढरे यांनी पुढाकार घेतल्यामुळे परिसरातील नागरीकांनी गाडेकर व पांढरे यांना धन्यवाद दिले आहे .
Post a Comment