बुलडाणा - 9 जून
8 मे रोजीच्या शासन निर्णयाद्वारे मका खरेदी करण्यासाठी आदेश दिलेले असतांना बुलडाणा जिल्ह्यात अजूनपर्यंत कुठेही मका खरेदी केंद्र सुरु करण्यात आलेले नाही. याबाबत दिनांक प्रशासनाला पत्रव्यवहार करून ही मका खरेदी सुरु झाले नसल्याने आज 9 जून रोजी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालय समोर शेतकन्यांच्या हितासाठी ठियया आंदोलन करत शासनाचा निषेध नोंदविला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत 6 हजाराच्या वर शेतकन्यांनी मका हमीभाव केंद्रात मका देण्यासाठी नोंदणी केलेली आहे . मका नोंदणीसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एकाच सेंटर असल्याने जिल्हा भरात अनेक मका उत्पादक शेतकरी असतांना केवळ तालुक्याच्याच ठिकाणी नोंदणी होत असल्याने अनेक शेतकऱ्यांना नोंदणी पासून वंचित राहावे लागले आहे .शासनाने खरेदी केलेल्या तूर , हरभरा , कापूस याचे पैसे मिळालेले नाही . मका घरात असूनही शासन खरेदी करीत नाही आणि खुल्या बाजारात मकाला किंमत नाही त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्याकरिता तातडीने हमीभावाने मका खरेदी करण्यात यावी . शासनाने खरेदी केलेल्या कापूस , तूर , हरभरा याचे पैसे शेतकन्याच्या खात्यात जमा करा . पीककर्जाचे वाटप जलद गतीने करा .नोंदणी केलेल्या शेतकन्यांची राहिलेली तूर , हरभरा तात्काळ घेण्यात यावे .अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा देखील आमदार श्वेता महाले यांनी देत शासकीय धोरणचा निषेध व्यक्त करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासनाला दिले आहे.या वेळी आंदोलनात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment