बेलापूर गावात मोठ्या प्रमाणात गुटखा जप्त एकावर कारवाई मटक्याचे काय ?

बेलापूर  (प्रतिनिधी )- अन्न व औषध प्रशसनाने बेलापूरातील एका ठिकाणी छापा टाकुन साडे चार लाख रुपयांचा गुटखा जप्त केला असुन एका व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन बेलापूर हे गुटखा अन मटका केंद्र बनले असल्याचे उघड झाले आहे                                    या घटने बाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सुरक्षा अधिकारी साहेबराव विष्णू मुळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अन्न व औषध प्रशासनास मिळालेल्या गुप्त माहीती नुसार फिर्यादी मुळे हे पंच शकुर जब्बार शेख अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त के जी गोरे सुर्यवंशी नमुना सहाय्यक प्रसाद कसबेकर आदिसह बेलापूरातील पढेगाव रोड येथे दाखल झाले त्या वेळी महींद्रा बोलेरो पिकअप एम एच १८ए ए ६४५० ही आरोपी मदन विजय कणगरे घेवुन जात असताना सदर गाडी अडवुन चौकशी केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे दिली अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाडीची तपासणी केली असता त्यात  ६० हजार रुपयांचा हिरा पान मसाला व ९० हजार रुपयांचा राँयल  तंबाखू व टेम्पो असा ४ लाख ५०हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला असुन पोलीसांनी मुद्देमाल वाहन जप्त केले आहे                         शासनाने गुटखा बंदी केल्यानंतरही बेलापूर गावात गुटखा अन मटका जोरात चालु होता अनेकाचा गुप्त आशिर्वाद या व्यवसायाला मिळत असल्यामुळे हा व्यवसाय खुले आम सुरु होता अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण गुटक्याच्या अहारी जावुन मटका खेळत आहे काही महीन्यापूर्वीही एका गोडावुन मधुन गुटख्याची चोरी झाली होती त्याही प्रकरणात कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती इतक्या दिवस खुलेआम विकल्या जाणार्या गुटख्याची खबर अचानक कशी लागली  रात्री एक वाजता आलेले पथक चार वाजेपर्यंत  बेलापूरातील पढेगाव रोडवरील त्या ठिकाणी थांबले असल्याची चर्चा असुन केवळ टेम्पो चालक आरोपी करण्यात आला आहे गुटख्या प्रमाणे बेलापूर गावात मटकाही जोमात चालु असुन त्यावरही कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे आनेक गोर गरीब लोक दिवसभर कष्ट करुन तो पैसा मटक्यात लावत आहे बेलापूर गाव हे मटका व गुटखा मूक्त करावे अशी मागणी केली जात आहे
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget