श्रीरामपूर (प्रतिनिधी )-स्वस्त धान्य दुकानदारांना माल वाटप करताना कोरोनाची लागण झाल्यास त्याचे कुटुंब उघड्यावर पडेल हे लक्षात घेवुन शासनाने दुकानदाराचा विमा उतरावा या मागणी करीता धान्य दुकानदारांनी संप पुकारला असल्याची माहीती जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी दिली आहे कोरोना लढ्यात स्वस्त धान्य दुकानदाराचा मोलाचा वाटा आहे सर्व जण घरात बसलेले असताना स्वस्त धान्य दुकानदार आपला जिव धोक्यात घालुन धान्याचे वाटप करत आहे हे करत असताना मुंबई नांदेड पुणे येथील धान्य दुकानदारांना कोरोनाची लागण झाली पुण्यातील दुकानदाराचे कोरोनामुळे निधन झाले त्यामुळे त्या दुकानदारांचे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे राज्यातील सर्व दुकानदार दररोज शेकडो कार्डधारकांना मालाचे वितरण करत आहेत हे करत असताना सर्व नियम पाळले तरी एखादा बाधीत व्यक्ती आल्यास दुकानदारांना बाधा होवु शकते शासनाने कोरोना संकटकाळात कार्य करणार्या सर्वांना विमा कवच दिलेले आहे परंतु दुकानदाराचा त्यात समावेश केलेला नाही त्यामुळे दुकानदारांना विमा सरंक्षण द्यावे ही आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँपकिपर्स फेडरेशनची मागणी आहे या मागणी करीता राज्यातील दुकानदारांनी अध्यक्ष गजानन बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली संपावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे दुकानदारांना विमा संरक्षण देण्याबाबत विचार सुरु असल्याचे महीन्यापूर्वीच सांगितले होते परंतु शसनास निवेदन देवुनही संघटनेच्या रास्त मागणीचा शासनाने विचार न केल्यामुळे दुकानदारांना संपावर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला तरी धान्य दुकानदारांना तातडीने विमा संरक्षण द्यावे असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सचिव रज्जाक पठाण कार्याध्यक्षा मिनाताई कळकुंबे सुरेश उभेदळ बाबा कराड बजरंग दरंदले विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे बाबासाहेब मोहीते गजानन खाडे रावसाहेब भगत चंद्रकांत झुरंगे मणीक जाधव सुरेश कोकाटे मुकुंद सोनटक्के मोहीते पाटील गणपत भांगरे आदिंच्या सह्या आहेत.
Post a Comment