श्रीरामपूर - राज्यातील नागरिकांचे चार महिन्याचे प्रति माह २०० युनिट पर्यंत विजेचे बिल माफ करण्याबाबत आम आदमी पार्टीचे राज्यव्यापी आंदोलन
राज्यात महा विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री च्या नेतृत्वात कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या संकटाला प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने हाताळत आहात, मागील अडीच महिन्यापासून राज्यातील उद्योग,
व्यापार व बाजारपेठा पूर्णपणे ठप्प झाली आहे यामुळे व्यापारी, कामगार,शेतकरी, शेतमजूर, फुटपाथवर बसून आपले पोट भरणारे सर्व नागरिक आर्थिकदृष्ट्या फारच संकटात आले आहेत काही प्रमाणात यामधील कामगार आणि
शेतमजूर यांना राशन च्या माध्यमातून धान्याची मदत शासनाकडून झालेले आहे
परंतु गहू तांदूळ मिळाली म्हणजे घर चालेते असे नाही या सोबत किराणा, भाजीपाला, दुध, दवाखाना, किंवा इतर खर्च अनिवार्य आहे राज्यातील छोटे-मोठे सर्वच रोजगाराचे साधन काही काळ बंद पडल्यामुळे राज्यातील
नागरिकांच्या घरात किंवा हातात पैसे सुद्धा बाकी नाही अशा
परिस्थितीत विद्युत बिल, घरपट्टी पाणीपट्टी बिले नागरिकांना आज न उद्या भरावेच लागणार आहेत परंतु आणिखी काही महिने या आर्थिक अडचणीतून
सामान्य नागरिकांना सावरणे फारच कठीण होईल यासाठी थोडी का होईना मदत म्हणून राज्यातील ज्या नागरिकांच्या विजेचे महिन्याला २०० युनिट
सर्व (ग्राहक) नागरिकांचे विजेचे बिल माफ करावे, ही आज
राज्यातील सर्व जनतेची मागणी आहे दिल्लीतील श्री अरविंद केजरीवाल सरकार गेल्या दोन
वर्षांपासून २०० युनिट पर्यंत वीज मोफत देता आहे याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही मोठ्या मनाने चार महिन्याचे विजेचे बिल
तातडीने माफ करावे शक्य झाल्यास कायमस्वरूपी करण्याची घोषणा करावी
अन्यथा आम्हाला राज्यातील जनतेला घेवून नाईलाजास्तव रस्तावर उतरून आंदोलन
करावे लागेल असा इशारा आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल यांनी दिला आहे विज बिल माफ करण्यात यावे या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला निवेदन देण्यात आले यावेळी आम आदमी पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रचारक तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, सामाजिक कार्यकर्ते उपसरपंच गणेश छल्लारे ,शहरध्यक्ष प्रताप राठोर, उत्तर जिल्हा प्रवक्ते प्रवीण जमदाडे ,शहर उपाध्यक्ष किशोर वाडीले, राहुल रणपिसे, भरत डेंगळे ,आदित्य पठारे, दीपक परदेशी, शिवा गोरे सचिन आजगे,दिनेश यादव यशवंत जेठे सलीम शेख, आधी सामाजिक अंतर ठेवून या आंदोलना प्रसंगी उपस्थित होते.
Post a Comment