कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :- राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे 57 वर्षीय व्यक्तीचे कोरणा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने लोणी खुर्द गाव 14 दिवसांसाठी म्हणजे 15/ 6/ 20 20पर्यंत पूर्णपणे लोक डाऊन करण्यात आले असल्याची माहिती दाढ येथील आरोग्य उपकेंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीपाद मैड व ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे यांनी दिली लोणी खुर्द येथील 57 वर्षीय व्यक्तीस त्रास जाणवू लागल्याने त्यांचे स्राव तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे डॉक्टर श्रीपाद मैड यांनी सांगितले या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोणी खुर्द ,दाढ ,आडगाव ,कोल्हार बुद्रुक येथील सतरा व्यक्तींना शिर्डी येथे विलगी करण कक्षात ठेवण्यात आले असल्याचे डॉक्टर मैड व ग्राम विकास अधिकारी थिगळे यांनी सांगितले.
Post a Comment