Latest Post

(राहाता प्रतिनिधी  मसूद मुस्ताक शाह  ) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून शासनाने देशात लॉकडाऊन सुरू केला आहे, अशा लॉकडाऊनच्या  काळात सर्व काही बंद असताना रमजानचा पवित्र सण आला आहे ,आज शेवटचा पवित्र रोजा असून उद्या पवित्र रमजान ईद आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात राहूनच नमाज  अदा करावी व देशाला ,जगाला या कोरोणा महामारी पासून वाचवावे अशी अल्लाला प्रार्थना करावी ,असे आवाहन मुस्लिम समाजातील समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शहा यांनी केले आहे.जगात, देशात कोरोनाने हाहाकार उडाला आहे,  सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे , सर्व काम धंदे  बंद आहेत, लॉक डाऊन चा चौथा टप्पा सुरू झाला आहे,  या लॉक डाऊन च्या चौथ्या टप्प्यात  काही वेळेत  काही दुकानांना उघडण्यास  परवानगी देण्यात आली आहे  , तसेच जिल्हा अंतर्गत अटी व शर्ती ठेवून प्रवासही करता येत आहे, मात्र संचारबंदी 31 मेपर्यंत जारी आहे , तसेच  कोरोणा महामारी चा  संसर्गाचा धोका ही   अद्याप टळलेला नाही , जरी  राहाता तालुका कोरोणा मुक्त असला तरी  कोरानाचा धोका  भविष्यातही टाळणे गरजेचे आहे,  या लॉकडाउनच्या  काळातच हा पवित्र रमजान महिना  आला आहे,  त्यामुळे  महिनाभर  सर्व मुस्लिम बांधवांनी  स्वच्छेने  तसेच शासनाचे ,व लॉकडाऊन चे नियम पाळत  प्रत्येक मुस्लिम बांधवांनी आपापल्या घरात  नमाज अदा केली , आज  रमजानचा पवित्र  शेवटचा रोजाअसुन यासंदर्भात ,समाजसेवक इलियास शहा व मुस्ताक शाह यांनीपुढे।सागितले की, रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण अाहे, पण शंभर वर्षानंतर प्रथमच सामूहिकपणे नमाज न करता या दिवशी प्रत्येकाला घरात राहून नमाजअदा करावी लागत आहे, मात्र, प्रत्येकाचे जीवन, कुटुंब राज्य, देश महत्त्वाचा असून कोरोणा यापासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या घरातच नमाज अदा करावी व व फोनवरूनच एकमेकांना ईद शुभे्छा द्याव्यात ,तसेच या महामारी पासून सर्वांना वाचवण्याचे अल्लाला साकडे घालावे ,असे आवाहनही राहाता येथील समाजसेवक इलियास शहा व मे मुस्ताक शहा  यांनी यावेळी केलेआहे.

श्रीरामपूर -तालुक्यातील निपाणी वाडगाव परिसरातील लाटे वस्ती येथे रात्री गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या घटनेत एका तरुणाचा मृत्यु झाला. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणीवाडगाव) असे या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.या बाबत पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, लोटीवस्ती येथेल वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात आज सायंकाळी पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.तेथील काही तरुणांनी त्याला तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तेथे तैनात करण्यात आला होता. रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता.

बुलढाणा - 23 मई-पिछले 2 माह से पूरे देश में कोरोना के कारण लॉकडाउन चल रहा है ऐसे में अनेक लोगों के काम धंदे हाथों ठप्प होने के कारण कई लोग बड़ी दिक्कतों से अपने दिन गुजार रहे हैं.आगामी पवित्र रमजान ईद पर होनेवाली खरीदी की रकम इन गरीब और जरूरतमंदों में बांट कर ईद सादगी से मनाने का आह्वान बुलढाणा के कुछ युवक शहर के मुस्लिम इलाकों में घूम कर माइक के जरिए कर रहे हैं.
      कोरोना महामारी ने पूरी अर्थव्यवस्था को बिगाड़ कर रख दिया है. करीब 2 माह से जारी लॉक डाउन के कारण लोग अपने घरों में ही बैठे हुए हैं जो कुछ पैसा था वह खर्च हो गया और अब भविष्य को लेकर वे चिंतित हैं.
हालांकि शासन ने आज 22 मई से रेड जोन से बाहर इलाकों में शर्तों के साथ दुकाने खोलने की इजाजत दे दी है किंतु लोग जल्द घर से बाहर निकलने को तैयार नजर नहीं आ रहे हैं.मुस्लिम समाज को पवित्र रमजान माह लॉक डाउन के चलते घर में ही बिताना पड़ा. रमजान माह की खुशियां और रमजान ईद को लेकर एक उत्साह का जो माहौल मुस्लिम समाज में दिखाई देता था वो इस साल कोरोना की वजह से कुछ नजर नहीं आ रहा है. अब मार्केट खुलने को तैयार है और ईद की शॉपिंग भी जोरों पर होने के अंदेशे को भांपते हुए बुलढाणा के समाज सेवक मोहम्मद अजहरुलहक अपने कुछ साथियों के साथ बुलढाणा की मुस्लिम बस्तियों में घूम कर माइक के जरिए ये कोरोना से बचने के उपाययोजना,जनजागृति के अलावा ये आवाहन कर रहे हैं कि ईद की खरीदी के लिए मार्केट में जाते समय सोशल डिस्टेंस का ख्याल रखें और साथ ही जहां तक हो सके ईद की खरीदी ना की जाए और इस साल ईद पर होनेवाला खर्च अपने आस-पड़ोस के उन जरूरतमंदों को बांट दे जिनके खाने की कोई व्यवस्था नहीं है तथा इस साल ईद सादगी से मनाने की अपील मोहम्मद अजहर के साथ बबलू कुरेशी, मोहम्मद दानिश,मो.अबूझर, अल्ताफ खान,समीर चौधरी व अन्य युवक करते नज़र आ रहे हैं. बुलढाणा के मो.अज़हर और उनके साथियों के इस कार्य की पूरे जिले में काफी चर्चा हो रही है.

बुलडाणा - 23 मे-मेहकर तालुक्यातील बरटाळा गावातील दोन संदिग्ध नागरिकांना 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात आयसोलेशन क्वॉरंटाईन करण्यात आले होते. परंतू त्याच रात्री हे दोघेही रुग्णालयातून फरार झाल्याने रुग्णालयात प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. शेवटी मेहकर पोलिसांच्या मदतीने दोन्ही संशयीतांना 22 मे रोजी परत बुलडाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यातील बरटाळा गावातील जवळपास 25 नागरिकांना एका शाळेत
क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे दोघांची देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करुन पुढील उपचारासाठी 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले होते या दोघांना शासकिय रुग्णालयातील वार्ड क्र. 8 एमएमडब्ल्यू मध्ये भरती केले. परंतु त्याच रात्री हे दोघेजण शासकिय रुग्णालयातून फरार झाले होते. याची तक्रार बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला देण्यात असून दोन्ही आरोपी विरुध्द भांदविचे कलम 188 तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बरटाळा हे गाव मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती मेहकर पोलिसांना देण्यात आली असता मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय पवार, गोपनीय शाखेचे देवीचंद चव्हाण व काही पोलिस कर्मचारी बरटाळा गावात पोहचले व त्यांनी या दोघेही फरार संदिग्ध रुग्णांना शोधून काढले. देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विशाल मगर व त्यांच्या स्टाफच्या मदतीने रुग्णवाहिकेत 22 मे रोजी दोघांना पुन्हा बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात सोडण्यात आले.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- कोरोनामुळे बेलापूर गावची शनि यात्रा स्थगीत करण्याचा निर्णय    यात्रा कमिटीने घेतला असुन काही मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते शनि महाराजांचा अभिषेक करण्यात आला शनि आमावस्ये निमित्त गर्दी होवू नये म्हणून गावात जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला रद वर्षी प्रमाणे या ही वर्षी शनि यात्रा आली परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून बेलापूर ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली सर्व कार्यक्रम स्थगीत रण्यात आले सकाळी सहा वाजता मंदिराचे विश्वस्त दिपक बैरागी ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पत्रकार देविदास देसाई  कै मुरलीधर पतसंस्थेचे व्यवस्थापन संजय नागले यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता  शनि देवाला अभिषेक घालण्यात आला   या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले  विलास मेहेत्रे मधुकर गायकवाड साठे मामा उपस्थित होते या वेळी बाळासाहेब काळे हरिभाऊ काळे यांनी मंत्र पठण केले कोरोनाची साथ लवकर जावु दे सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे अशी मागणी शनि महाराजांना करण्यात आली त्यां नंतर मदिर बंद करण्यात आले भाविकांनी बाहेरुनच शनि महाराजांचे दर्शन घेवुन ईडा पिडा टळू दे कोरोना हाटु दे अशी विनवणी शनि देवाला केली शनिदेवाची मूर्ती असलेले हे परिसरातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी  दर शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

बेलापूर (प्रतिनिधी )-   कोरोनाला आटोक्यात आणण्यास शासनाला अपयश आले असुन  या घटनेबाबत लक्षवेधण्यासाठी बेलापूर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले         
          राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे.राज्यातील कोरोना  फायटर्स असलेल पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी याच्या आरोग्याची काळजी घेण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे
          राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी बेलापूर तालुका श्रीरामपूर,जिल्हा उत्तर नगर‘ च्या वतीने 'महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले*
           यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या अंगणात राज्य सरकारचे फेल्युअर फलक हातात घेऊन, तोंडावर काळे मास्क लावुन, अपयशी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

शिर्डी( जय शर्मा )लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात आज पासून नॉन रेड झोन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवून|  जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोटरसायकली व वाहनांची ये-जा आज वाढल्याचे दिसून येत होते ,मात्र अशा नगर-मनमाड रस्ताने जाणाऱ्या,येणा्रया मोटरसायकली व इतर वाहनांची थांबून, त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी करून अनेकांचा वेळ वाहतूक पोलीस  घेताना दिसून येत होते, तसेच अरेरावी व उध्दट भाषांचाही वापर केला जात होता,  कागदपत्रे नसताना चिरीमिरी घेऊन यापूर्वी सोडणा्रया वाहतूक पोलीसांनाआज मात्र शिर्डीतील  काही संघटनेचे तरुण कोरोना वारियर्स हेच मदतीला तेथे समक्ष उपस्थित असल्यामुळे वाहतूक पोलिसांना चिरीमिरीसाठी या तरुणांचा मोठा अडथळा निर्माण झाल्याची कुजबुज येथे सुरू होती,
   कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून लॉक डाउन मुळे सर्व काही बंद होते येथील साईभक्त व प्रवासी येणे बंद झाले होते, शिर्डीत सर्वत्र सामसूम होती ,मात्र आजपासून अहमदनगर जिल्ह्यात ठराविक वेळेत ,अटी व शर्ती ठेवून दुकाने उघडण्यास व जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास जिल्हाधिकारी ‍यांनी परवानगी दिली आहे, त्यासाठी अटी व शर्ती ठेवण्यात आले आहेत, शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून शेकडो जीप ,खाजगी बसेस साई भक्तांना साईट सीन साठी घेऊन जात असत, अशा जिप ,खाजगीप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून हप्ता वसुली मोठ्या प्रमाणात येथे होत होती, गेल्या दोन महिन्यापासून ती बंद आहे ,त्यामुळे आर्थिक टंचाईत आलेली यंत्रणाही येणाऱ्या-जाणाऱ्या मोटरसायकली व इतर वाहनांकडून वसुली करून ती भागवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून शिर्डीतील काही  सामाजिक संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कोरोना वारियर्स म्हणून आपली भूमिका, जबाबदारी समजून शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांना मदत करीत महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे, मात्र या तरुण कोरोणा वारियर्स मुळे वाहतूक पोलिसांकडुन विविध मार्गाने, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाना अडवुन नेहमी विविध धाक दाखवून करण्यात येणारी वसुली आता बंद झाली आहे ,या तरुण कोरोना वॉरियर्सचा  त्यांना आता मोठा अडथळा ठरू लागला आहे असे खाजगीत बोलले जात अाहे, उघडपणे कोणीही बोलायला तयार नाहीत, नियम व अटी सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे, जो नियमात आहे ,त्याला विनाकारण त्रास देणे चुकीचे आहे, व जो नियमात नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे पण अनेकदा नियमात असतानाही  कुठेतरी विनाकारण बोट दाखवून अडचण निर्माण केली जात आहे, मात्र आता कोरोना तरुण वारियर्स शिर्डीतील असल्यामुळे या गोष्टीला मोठा पायबंद बसणार आहे व बसत आहे ,अशीच शिर्डीत सध्या चर्चा सुरू आहे, व कायमचात शिर्डीतील विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन आपले कार्यकर्ते, वेगवेगळे दिवस व वेगवेगळ्या वेळा ठरवून असेच सामाजिक कार्य करण्यासाठी उभे राहिले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टींना आळा बसल्याशिवाय राहणार नाही ,असे शिर्डीत बोलले जात आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget