बेलापूर ( प्रतिनिधी )-- कोरोनामुळे बेलापूर गावची शनि यात्रा स्थगीत करण्याचा निर्णय यात्रा कमिटीने घेतला असुन काही मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते शनि महाराजांचा अभिषेक करण्यात आला शनि आमावस्ये निमित्त गर्दी होवू नये म्हणून गावात जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला रद वर्षी प्रमाणे या ही वर्षी शनि यात्रा आली परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून बेलापूर ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली सर्व कार्यक्रम स्थगीत रण्यात आले सकाळी सहा वाजता मंदिराचे विश्वस्त दिपक बैरागी ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पत्रकार देविदास देसाई कै मुरलीधर पतसंस्थेचे व्यवस्थापन संजय नागले यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता शनि देवाला अभिषेक घालण्यात आला या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले विलास मेहेत्रे मधुकर गायकवाड साठे मामा उपस्थित होते या वेळी बाळासाहेब काळे हरिभाऊ काळे यांनी मंत्र पठण केले कोरोनाची साथ लवकर जावु दे सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे अशी मागणी शनि महाराजांना करण्यात आली त्यां नंतर मदिर बंद करण्यात आले भाविकांनी बाहेरुनच शनि महाराजांचे दर्शन घेवुन ईडा पिडा टळू दे कोरोना हाटु दे अशी विनवणी शनि देवाला केली शनिदेवाची मूर्ती असलेले हे परिसरातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी दर शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.
Post a Comment