बुलडाणा रुग्णालयातून 2 कोरोना संदिग्ध फरार, दोघांवर गुन्हा दाखल, पोलिसांच्या मदतीने आणले परत.

बुलडाणा - 23 मे-मेहकर तालुक्यातील बरटाळा गावातील दोन संदिग्ध नागरिकांना 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात आयसोलेशन क्वॉरंटाईन करण्यात आले होते. परंतू त्याच रात्री हे दोघेही रुग्णालयातून फरार झाल्याने रुग्णालयात प्रशासनात एकच खळबळ उडाली होती. शेवटी मेहकर पोलिसांच्या मदतीने दोन्ही संशयीतांना 22 मे रोजी परत बुलडाण्यात आणण्यात आले. या प्रकरणी बुलडाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
       बुलडाणा जिल्ह्यातील बरटाळा गावातील जवळपास 25 नागरिकांना एका शाळेत
क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी दोन जणांची अचानक प्रकृती बिघडली. त्यांना ताप व खोकल्याचा त्रास सुरु झाला. त्यामुळे दोघांची देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्रातून तपासणी करुन पुढील उपचारासाठी 21 मे रोजी बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आले होते या दोघांना शासकिय रुग्णालयातील वार्ड क्र. 8 एमएमडब्ल्यू मध्ये भरती केले. परंतु त्याच रात्री हे दोघेजण शासकिय रुग्णालयातून फरार झाले होते. याची तक्रार बुलडाणा शहर पोलिस स्टेशनला देण्यात असून दोन्ही आरोपी विरुध्द भांदविचे कलम 188 तसेच साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अन्वये 22 मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. बरटाळा हे गाव मेहकर पोलिस स्टेशन हद्दीत येत असल्याने या घटनेची माहिती मेहकर पोलिसांना देण्यात आली असता मेहकरचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार संजय पवार, गोपनीय शाखेचे देवीचंद चव्हाण व काही पोलिस कर्मचारी बरटाळा गावात पोहचले व त्यांनी या दोघेही फरार संदिग्ध रुग्णांना शोधून काढले. देऊळगाव माळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.विशाल मगर व त्यांच्या स्टाफच्या मदतीने रुग्णवाहिकेत 22 मे रोजी दोघांना पुन्हा बुलडाणा येथील शासकिय रुग्णालयात सोडण्यात आले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget