शिर्डी( जय शर्मा )लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात आज पासून नॉन रेड झोन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवून| जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोटरसायकली व वाहनांची ये-जा आज वाढल्याचे दिसून येत होते ,मात्र अशा नगर-मनमाड रस्ताने जाणाऱ्या,येणा्रया मोटरसायकली व इतर वाहनांची थांबून, त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी करून अनेकांचा वेळ वाहतूक पोलीस घेताना दिसून येत होते, तसेच अरेरावी व उध्दट भाषांचाही वापर केला जात होता, कागदपत्रे नसताना चिरीमिरी घेऊन यापूर्वी सोडणा्रया वाहतूक पोलीसांनाआज मात्र शिर्डीतील काही संघटनेचे तरुण कोरोना वारियर्स हेच मदतीला तेथे समक्ष उपस्थित असल्यामुळे वाहतूक पोलिसांना चिरीमिरीसाठी या तरुणांचा मोठा अडथळा निर्माण झाल्याची कुजबुज येथे सुरू होती,
कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून लॉक डाउन मुळे सर्व काही बंद होते येथील साईभक्त व प्रवासी येणे बंद झाले होते, शिर्डीत सर्वत्र सामसूम होती ,मात्र आजपासून अहमदनगर जिल्ह्यात ठराविक वेळेत ,अटी व शर्ती ठेवून दुकाने उघडण्यास व जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे, त्यासाठी अटी व शर्ती ठेवण्यात आले आहेत, शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून शेकडो जीप ,खाजगी बसेस साई भक्तांना साईट सीन साठी घेऊन जात असत, अशा जिप ,खाजगीप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून हप्ता वसुली मोठ्या प्रमाणात येथे होत होती, गेल्या दोन महिन्यापासून ती बंद आहे ,त्यामुळे आर्थिक टंचाईत आलेली यंत्रणाही येणाऱ्या-जाणाऱ्या मोटरसायकली व इतर वाहनांकडून वसुली करून ती भागवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून शिर्डीतील काही सामाजिक संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कोरोना वारियर्स म्हणून आपली भूमिका, जबाबदारी समजून शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांना मदत करीत महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे, मात्र या तरुण कोरोणा वारियर्स मुळे वाहतूक पोलिसांकडुन विविध मार्गाने, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाना अडवुन नेहमी विविध धाक दाखवून करण्यात येणारी वसुली आता बंद झाली आहे ,या तरुण कोरोना वॉरियर्सचा त्यांना आता मोठा अडथळा ठरू लागला आहे असे खाजगीत बोलले जात अाहे, उघडपणे कोणीही बोलायला तयार नाहीत, नियम व अटी सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे, जो नियमात आहे ,त्याला विनाकारण त्रास देणे चुकीचे आहे, व जो नियमात नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे पण अनेकदा नियमात असतानाही कुठेतरी विनाकारण बोट दाखवून अडचण निर्माण केली जात आहे, मात्र आता कोरोना तरुण वारियर्स शिर्डीतील असल्यामुळे या गोष्टीला मोठा पायबंद बसणार आहे व बसत आहे ,अशीच शिर्डीत सध्या चर्चा सुरू आहे, व कायमचात शिर्डीतील विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन आपले कार्यकर्ते, वेगवेगळे दिवस व वेगवेगळ्या वेळा ठरवून असेच सामाजिक कार्य करण्यासाठी उभे राहिले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टींना आळा बसल्याशिवाय राहणार नाही ,असे शिर्डीत बोलले जात आहे.

Post a Comment