Latest Post

बेलापूर  ( प्रतिनिधी  )-- कोरोनामुळे बेलापूर गावची शनि यात्रा स्थगीत करण्याचा निर्णय    यात्रा कमिटीने घेतला असुन काही मोजक्याच मान्यवरांच्या हस्ते शनि महाराजांचा अभिषेक करण्यात आला शनि आमावस्ये निमित्त गर्दी होवू नये म्हणून गावात जनता कर्फ्यु घोषीत करण्यात आला रद वर्षी प्रमाणे या ही वर्षी शनि यात्रा आली परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून बेलापूर ग्रामस्थांनी विशेष खबरदारी घेतली सर्व कार्यक्रम स्थगीत रण्यात आले सकाळी सहा वाजता मंदिराचे विश्वस्त दिपक बैरागी ऐनतपुरचे पोलीस पाटील अशोक प्रधान ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे पत्रकार देविदास देसाई  कै मुरलीधर पतसंस्थेचे व्यवस्थापन संजय नागले यांच्या हस्ते सकाळी सहा वाजता  शनि देवाला अभिषेक घालण्यात आला   या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले  विलास मेहेत्रे मधुकर गायकवाड साठे मामा उपस्थित होते या वेळी बाळासाहेब काळे हरिभाऊ काळे यांनी मंत्र पठण केले कोरोनाची साथ लवकर जावु दे सर्वांना सुख शांती समाधान लाभू दे अशी मागणी शनि महाराजांना करण्यात आली त्यां नंतर मदिर बंद करण्यात आले भाविकांनी बाहेरुनच शनि महाराजांचे दर्शन घेवुन ईडा पिडा टळू दे कोरोना हाटु दे अशी विनवणी शनि देवाला केली शनिदेवाची मूर्ती असलेले हे परिसरातील एकमेव मंदिर आहे या ठिकाणी  दर शनिवारी अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात.

बेलापूर (प्रतिनिधी )-   कोरोनाला आटोक्यात आणण्यास शासनाला अपयश आले असुन  या घटनेबाबत लक्षवेधण्यासाठी बेलापूर भाजपाच्या वतीने महाराष्ट्र बचाओ आंदोलन करण्यात आले         
          राज्यातील विशेषतः मुंबईतील कोरोनाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून राज्य सरकार निष्क्रीय झाले आहे.राज्यातील कोरोना  फायटर्स असलेल पोलिस, डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी याच्या आरोग्याची काळजी घेण्यासही हे सरकार अपयशी ठरले आहे
          राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी बेलापूर तालुका श्रीरामपूर,जिल्हा उत्तर नगर‘ च्या वतीने 'महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन केले*
           यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपल्या अंगणात राज्य सरकारचे फेल्युअर फलक हातात घेऊन, तोंडावर काळे मास्क लावुन, अपयशी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

शिर्डी( जय शर्मा )लॉकडाऊन च्या चौथ्या टप्प्यात आज पासून नॉन रेड झोन असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अंतर्गत प्रवास करण्यासाठी काही अटी व शर्ती ठेवून|  जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असल्यामुळे नगर-मनमाड महामार्गावर मोटरसायकली व वाहनांची ये-जा आज वाढल्याचे दिसून येत होते ,मात्र अशा नगर-मनमाड रस्ताने जाणाऱ्या,येणा्रया मोटरसायकली व इतर वाहनांची थांबून, त्यांना अडवून कागदपत्रांची तपासणी करून अनेकांचा वेळ वाहतूक पोलीस  घेताना दिसून येत होते, तसेच अरेरावी व उध्दट भाषांचाही वापर केला जात होता,  कागदपत्रे नसताना चिरीमिरी घेऊन यापूर्वी सोडणा्रया वाहतूक पोलीसांनाआज मात्र शिर्डीतील  काही संघटनेचे तरुण कोरोना वारियर्स हेच मदतीला तेथे समक्ष उपस्थित असल्यामुळे वाहतूक पोलिसांना चिरीमिरीसाठी या तरुणांचा मोठा अडथळा निर्माण झाल्याची कुजबुज येथे सुरू होती,
   कोरोना च्या पार्श्वभूमीवर शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून लॉक डाउन मुळे सर्व काही बंद होते येथील साईभक्त व प्रवासी येणे बंद झाले होते, शिर्डीत सर्वत्र सामसूम होती ,मात्र आजपासून अहमदनगर जिल्ह्यात ठराविक वेळेत ,अटी व शर्ती ठेवून दुकाने उघडण्यास व जिल्हाअंतर्गत प्रवास करण्यास जिल्हाधिकारी ‍यांनी परवानगी दिली आहे, त्यासाठी अटी व शर्ती ठेवण्यात आले आहेत, शिर्डीत गेल्या दोन महिन्यापासून शेकडो जीप ,खाजगी बसेस साई भक्तांना साईट सीन साठी घेऊन जात असत, अशा जिप ,खाजगीप्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांकडून हप्ता वसुली मोठ्या प्रमाणात येथे होत होती, गेल्या दोन महिन्यापासून ती बंद आहे ,त्यामुळे आर्थिक टंचाईत आलेली यंत्रणाही येणाऱ्या-जाणाऱ्या मोटरसायकली व इतर वाहनांकडून वसुली करून ती भागवण्याचा प्रयत्न होत होता, मात्र गेल्या एक-दोन दिवसापासून शिर्डीतील काही  सामाजिक संघटनेच्या तरुण कार्यकर्त्यांनी कोरोना वारियर्स म्हणून आपली भूमिका, जबाबदारी समजून शिर्डीच्या प्रवेशद्वारावरच वाहतूक पोलिसांना मदत करीत महत्त्वाचे कार्य सुरू केले आहे, मात्र या तरुण कोरोणा वारियर्स मुळे वाहतूक पोलिसांकडुन विविध मार्गाने, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकाना अडवुन नेहमी विविध धाक दाखवून करण्यात येणारी वसुली आता बंद झाली आहे ,या तरुण कोरोना वॉरियर्सचा  त्यांना आता मोठा अडथळा ठरू लागला आहे असे खाजगीत बोलले जात अाहे, उघडपणे कोणीही बोलायला तयार नाहीत, नियम व अटी सगळ्यांनीच पाळल्या पाहिजे, जो नियमात आहे ,त्याला विनाकारण त्रास देणे चुकीचे आहे, व जो नियमात नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे पण अनेकदा नियमात असतानाही  कुठेतरी विनाकारण बोट दाखवून अडचण निर्माण केली जात आहे, मात्र आता कोरोना तरुण वारियर्स शिर्डीतील असल्यामुळे या गोष्टीला मोठा पायबंद बसणार आहे व बसत आहे ,अशीच शिर्डीत सध्या चर्चा सुरू आहे, व कायमचात शिर्डीतील विविध सामाजिक संघटनेने पुढाकार घेऊन आपले कार्यकर्ते, वेगवेगळे दिवस व वेगवेगळ्या वेळा ठरवून असेच सामाजिक कार्य करण्यासाठी उभे राहिले तर नक्कीच मोठ्या प्रमाणात सर्वच गोष्टींना आळा बसल्याशिवाय राहणार नाही ,असे शिर्डीत बोलले जात आहे.

शिर्डी (जय शर्मा )राज्य सरकार कोरोणाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात रोखण्यासाठी कमी पडले असून त्यासाठी अयशस्वी ठरलेल्या राज्य सरकारचा निषेध करत राज्य सरकारने राज्यातील जनतेला कोरोणामुळे उद्भवलेल्या संकटकाळात विविध क्षेत्रात, विविध प्रकाराने मदत करण्याची मागणी करत राहता तालुक्यातील विविध गावात भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी मेरा अंगण, मेरा रणांगण महाराष्ट्र बचाओ आंदोलन आज केले,
राज्यात कोरोणामुळे जनता मोठ्या संकटात सापडली आहे आर्थिक टंचाई भासू लागली आहे, राज्य सरकार या काळात अयशस्वी ठरले आहे, याचा निषेध करण्यासाठी राज्यभर आज भा,ज,प च्या वतीने महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, भाजपच्यावतीने गावागावात मेरा अंगण, मेरा रणांगण ,महाराष्ट्र बचाओ आंदोलन केले गेले, याच धर्तीवर राहता तालुक्यातही असे आंदोलन झाले, राहता तालुक्यातील शिर्डी व परिसरातही ही गावागावात भाजपतर्फे असे आंदोलन करण्यात आले, निमगाव निघोज येथील भाजपाचे स्थानिक नेते बाळासाहेब गाडेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत गावात राज्य सरकारचा निषेध करत मेरा अंगण मेरा रणांगण महाराष्ट्र बचाव आंदोलन केले,व विविध मागण्यांचे निवेदन घेवुन त्यांनी हे आंदोलन केले ,तोंडाला मास्क लावून व सोशल डिस्टंन्स पाळत महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले, यावेळी   शासनाने विद्यार्थ्यांची शालेय फी माफ करण्यात यावी, शेतमजूर, कामगार ,बारा बलुतेदार आदी रोजीरोटी वर जगणाऱ्या गोरगरिबांना आर्थिक अनुदान द्यावे ,राज्यातील सर्व भाडेकरूंचे तीन महिन्यांचे घर भाडे माफ करावे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी ,शिधापत्रिका नसलेल्यानाही  रेशन मधून धान्य मिळावे, आदी विविध मागण्या करत हे महाराष्ट्र बचाव आंदोलन येथे करण्यात आले, त्याच प्रमाणे तालुक्यातील गावातही असेच वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन झाले.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राज्यात महसूल खात्याला गाव पातळीवर सर्वाधिक मदत करणारा कोतवाल असताना कोतवालांना ढोबळमानाने साडेसात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. आजच्या महागाईच्या युगात हा तुटपुंजा पगार कोतवालांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरा पडत आहे त्यामुळे कोतवालांची मोठी अडचण निर्माण होत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर लॉक डाऊन करण्यात आला होता, या लॉकं डाउन काळात प्रत्येक गावातील कामगार तलाठ्यांना मोठी मदत करण्याचे काम कोतवालांनी अहोरात्र केले होते, आपला जीव धोक्यात घालून ग्राउंड लेव्हल ला कोतवाल काम करत आहेत, त्यांचा शासनाने सध्या तरी विचार करणे गरजेचे आहे,
राज्यात, जिल्ह्यात व गावागावात महसूल खात्याकडून कामगार तलाठी यांच्यामार्फत सर्व आदेशांची अंमलबजावणी, नोटिसा देणे, गावातील व्यक्तींना बोलावून आणणे, दुर्घटना अथवा पिकांचा पंचनामा करताना मदत करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे कोतवालांना करावी  लागतात.सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोतवालांना ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इत्यादीं सोबत कार्य करावे लागत आहे. गाव पातळीवर स्थापन केलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच इत्यादींच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोतवाल ही व्यक्ती उपयुक्त ठरते. कोरोनाच्या सर्व धोक्याविरुद्ध कोतवाल सध्या गाव पातळीवर प्रामाणिकपणे लढत आहे. कोतवाल सुद्धा इतरांप्रमाणेच कोरन वॉरियर्स आहेत, ते जनतेला कोरोना पासून वाचविण्यासाठी पराकाष्ठेचे परिश्रम निमुटपणे घेत आहे. मात्र कोतवालांना कोरोना विरुद्ध लढताना विम्याचे  संरक्षण  देण्यात आलेले नाही, त्याच प्रमाणे गाव पातळीवरील इतर कर्मचार्‍यांप्रमाणे कोतवालांना प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा देण्यात आलेला नाही. ही बाब अन्यायकारक आहे. तसेच कोतवालांचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखी आहे.
यासाठी कोतवालांना सुद्धा इतर कर्मचार्‍यांप्रमाणे विम्याचे संरक्षण देऊन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, लॉकडाउनकाळातील त्यांच्या या  कामगिरीचाही शासनाने कुठेतरी विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पठारे, युवा आघाडी प्रमुख अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, डॉ.प्रशांत शिंदे, भगवान जगताप, बबलू खोसला, इक्बाल भाई, अशोक बापू कोकाटे, कैलास खांदवे, गणेश इंगळे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.

शिर्डी( जय शर्मा)- कोरोणा पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यातअटी  व शर्ती ठेवून नॉन रेड झोन जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस काही ठिकाणाहून आजपासून धावणार होत्या ,मात्र शिर्डी या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या बसस्थानकात मात्र आज शुकशुकाट दिसत होता, येथून आज एकही बस बाहेर गेल्याचे व आल्याचे दुपार पर्यंत दिसत नव्हते, येथे फक्त एसटी महामंडळाचे कामगार व पोलीस दिसत होते, एवढ्या मोठ्या बसस्थानकात  प्रवासी मात्र एकही दिसत नव्हता , जिल्ह्यात आज बस सुरू झाल्या , शिर्डी सारख्या बसस्थानकातून ठराविक मार्गावर बसेस सोडणार होते, मात्र  या बस स्थानकात प्रवासी फिरकले नाही ,शिर्डी बस स्थानक हे नेहमी साई भक्तांनी गजबजलेले असते, मात्र श्री साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे साईभक्त येणे ,जाणे बंद आहे प्रवासी  व साई भक्तच नाही तर बस सोडून करणार काय । प्रवासी नसल्यामुळे हे बस स्थानक शांत शांत दिसूनयेत होते, ,आज बसेस सोडण्यासाठी जिल्ह्यात काही ठिकाणी  संपूर्ण तयारी करण्यात आली होती ,कोपरगाव, संगमनेर श्रीरामपूर आगारातून बसेस सोडण्यात आल्या, शिर्डीतून ही बसेस सोडण्यासाठी तयारी झाली होती मात्र दुपारपर्यंत येथे प्रवासी फिरकले नसल्यामुळे येथून एकही बस येथून दुसरीकडे धावली नाही, राहता तालुका कोरोणा मुक्त आहे, राहता तालुक्यातील शिर्डी हे श्री साईबाबा मुळे अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे, लॉकडाउनच्या पूर्वी एसटी महामंडळाला, कोपरगाव आगाराला सर्वात जास्त उत्पन्न शिर्डी बसस्थानकातील प्रवाशांमुळे मिळते, कारण शिर्डीहून अनेक ठिकाणी,अनेक बसेस जातात, येतात,लॉकडाउनकाळातही शिर्डीतून परप्रांतीयांना जाण्यासाठी काही बसेस सोडण्यात आल्या होत्या, शिर्डीचे  आंतरराष्ट्रीय बस स्थानक यापूर्वी सनेंटायझर करण्यात आले आहे,  सर्व सुविधा व सुसज्ज असेहे बसस्थानक आहे ,असे असतानाही आज हे बस स्थानक सामसूम दिसत होते, नेहमी गजबजलेले हे बस स्थानक लॉकडाउन काळात शांत।तर होतेच मात्र आज बस सुरू झाल्या पण श्रीसाई मंदिर बंद असल्यामुळे व प्रवासी नसल्यामुळे आजही हे बस स्थानक नेहमीप्रमाणे गजबजले  दिसत नव्हते, शांत शांत वाटत होते, जोपर्यंत श्री साईबाबांचे मंदिर सुरू होत नाही व साईभक्त येथे येणे सुरू होत नाही तोपर्यंत शिर्डीचे बसस्थानक असेच शांत शांत दिसणार आहे ,येथे प्रवासी किरकोळ प्रवास करू शकतात मात्र नेहमीसारखे साईभक्तांनी गर्दीने गजबजलेले हे बसस्थानक सध्यातरी श्री साईं चे मंदिर उघडेपर्यंत तसे गजबजलेले दिसणार नसल्याचे शिर्डीकर बोलत आहेत.

कोपरगाव प्रतिनिधी- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन सुरू असून शिर्डीत श्री साईबाबा मंदिर साई संस्थान ने  दर्शनासाठी बंद केले आहे, तसेच काही कामगारांना सुट्ट्या देण्यात आले आहेत, या लॉकडाउनच्या दोन महिन्याच्या कालावधीत, मार्च महिन्यापासून कामगारांना पगार नव्हते .गेल्या काही दिवसातच कायम कामगारांना पगार देण्यात आले मात्र आऊटसोर्सिंग कामगारांना पगार नाहीत .असे असताना श्री साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन शिर्डी जवळील रुई शिवारात जमीन खरेदी केली आहे ,जर लॉकडाउनच्या दरम्यान साईबाबा संस्थानला देणगी रूपात येणारे उत्पन्न कमी झाले आहे व कामगारांचा पगार एफडी मोडून करावा लागत आहे तर मग या लॉक डाऊन च्या काळात साईबाबा संस्थानने मोठी रक्कम देऊन जमीन खरेदीचा आटापिटा का केला। असा सवाल कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी केला आहे.
 संजय काळे यांनी म्हटले आहे की  श्री साईबाबा संस्थाननै 17 मार्च दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले आहे, त्यामुळे येथे साईभक्त येणे व रोख देणगीचे प्रमाणही ही पूर्ण बंद झाल्या असून ऑनलाईन देणगी थोड्याफार प्रमाणात मिळत आहे, याचे कारण दाखवून साई संस्थानने आपली एफडी मोडून गेल्या दोन महिन्यात चा पगार गेल्या काही दिवसात कायम कामगारांना दिला आहे, अजून आऊटसोर्सिंग कामगार बाकी आहेत ,असे असताना ,देणगी कमी असताना साई संस्थानने रुई शिवारातील दर्यानानी यांची जमीन यापूर्वी देऊ केलेली असतानाही त्यांनी खरेदी केली नाही, त्यांनी काही जमीन देणगीदाखल दिली असून काही जमीन खरेदी करण्यासाठी संस्थांनला शासनाने परवानगी दिली होती, मात्रसन 2018 पासून ही जमीन संस्थांनी खरेदी केली नाही ,मात्र लॉकडाउनच्या दरम्यान ही जमीन खरेदी करण्यात आली, जमीन खरेदी करताना किंवा कोणताही व्यवहार करताना उच्च न्यायालयाची  संस्थांनला परवानगी।घ्यावी लागते, साई संस्थानने संस्थांनच्या कामगारांचा 40% पगार कपात करण्याचे निर्णय घेतला आहे ,तसेच तिरुपतीच्या धर्तीवर कामगार कपात करण्याचे धोरण अवलंबले आहे, मात्र उच्च न्यायालयाची त्यासाठी परवानगी नाही ,उच्च न्यायालय म्हणते पगार द्या आणि संस्थान उलट पगार कपात करीत आहे ,हा उच्च न्यायालयाचा अपमान आहे, उच्च न्यायालयात त्यासंबंधी कोणताही अर्ज दाखल झालेला नाही, त्यामुळे संस्थान उच्च न्यायालयाचा अपमान करीत असल्याचे स्पष्ट होत आहे, जर या खरेदी केलेल्या जमिनीपासून एक हजार फुटावर असणाऱ्या तुरकणे यांची जमीन लोकडाउन अगोदर सहा महिने पूर्वी आता संस्थांननी घेतलेल्या खरेदी भावाच्या निम्म्या पटीने विकली जाती , मात्र संस्थानलॉकडाउन काळात गरज नसताना डबल पैसे देऊन सुमारे १४ कोटी ला ही जमीन खरेदी करते, एवढा आटापिटा कशासाठी संस्थान करत आहे ,शिवाय कामगारांना पगार देण्यासाठी एफडी मोडुन पगार।करावा लागतो, कामगारांचा 40% पगार  कपात करावा लागतो तर मग जमीन खरेदी करण्याची सध्यातरी आवश्यकता काय होती।। असा सवाल करत हा उच्च न्यायालयाचा तात्पुरते नेमलेल्या विश्वस्तांनी जणू अपमानच केला असल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याने या गोष्टीचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी  या सर्व गोष्टींची उच्च न्यायालयाने चौकशी करावी तसेच विधी व न्याय खात्याने ही चौकशी  करावी अशी मागणी संजय काळे यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget