कोरोना वॉरियर्स असणाऱ्या कोतवालांनाही विमा संरक्षण व प्रोत्साहन भत्ता देण्याची गरज।

शिर्डी (राजेंद्र गडकरी )-राज्यात महसूल खात्याला गाव पातळीवर सर्वाधिक मदत करणारा कोतवाल असताना कोतवालांना ढोबळमानाने साडेसात हजार रुपये ते पंधरा हजार रुपये पगार दिला जातो. आजच्या महागाईच्या युगात हा तुटपुंजा पगार कोतवालांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अपुरा पडत आहे त्यामुळे कोतवालांची मोठी अडचण निर्माण होत आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमी वर लॉक डाऊन करण्यात आला होता, या लॉकं डाउन काळात प्रत्येक गावातील कामगार तलाठ्यांना मोठी मदत करण्याचे काम कोतवालांनी अहोरात्र केले होते, आपला जीव धोक्यात घालून ग्राउंड लेव्हल ला कोतवाल काम करत आहेत, त्यांचा शासनाने सध्या तरी विचार करणे गरजेचे आहे,
राज्यात, जिल्ह्यात व गावागावात महसूल खात्याकडून कामगार तलाठी यांच्यामार्फत सर्व आदेशांची अंमलबजावणी, नोटिसा देणे, गावातील व्यक्तींना बोलावून आणणे, दुर्घटना अथवा पिकांचा पंचनामा करताना मदत करणे इत्यादी अनेक प्रकारची कामे कोतवालांना करावी  लागतात.सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोतवालांना ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर इत्यादीं सोबत कार्य करावे लागत आहे. गाव पातळीवर स्थापन केलेल्या कोरोना ग्राम सुरक्षा समितीमध्ये तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच इत्यादींच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी कोतवाल ही व्यक्ती उपयुक्त ठरते. कोरोनाच्या सर्व धोक्याविरुद्ध कोतवाल सध्या गाव पातळीवर प्रामाणिकपणे लढत आहे. कोतवाल सुद्धा इतरांप्रमाणेच कोरन वॉरियर्स आहेत, ते जनतेला कोरोना पासून वाचविण्यासाठी पराकाष्ठेचे परिश्रम निमुटपणे घेत आहे. मात्र कोतवालांना कोरोना विरुद्ध लढताना विम्याचे  संरक्षण  देण्यात आलेले नाही, त्याच प्रमाणे गाव पातळीवरील इतर कर्मचार्‍यांप्रमाणे कोतवालांना प्रोत्साहनपर भत्ता सुद्धा देण्यात आलेला नाही. ही बाब अन्यायकारक आहे. तसेच कोतवालांचे मनोधैर्य खच्ची करण्यासारखी आहे.
यासाठी कोतवालांना सुद्धा इतर कर्मचार्‍यांप्रमाणे विम्याचे संरक्षण देऊन प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, लॉकडाउनकाळातील त्यांच्या या  कामगिरीचाही शासनाने कुठेतरी विचार करावा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे राज्य सचिव अशोक सब्बन, भारतीय जनसंसदचे जिल्हा सरचिटणीस कैलास पठारे, युवा आघाडी प्रमुख अशोक ढगे, विर बहादुर प्रजापती, डॉ.प्रशांत शिंदे, भगवान जगताप, बबलू खोसला, इक्बाल भाई, अशोक बापू कोकाटे, कैलास खांदवे, गणेश इंगळे व भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे यांनी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्याकडे केली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget