Latest Post

बुलडाणा - 2 मे - बुलडाणा जिल्हा अन्तर्गतच्या जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगांव काळे या गावात ग्राम पंचायतच्या वतीने नाली बांधकामा साठी खोदण्यात आलेल्या एका खड्यात 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 4-5 साप काही युवकांना दिसून आले त्यांनी ते मारून टाकले थोड्या वेळात पुन्हा त्या खड्यात अजुन साप दिसले असता काही लोकांनी त्या खड्यातील जमीन खोदली असता 30 ते 40 साप बाहेर निघाले.1 मे ला सायंकाळ पर्यंत त्या खड्यातुन 132 च्या जवळ साप निघाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालेली होती.भीतीपोटी गावकऱ्यांनी सर्व साप मारून टाकले.तर साप निघण्याचा सत्र सुरु असल्याची माहिती त्या गावातील नागरिकांनी दिली आहे.गावात एकही सर्पमित्र नसल्याने हे साप विषारी की बिनविषारी हे स्पष्ट झाले नाही परंतु मृत सापांचे फोटो पाहुन काही सर्प मित्रांनी हे साप पानदिवड जातीचे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.तर ही घटना समोर आल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करने अपेक्षित आहे.
कोब्रा,पानदिवड व कवड्या या 3 जातीचे आहे साप!सर्पमित्र रसाळ
बुलडाणा येथील सर्प मित्र एस. बी.रसाळ यांना पिंपळगांव काळे येथील घटनीची माहिती मिळताच त्यांनी आपली वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे सदस्य जळगाव जा. चे सर्प मित्र शरद जाधव व भगत सर यांना आज सकाळी पिंपळगांव काळे रवाना केले. या दोघे सर्प मित्रांनी घटनास्थळी जावून सर्व बारकाइने पाहणी केली असता मृत सापां मध्ये अतिविषारी कोब्राचे पिल्ले तसेच बिनविषारी पानदिवड व बिनविषारी कवड्या प्रजातिचा एक साप दिसून आला.एकंदरीत त्या ठिकाणी 3 जातीचे साप आढळूण आले तसेच कोब्रा नागचे पिल्लू लहान असल्याने नर-मादी कोब्रा त्याच परिसरात असल्याची शक्यता ही सर्पमित्र रसाळ यांनी व्यक्त करत म्हणाले की काही काळ अगोदर या गावातून नागरिकांची सूचनेवर आमच्या सर्प मित्रांनी अजगर पकडून नेला होता त्याच प्रमाणे गावातील नागरिकांनी या घटनेची सुद्धा माहिती आमच्या जळगाव जा.च्या सर्प मित्रांना वेळेवर दिली असती तर आज या सर्व सापांचे जीव वाचले असते,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रकरणाची चौकशी करणार!आरएफओ खान
जळगांव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या पिंपळगांव काळे या गावात नाली बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात मोठ्या संख्येत साप निघाले होते.भीतिपायी नागरिकांनी सर्व सापांना मारून टाकले आहे.या घटनीची माहिती मिळाल्यानंतर आमचे वन कर्मचारी गावात रवाना करण्यात आले आहे,चौकशी करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जळगाँव जा. वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांनी दिली आहे.

शिर्डी( राजेंद्र गडकरी ) -कोरोणामुळे सर्वत्रलॉकडाऊन सुरू आहे ,संचारबंदी जारी आहे, त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या घरात आहेत ,बाहेर फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे, त्यामुळे राज्यात ,जिल्ह्यात अचानक लॉकडाऊन लागल्यामुळे अनेकजण गुंतून पडले आहेत , अनेक जण पायी शेकडो किलोमीटर प्रवास करत आहेत, अशा लोकांना आपापल्या घरी ,आपापल्या जिल्ह्यात, राज्यात जाता यावे म्हणून कालच केंद्रीय गृहमंत्रालयाने अटी व शर्ती ठेवून अशा लोकांना आपापल्या जिल्ह्यात ,राज्यात जाण्यासाठी परवानगी दिली असल्याने आता अशा लोकांमधून आनंद समाधान निर्माण झाले आहे, मात्र अशा बाहेरच्या व्यक्तींना आपापल्या घरी जाण्यासाठी ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा दाखला घेणे क्रमप्राप्त आहे, असा दाखला घेण्यासाठी शिर्डीत आज मोठी गर्दी झाली होती, लॉक डाऊनच्या काळात शिर्डीत अडकलेल्या अनेक बाहेरचे जिल्ह्यातील, राज्यातील कामगार, साईभक्त, नागरिक अडकून पडले होते, अशा लोकांना आता आपापल्या घरी, आपल्या जिल्ह्यात राज्यात जाता येणार असून त्यासाठी हे लोक शिर्डी नगरपंचायत मध्ये दाखला घेण्यासाठी गर्दी करत होते ,मात्र यावेळी सोशल डिस्टन्स व मास्क या नियमाचे उल्लंघन झालेले दिसून येत होते,कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशात लॉक डाऊन सुरू आहे, 22 मार्च रोजी जनता कर्फ्यू झाल्यानंतर 25 मार्चपासून लॉक डाऊन सुरू करण्यात आला ,14 एप्रिलला लॉक डाऊन संपल्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला, तीन मे पर्यंत तो सुरू आहे, त्यानंतर हा लॉक डाऊन वाढतो की काय अशी नागरिकांमध्ये शंका आहे, मात्र या लॉकडाऊन मुळे शिर्डी व परिसरात अनेक बाहेरच्या जिल्ह्यातील ,राज्यातील पोटापाण्यासाठी येथे आलेले मजूर, कामगार ,साई भक्त असे अनेक जण शिर्डीत अडकून पडले होते ,शासनाने त्यांची भोजन व निवासाची व्यवस्था व्यवस्थित केली होती, मात्र अनेक दिवस झाल्यानंतर आपापल्या घरी जाण्याची प्रत्येकाला ओढ होती ,महाराष्ट्रातून अनेक जण मुंबई पुण्यातून बिहार ,उत्तर प्रदेश मध्ये इतर राज्यात वेगवेगळ्या मार्गाने कोणी सायकलवर ,कोणी मोटरसायकलवर,विविध प्रकारे, कोणी पायी जातानाचे चित्र अनेकदा दिसत होते ,अशा बाहेरच्या लोकांचे हाल होत असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने कालच आदेश काढून अशा लोकांना काही अटी व शर्ती वर आपापल्या राज्यात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यानुसार शिर्डी व परिसरात असणाऱ्या बाहेरच्या जिल्ह्यातील, राज्यातील लोकांना मजूर कामगार ,साईभक्त यांना शिर्डीच्या नगरपंचायत मधून दाखला घ्यावा लागणार आहे ,तसे राहत्या चे  तहसीलदार कुंदन हिरे यांनी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, ग्रामसेवक कामगार तलाठी ,न,पं,मुख्याधिकारी मंडलाधिकारी ,यांना तसे आदेश दिले आहेत खात्री करून अशा व्यक्तींना त्या-त्या ग्रामपंचायत, नगरपंचायत चा दाखला देण्यात येणार आहे व त्यांची नावे जिल्हाधिकारी अहमदनगर कार्यालयात पाठविण्यात येणार असून तेथून मग पुढील निर्णय होणार आहे ,आपल्या जिल्ह्यात राज्यात गेल्यानंतर या लोकांना तपासणी करून 14 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे, आपापल्या घरी जिल्ह्यात, राज्यात जाण्यासाठी शिर्डीत मोठ्या संख्येने लोक नगरपंचायत कार्यालयासमोर जमा झाले होते, मात्र या ठिकाणी अनेक जणानां मास्क नव्हते, सोशल डिस्टन्स चा फज्जा उडाला होता, असे होऊ नये यासाठी नगरपंचायत दक्षता घेणे गरजेचेआहे, असे शिर्डीकर बोलत होते, तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील राज्यातील लोकांनी आपापल्या घरी जाताना लोकांचे नियम पाळणे महत्त्वाचे आहे सोशल डिस्टन्स मास्क या गोष्टी पाळणे महत्त्वाचे असून अन्यथा त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल त्यामुळे कोणीही नियमाचे उल्लंघन करू नये असे राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले,
राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांनी

एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देत त्यांनी तालुक्यातील प्रत्येक नागरिकांनी लॉक डाऊन  चे नियम पाळावेत ,आपल्या घरात रहावे, कुणी विनाकारण बाहेर फिरू नये, सोशल डिस्टंन्स व मास्क तसेच सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करत सुरक्षित रहा घरात राहा ,आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळा, असे यावेळी बिंदास न्यूज शी बोलताना सांगितले,

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) समस्त मानव जातीवर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट आले असून या आणीबाणीच्या स्थितीतही महाराष्ट्र पोलीस जीवाची पर्वा न करता कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम करीत आहेत. जनतेच्या रक्षणासाठी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी रात्रंदिवस राबून पोलिस प्रशासन करीत आहे . या संसर्गाचा धोका ओळखून ही प्रत्येकजण राबत आहे. पोलिसांमध्ये सुद्धा सहृदय माणूस असतो याची उदाहरणे या निमित्ताने राज्यभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळाली .हे अस्मानी संकट असून यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करूया त्याचबरोबर पोलिस प्रशासनाकडून  मिळणाऱ्या  आदेशाचेही पालन करून पोलिसांना सहकार्य करू या असे प्रतिपादन मुफ्ती मोहम्मद रिजवानुल हसन साहब यांनी केले .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन मध्ये ठीक ठिकाणी आपले कर्तव्य अहोरात्र पार पाडणाऱ्या पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना उम्मती फाउंडेशन' चे अध्यक्ष सोहेल बारुदवाला यांचेतर्फे सॅनिटायझर, मास्क व अल्पोपहाराचे वाटप मौलाना आझाद चौक तसेच बेलापूर रोडवरील चौकात करण्यात आले .त्या प्रसंगी मुफ्ती रिजवान यांनी आपले विचार व्यक्त केले .
श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व मुफ्ती रिजवान साहब यांच्या मार्गदर्शना ज्येष्ठ नगरसेवक मुजफ्फर शेख, पत्रकार सलीमखान पठाण, हाजी जलीलभाई काझी यांच्या हस्ते सर्व पोलिसांना हे साहित्य वितरण करण्यात आले. जनतेच्या सुरक्षेसाठी कर्तव्य बजावत असताना पोलिसांनी स्वतःच्या सुरक्षेच्यादृष्टीनेही योग्य ती दक्षता घ्यावी, अशा सूचना यावेळी उपस्थितांनी केल्या. समाजाचा व प्रशासकीय यंत्रणेतील महत्त्वाचा घटक हा पोलीस आहे. त्यांनी स्वत:चे आरोग्य सांभाळून इतरांच्या आरोग्यासाठी ही लढाई लढायची आहे. याकरिता प्रत्येकाने योग्य ती दक्षता घ्यावी. असे आवाहन ही मुफ्ती रिजवान साहब यांनी केले . हेड कांस्टेबल जोसेफ साळवे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांचा यावेळी उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला .
सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उंमती फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बारूदवाला,डॉक्टर तोफिक शेख, फिरोज पठाण, युसुफ लाखानी,शाकीब पठाण, वसीम जहागिरदार, निरज शाह, माजिद मिर्झा, अलीम बागवान, शाहरुख बागवान, मोहसिन बागवान आदींनी विशेष परिश्रम घेतले .

शिर्डी  (जय शर्मा )
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रयत संकुलातील एस.के. सोमैय्या प्राथमिक विद्या मंदिर या विद्यालयातील कु ,स्वानंदी सिद्धार्थ कोबरणे हिने जानेवारी २०२०मध्ये झालेल्या राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे.तिने एकूण २६६ गुण मिळवून श्रीरामपूर तालुक्यात ७वी, जिल्ह्यात 16 वी, तर राज्यात 18 वी  आलेली आहे. या परीक्षेला राज्यातून हजारोच्या संख्येने विद्यार्थी बसतात अश्या विद्यार्थ्यांमधून कुमारी स्वानंदी येणे राज्यात18वा क्रमांक मिळवला असून तिच्या या यशाबद्दल रयतच्या मॅनेजिंग कौसिल सदस्या श्रीमती मीनाताई जगधने, मुख्याध्यापक  श्री.दवंडे सर, मार्गदर्शक शिक्षिका  , श्रीमती चेडे मॅडम व शिक्षण प्रेमींनी, कौतुक केले आहे.

शिर्डी( राजेंद्र गडकरी)
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे,
  दरवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्र राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पोलिस महासंचालक पदक देऊन महाराष्ट्र दिनी एक मेला गौरविण्यात येत असते, यावर्षी सुद्धा राज्यातील चांगली कामगिरी करणाऱ्या व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या आठशे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक एस ,के ,जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात सर्व जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी, अधिकारी यांच्या कामगिरीचा आढावा घेतला जातो ,त्यावरून राज्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी, सर्वजण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतातच, मात्र यामध्येही अधिक चांगले काम व उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी ,कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक देऊन गौरविण्यात येते व राज्यातील पोलिस अधिकारी ,कर्मचाऱ्यांचा उत्साह, जोश त्यामुळे वाढवण्याचा प्रयत्न होत असतो, सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, अहोरात्र परिश्रम घेत आहेत ,अशा सर्व पोलिसांचे सर्वत्र राज्यभरातून ,देशातून अभिनंदन होत आहे ,अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन आला आहे, एक मे या महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्यात पोलिस महासंचालक पदके जाहीर होत असतात, त्याप्रमाणे ती नुकतीच जाहीर झाली आहे, राज्यातील एकूण 800 पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदे जाहीर करण्यात आली आहेत, त्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील अकरा पोलीस कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक फौजदार काशीनाथ तुकाराम खराडे ,सहाय्यक फौजदार राजेंद्र सुपेकर, सहाय्यक फौजदार मधुकर शिंदे, सहाय्यक फौजदार अनिल गाडेकर, सहाय्यक फौजदार रवींद्र कुलकर्णी, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश उपासनी, पोलीस हेडकॉन्स्टेबल मन्सूर सय्यद ,पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास सोनार, सहाय्यक फौजदार अर्जुन बडे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पठारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल तुकाराम सोनवणे आदीना पोलीस महासंचालक पदके जाहीर झाली आहेत, या सर्वांचे राज्याचे पोलिस महासंचालक एस,के जयस्वाल, तसेच नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अखीलेशकुमार सिंह व सर्व जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.

शिर्डी (जितेश लोकचंदानी) कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,मात्र शिर्डीत फळ व भाजीपाला विक्रेते यांच्याकडून लॉकडाऊनचा नियमाचा फज्जा उडत असून सोशल डिस्टंन्स न पाळता मास्क न   लावता येथे भाजीपाला विकला जातो ,शिर्डी नगरपंचायत या फळ व भाजी विक्री वाल्यांकडून चिरीमिरी घेते की काय ।।अशी शंका शिर्डीकरांना येत आहे, मॉर्निंग वॉक करणारेवर कारवाई होते, मग भाजीपाला ,फळ विक्रेते लॉकडाऊनअसतानाही  व सोशल डिस्टेंस पाळत नाही व बिगर परवानगी ने विक्री करणाऱ्यावर  नगरपंचायत इतकी मेहरबान का। असा सवाल करत आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाजसेवक तथा  औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश शेजवळ कारवाईची मागणी केली आहे  देशभरात  कोरोणा मुळे लॉकडाऊन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीत ही लॉकडाऊन चे नियम लागू झाले नगरपंचायतने ही शहरात किराणा दुकान, दूध ,व्यवसाय, भाजीपाला फ्रूट ,व्यवसाय यांना वेळ ठरवून दिले व भाजीपाला फ्रूट साठी ठराविक ठिकाणी ,ठराविक वेळेत विक्री करण्यासाठी जागा फिक्स करून दिल्या ,प्रत्येक  वार्डात दोन किंवा तीन विक्रेते बसण्या साठी परवानगी देण्यात आली, परंतु आज प्रत्येक वार्डात दहा ते पंधरा भाजीपाला व फळ विक्रेते आहेत ,जर प्रत्येक वार्डात दोन ते तीन लोकांना फळ व भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे, तर हे बाकीच्या लोकांना नगर पंचायत का पाठीशी घालते का। त्यांचावर कारवाई होत नाही, ह्या मागे काही आर्थिक व्यवहार तर नाही ना ।अशी शंका अड,अविनाश शेजवळ यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले ,ह्या प्रकरणी तहसीलदार कुंदन हिरे यांना कारवाई  करण्यास अर्ज देणार असून ह्या प्रकरणी तहसीलदार यांनी तपास करून योग्य ती कारवाई करावी असे आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाज सेवक तथा  औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश बिंदास न्यूज ला दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बाहेरगावहून आलेल्या 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.श्रीरामपूर शहर व तालुका अद्यापही सुरक्षित आहे. मात्र, आता यापुढे बाहेरचा कोणी येता कामा नये. त्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची नावे कळवावी असे आवाहन करतानाच कोणी बाहेरगावहून आलेल्यांची माहिती लपविल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या त्यांनी केलेल्या आवाहनाचा मोठा परिणाम काल दिसून आला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी शहर व तालुक्यातून लोक बाहेरगावहून आलेल्यांची माहिती कळवत असल्याचे सांगितले. याबाबत शिंदे यांनी सांगितले की, कारेगाव येथे 4 मजूर हे बारामतीहून आले होते. त्यांच्याबाबत गावातून फोन आल्यानंतर तातडीने तेथे जावून या चारही मजुरांना होम क्वॉरंटाईन केले. त्यानंतर नोकरीसाठी पुण्याला असणारे तिघे जण लाडगाव येथे पुण्याहून आल्याचे समजताच या तिघांनाही त्यांच्याघरी होम क्वारंटाईन करण्यात आले.याशिवाय हरेगाव येथील एकवाडी येथे दोन जण नगरहून आल्याची माहिती कळविण्यात आली. त्यांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सावता रोडवर व्यापारानिमित्त रत्नागिरीला गेलेले दोघेजण श्रीरामपुरात आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितल्यानंतर त्यांना घरी जावून होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तसेच बोरावके कॉलेजजवळ अतिथी कॉलनीत एकजण पुण्याहून आल्याचे सांगण्यात आल्यानंतर सदर व्यक्तीलाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले.इराणी गल्लीत एका कुटूंबात 3 जण नगरहून आल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी आरोग्य खात्याचे पथक जावून त्या तिघांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, नगरपालिकेचे डॉ. पर्हे, डॉ. मुंदडा, सहाय्यक पंडित, सुपरवायझर गायकवाड, गोजे, श्रीकांत कदम आणि ज्या पथकाने काल मध्यरात्रीपर्यंत शहर व तालुक्यात क्वॉरंटाईन करण्याचे काम केले. अजून काही तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुक्यात एकही रुग्ण नाही एक परप्रांतीय व तालुक्यातील वडाळा येथील एक वृद्ध महिला संशयित आढळल्याने त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुका व परिसरात एकही करोनचा रुग्ण नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget