श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बाहेरगावहून आलेल्या 15 जणांना होम क्वारंटाईन.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीरामपूर शहर व तालुक्यातील नागरिकांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यायला सुरुवात केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरासह तालुक्यात बाहेरगावहून आलेल्या 15 जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे.श्रीरामपूर शहर व तालुका अद्यापही सुरक्षित आहे. मात्र, आता यापुढे बाहेरचा कोणी येता कामा नये. त्यासाठी प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी बाहेरगावहून आलेल्या नागरिकांची नावे कळवावी असे आवाहन करतानाच कोणी बाहेरगावहून आलेल्यांची माहिती लपविल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला होता. या त्यांनी केलेल्या आवाहनाचा मोठा परिणाम काल दिसून आला.याबाबत तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे यांनी शहर व तालुक्यातून लोक बाहेरगावहून आलेल्यांची माहिती कळवत असल्याचे सांगितले. याबाबत शिंदे यांनी सांगितले की, कारेगाव येथे 4 मजूर हे बारामतीहून आले होते. त्यांच्याबाबत गावातून फोन आल्यानंतर तातडीने तेथे जावून या चारही मजुरांना होम क्वॉरंटाईन केले. त्यानंतर नोकरीसाठी पुण्याला असणारे तिघे जण लाडगाव येथे पुण्याहून आल्याचे समजताच या तिघांनाही त्यांच्याघरी होम क्वारंटाईन करण्यात आले.याशिवाय हरेगाव येथील एकवाडी येथे दोन जण नगरहून आल्याची माहिती कळविण्यात आली. त्यांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यानंतर शहरातील सावता रोडवर व्यापारानिमित्त रत्नागिरीला गेलेले दोघेजण श्रीरामपुरात आल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितल्यानंतर त्यांना घरी जावून होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तसेच बोरावके कॉलेजजवळ अतिथी कॉलनीत एकजण पुण्याहून आल्याचे सांगण्यात आल्यानंतर सदर व्यक्तीलाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले.इराणी गल्लीत एका कुटूंबात 3 जण नगरहून आल्याचे सांगण्यात आले. त्याठिकाणी आरोग्य खात्याचे पथक जावून त्या तिघांनाही होम क्वॉरंटाईन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, नगरपालिकेचे डॉ. पर्हे, डॉ. मुंदडा, सहाय्यक पंडित, सुपरवायझर गायकवाड, गोजे, श्रीकांत कदम आणि ज्या पथकाने काल मध्यरात्रीपर्यंत शहर व तालुक्यात क्वॉरंटाईन करण्याचे काम केले. अजून काही तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.तालुक्यात एकही रुग्ण नाही एक परप्रांतीय व तालुक्यातील वडाळा येथील एक वृद्ध महिला संशयित आढळल्याने त्यांच्या घशाचे स्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. परंतु त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे श्रीरामपूर तालुका व परिसरात एकही करोनचा रुग्ण नाही. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget