शिर्डी (जितेश लोकचंदानी) कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू आहे ,मात्र शिर्डीत फळ व भाजीपाला विक्रेते यांच्याकडून लॉकडाऊनचा नियमाचा फज्जा उडत असून सोशल डिस्टंन्स न पाळता मास्क न लावता येथे भाजीपाला विकला जातो ,शिर्डी नगरपंचायत या फळ व भाजी विक्री वाल्यांकडून चिरीमिरी घेते की काय ।।अशी शंका शिर्डीकरांना येत आहे, मॉर्निंग वॉक करणारेवर कारवाई होते, मग भाजीपाला ,फळ विक्रेते लॉकडाऊनअसतानाही व सोशल डिस्टेंस पाळत नाही व बिगर परवानगी ने विक्री करणाऱ्यावर नगरपंचायत इतकी मेहरबान का। असा सवाल करत आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाजसेवक तथा औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश शेजवळ कारवाईची मागणी केली आहे देशभरात कोरोणा मुळे लॉकडाऊन करण्यात आले, त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीत ही लॉकडाऊन चे नियम लागू झाले नगरपंचायतने ही शहरात किराणा दुकान, दूध ,व्यवसाय, भाजीपाला फ्रूट ,व्यवसाय यांना वेळ ठरवून दिले व भाजीपाला फ्रूट साठी ठराविक ठिकाणी ,ठराविक वेळेत विक्री करण्यासाठी जागा फिक्स करून दिल्या ,प्रत्येक वार्डात दोन किंवा तीन विक्रेते बसण्या साठी परवानगी देण्यात आली, परंतु आज प्रत्येक वार्डात दहा ते पंधरा भाजीपाला व फळ विक्रेते आहेत ,जर प्रत्येक वार्डात दोन ते तीन लोकांना फळ व भाजीपाला विकण्यास परवानगी दिली आहे, तर हे बाकीच्या लोकांना नगर पंचायत का पाठीशी घालते का। त्यांचावर कारवाई होत नाही, ह्या मागे काही आर्थिक व्यवहार तर नाही ना ।अशी शंका अड,अविनाश शेजवळ यांनी बिंदास न्यूज शी बोलतांना सांगितले ,ह्या प्रकरणी तहसीलदार कुंदन हिरे यांना कारवाई करण्यास अर्ज देणार असून ह्या प्रकरणी तहसीलदार यांनी तपास करून योग्य ती कारवाई करावी असे आर. टी. आय.चे कार्यकर्ते,समाज सेवक तथा औरंगाबाद खंडपीठातील ज्येष्ठ विधिज्ञ अड,अविनाश बिंदास न्यूज ला दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे,
Post a Comment