अबब...एका खड्यातुन निघाले 3 जातीचे 132 साप,नागरिकांनी सर्व सापांची केली हत्या.

बुलडाणा - 2 मे - बुलडाणा जिल्हा अन्तर्गतच्या जळगांव जामोद तालुक्यातील पिंपळगांव काळे या गावात ग्राम पंचायतच्या वतीने नाली बांधकामा साठी खोदण्यात आलेल्या एका खड्यात 30 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास 4-5 साप काही युवकांना दिसून आले त्यांनी ते मारून टाकले थोड्या वेळात पुन्हा त्या खड्यात अजुन साप दिसले असता काही लोकांनी त्या खड्यातील जमीन खोदली असता 30 ते 40 साप बाहेर निघाले.1 मे ला सायंकाळ पर्यंत त्या खड्यातुन 132 च्या जवळ साप निघाले असून नागरिकांमध्ये एकच खळबळ उडालेली होती.भीतीपोटी गावकऱ्यांनी सर्व साप मारून टाकले.तर साप निघण्याचा सत्र सुरु असल्याची माहिती त्या गावातील नागरिकांनी दिली आहे.गावात एकही सर्पमित्र नसल्याने हे साप विषारी की बिनविषारी हे स्पष्ट झाले नाही परंतु मृत सापांचे फोटो पाहुन काही सर्प मित्रांनी हे साप पानदिवड जातीचे असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.तर ही घटना समोर आल्यानंतर वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करने अपेक्षित आहे.
कोब्रा,पानदिवड व कवड्या या 3 जातीचे आहे साप!सर्पमित्र रसाळ
बुलडाणा येथील सर्प मित्र एस. बी.रसाळ यांना पिंपळगांव काळे येथील घटनीची माहिती मिळताच त्यांनी आपली वन्यजीव संरक्षण व निसर्ग पर्यावरण संस्थेचे सदस्य जळगाव जा. चे सर्प मित्र शरद जाधव व भगत सर यांना आज सकाळी पिंपळगांव काळे रवाना केले. या दोघे सर्प मित्रांनी घटनास्थळी जावून सर्व बारकाइने पाहणी केली असता मृत सापां मध्ये अतिविषारी कोब्राचे पिल्ले तसेच बिनविषारी पानदिवड व बिनविषारी कवड्या प्रजातिचा एक साप दिसून आला.एकंदरीत त्या ठिकाणी 3 जातीचे साप आढळूण आले तसेच कोब्रा नागचे पिल्लू लहान असल्याने नर-मादी कोब्रा त्याच परिसरात असल्याची शक्यता ही सर्पमित्र रसाळ यांनी व्यक्त करत म्हणाले की काही काळ अगोदर या गावातून नागरिकांची सूचनेवर आमच्या सर्प मित्रांनी अजगर पकडून नेला होता त्याच प्रमाणे गावातील नागरिकांनी या घटनेची सुद्धा माहिती आमच्या जळगाव जा.च्या सर्प मित्रांना वेळेवर दिली असती तर आज या सर्व सापांचे जीव वाचले असते,अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
प्रकरणाची चौकशी करणार!आरएफओ खान
जळगांव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या पिंपळगांव काळे या गावात नाली बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्यात मोठ्या संख्येत साप निघाले होते.भीतिपायी नागरिकांनी सर्व सापांना मारून टाकले आहे.या घटनीची माहिती मिळाल्यानंतर आमचे वन कर्मचारी गावात रवाना करण्यात आले आहे,चौकशी करून योग्य निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जळगाँव जा. वनपरिक्षेत्र अधिकारी खान यांनी दिली आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget