शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) विनाकारण बाहेर फिरणे गुन्हाआहे, तरी शिर्डीतील काही लोक रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने फिरण्यासाठी आपल्या घराबाहेर पडतात , त्यामुळे नियमाचे उल्लंघन होत असते, कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे, फिरण्यास परवानगी नसताना शिर्डीतील उपनगरात अनेक लोक, महिला, रात्री जेवण झाल्यानंतर शतपावलीच्या निमित्ताने आपल्या घराबाहेर पडतात व उपनगरातील रस्त्यांवर आपापसात गप्पा मारत फिरत असतात, सोशल डिंस्टन्स पाळत नाहीत ,मास्क वापरत नाहीत, रात्री आठ नंतर शिर्डी नगरपंचायतचे कर्मचारी, पोलीस , उपनगरांमध्ये किंवा रस्त्यांवर नसतात ,त्याचा फायदा नागरिक घेत आहेत, संचारबंदीचे नियम पायदळी तुडवले जात आहे, पोलिसांकडून सकाळी मॉर्निंगवॉक करणाऱ्या लोकांवर कारवाई होते, रात्री जेवणानंतर शतपावली करणार्यांवर कारवाई का होत नाही, रात्री आठ ते अकरा या वेळेत उपनगरातील स्ट्रीटलाईट नगरपंचायतीने बंद ठेवाव्यात, त्यामुळे तरी अंधार झाल्याने कोणी फिरणार नाही.
Post a Comment