Latest Post

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहरांमध्ये शहर पोलिस व नगरपालिका प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांची कठोर अंमलबजावणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून मास्क न लावता गाडी चालवणारे आमदार लहू कानडे यांच्या ड्रायव्हरला सुद्धा दंड आकारून त्याच्याकडून पाचशे रुपयाची वसुली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी केली .
 पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन संयुक्तपणे शहरांमध्ये जनतेच्या आरोग्याची काळजी घेत आहेत . दररोज सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्या मास्क न लावणाऱ्या व रस्त्यावर थुंकणाऱ्या गावकऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे . यासाठी नगरपालिकेने चार टीम तयार केल्या आहेत . सकाळच्या सत्रात सध्या हे काम सुरू असून दिवसभर हे काम करण्यात यावे अशी मागणी जनतेतून केली जात आहे .
 शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यअधिकारी प्रकाश जाधव, आरोग्य अधिकारी आरणे,पालिकेचे कर्मचारी व पोलिस अशा दोन्ही यंत्रणा चांगल्या प्रकारे काम करीत आहेत . राज्यांमध्ये सर्वत्र कोरोनाचे थैमान सुरू असताना स्थानिक अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट नियोजन करून शहरांमध्ये कुठेही पेशंट आढळणार नाही यासाठी पुरेपूर काळजी घेतली जात आहे . सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊन मध्ये शितिलथा देण्यात येणार असल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही यासाठी पोलीस व पालिका प्रशासनाने शहरांमध्ये येणाऱ्या लोकांची नाकेबंदी करावी . नवीन लोकांना शहरात येऊ देऊ नये . सबळ कारण असल्याशिवाय कोणालाही जाण्या-येण्याची परवानगी देऊ नये . अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.
शहरांमध्ये सध्या रमजान महिना सुरू असून वार्ड नंबर 2 मध्ये संध्याकाळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसून येतात . काल सायंकाळी पोलिसांनी वॉर्ड नंबर दोन, मिल्लत नगर या भागामध्ये गस्त घालून बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरात जाण्याचे आवाहन केले . मात्र पोलिस पुढे गेल्यानंतर मागे लोक बाहेर येतात . त्यासाठी शहर पोलिसांनी वार्ड नंबर दोनमध्ये चौका चौकांमध्ये पॉइंट तयार करून रमजान ईद होईपर्यंत तेथे लक्ष द्यावे तसेच लोकांनी बाहेर न येण्याची काळजी घ्यावी व आपले रक्षण आपणच करावे असे आवाहनही ज्येष्ठ लोकांनी केले आहे . शहर पोलीस रात्रंदिवस एक करून शहरांमध्ये गस्त घालत असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवीत आहेत. त्याबद्दल शहर पोलिसांच्या कामगिरीचे सुद्धा समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

 शिर्डी  (जय शर्मा)
 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू असून शिर्डीतही सर्व बंद आहे ,अत्यावश्यक सेवा जरी सुरू असल्या तरी लॉकडाऊनचे नियम पाळणे बंधनकारक असताना शिर्डीत मात्र भाजीपाला दुकानांमध्ये सोशल डिस्टंन्सचा फज्जा उडतआहे, सर्व नियम पायदळी तुडवली जात आहेत, मात्र नगरपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे,
शिर्डीत इतर सर्व दुकाने बंद आहेत, अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाल्याचे दुकाने, मेडिकल, किराणा दुकाने  मसाल्याची दुकाने सुरू आहेत,
मात्र येथे मसाला दळण्यासाठी सध्या महिलांची गर्दी होत असून येथे सोशल डिस्टंन्स पाळला जात नाही ,पिठाच्या गिरणी वर दळण्यासाठी जाणाऱ्या महिला सोशल डिस्टंन्स पाळत नाहीत मात्र याकडे कोणाचे लक्ष नाही, भाजीपाला घेण्यासाठी गर्दी होते ,सामाजिक दुरीचे भान ठेवलं जात नाही, शिर्डीतील श्रीरामनगर येथील महाराणा प्रताप चौकात अनेक भाजीपाला विक्रेते व ग्राहक यांच्या तोंडाला मास्क नसते , सर्व नियम पायदळी तुडवून लोक भाजीपाला घेण्यासाठी गर्दी करतात, शिर्डीत श्रीसाई कृपेने व परिसरात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण नाही, मात्र अशी परिस्थिती राहिली तर दुर्दैवाने कोरोनाचा संसर्ग होण्यास वेळ लागणार नाही, असे होऊ नये म्हणून नगरपंचायतीने अशा लॉकडाऊन चे नियम मोडणाऱ्या भाजीपाला विक्रेते व ग्राहकांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यावर कारवाई होते ,शहरात फिरणाऱ्यांवर कारवाई होते, मग भाजीपाला तसेच किराणा दुकानदार व मसाला व पिठाच्या दळणाच्या गिरणीवर  नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावंर कारवाई होण्याची गरज आहे, मात्र तसे होताना दिसत नाही, त्यामुळे शिर्डी नगरपंचायत ,पोलीस यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अशा ठिकाणी विशेष पथकाच्या साहाय्याने कारवाई करणे गरजेचे आहे असे  शिर्डीकर बोलत आहेत.

शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र गडकरी )  श्री साईबाबामुळे अांतरराष्ट्रीय क्षेत्र असणाऱ्या व देशात स्वच्छ सुंदर शहराचा दुसरे बक्षीस मिळवून मान मिळवणाऱ्या शिर्डीतील उपनगरात नगरपंचायतीने लावलेल्या रस्त्याच्या दुभाजकातील झाडे पाण्याअभावी जळून जात असून नगरपालिकेचे पाणी नेमकी कुठे मुरते। असा प्रश्न शिर्डीकर करत आहेत, शिर्डी नगरपंचायतला करापोटी दर वर्षाला मोठी रक्कम जमा होत असते, या रकमेतून शिर्डीला स्वच्छ व  सुंदर  करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले जात आहेत, त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत, याच खर्चातून शिर्डी शहरातील उपनगरात रस्त्याच्या दुभाजकाला विविध वृक्षे लावण्यात आले आहेत नगर-मनमाड महामार्गच्या दुभाजकात वृक्षांना नगरपंचायत टँकरने पाणी देते तसेच सध्या लॉक डाऊन मुळे प्रदूषण नसल्याने ही वृक्षे हिरवीगार दिसत आहेत, मात्र उपनगरातील वृक्षांना पाणी नसल्यामुळे ते वाळून गेलेले आहेत, नगरपालिका फक्त नगर-मनमाड रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या वृक्षांना पाणी देते व नागरिकांना नगरपंचायत खूप मोठे काम करत आहे असे भासवते, मात्र उपनगरातील झाडे पाण्याअभावी जळून जात आहेत तिकडे कोणाचे लक्ष नाही,  लाखो रुपयांचा खर्च वाया जात आहे,पाण्याच्या टँकरची फक्त बिले काढले जात असल्याचा आरोप करताना शिर्डीचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटणी  आरोप केले आहे

शिर्डी राजेंद्र गडकरी -देशात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे, अशा परिस्थितीत सर्वत्र बंद असून संचारबंदी जारी आहे ,अशा काळात महाराष्ट्र दिऩ आला असून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी  राहाता तालुक्यात कुठेही शासकीय-निमशासकीय शाळा ,महाविद्यालये याठिकाणी 1मे महाराष्ट्रदिनानिमित्त होणारा ध्वजारोहण कार्यक्रम करण्‍यात येणार नाही,,साध्या पद्धतीने यावर्षी महाराष्ट्र दिन साजरा होणार असल्याची माहिती राहता तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र बंद आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत एक मे हा महाराष्ट्र दिन आला असून शासकीय आदेशानुसार सर्वत्र हा दिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे, राहता तालुक्यातही 1मे महाराष्ट्र दिनी सर्व शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये, या ठिकाणी ध्वजारोहण होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी व कुठेही लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करू नये, विनाकारण फिरू नये, गर्दी करू नये, मास्क व सोशल डिस्टंन्स पाळावे, आपल्या घरातच राहावे, असे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे ,त्याच प्रमाणे राहता तालुक्यातील प्रत्येक गावात सरपंचांच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवर कोरोना ग्रामसुरक्षा कमिटी बनवण्यात येणार असून त्यामध्ये कामगार तलाठी, ग्रामसेवक, सदस्य राहणार असून पोलीस पाटील सदस्य सचिव राहणार आहेत, आपल्या गावात बाहेरील गावातून येणारे विद्यार्थी, कामगार पर्यटक,भाविक ,पाहुणे नातेवाईक, कोणीही असो त्यांची नोंद या समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे, बाहेरून आलेल्या पण परवानगी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला गावात प्रवेश देऊ नये, जर एखादी बाहेरील जिल्ह्यातील किंवा राज्यातील किंवा गावातील व्यक्ती आपल्या गावात येऊन राहत असेल तर त्या व्यक्तीची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करावी तसेच बाहेरील गावातून आलेल्या व्यक्तीचे चौदा दिवस विलगीकरण करणे महत्त्वाचे आहे, या सर्वांची नोंद कोरोना ग्राम सुरक्षा समितीने ठेवणे महत्त्वाचे आहे,प्रत्येक गावात अशा समित्या शासकीय परिपत्रकान्वे करणे आवश्यक आहे ,तरी सर्वांनी आपल्या गावात त्वरित कोरोना ग्रामसुरक्षा समिती स्थापन कराव्यात, असेही राहताचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी म्हटले आहे,

 (शिर्डी प्रतिनिधि  राजेंद्र गडकरी)
 सर्वत्र लॉकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र मद्य विक्रीचे दुकाने बंद आहेत ,तरीही जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या मद्य साठा, वाहतूक सुरू असल्याने राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात विविध ठिकाणी छापे टाकून एकूण 154 गुन्हे दाखल नोंद करून 52 लाख चार हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे 59 आरोपींना अटक केली असून अकरा वाहने जप्त करण्यात आली आहेत, तसेच जिल्ह्यातील नऊ मद्यविक्री दुकाने निलंबीत केली असून शिर्डीच्या आनंदबियर शॉपीवरही परवाना निलंबनाची कारवाई झाली आहे ,
 त्यामुळे शिर्डीत खळबळ उडाली आहे,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन सुरू असताना व सर्व बंद असताना तसेच जिल्ह्यात मध्य निर्मिती, वाहतूक व विक्री या कालावधीत बंद असताना, जिल्ह्यातील काही ठिकाणी, काही मद्यविक्री दुकानातून अवैधरित्या साठा करून मद्य विक्री केली जात होती ,अशा तक्रारी जिल्हा दारू उत्पादन शुल्क अधिकार्‍यांकडे आल्याने राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पराग नवलकर यांच्या नेतृत्वाखाली 24 मार्च ते 28 एप्रिल 20 20 या काळात या विभागाच्या अ विभाग व  ब विभाग तसेच श्रीरामपूर विभाग ,कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, अशा पाच विभागांमार्फत व दोन भरारी पथकामार्फत जिल्ह्यातील विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले, तसेच तक्रारी आलेल्या काही मद्यविक्री
दुकाने उघडून मद्यसाठा तपासण्यात आला, यावेळी अधिकाऱ्यांना मद्यसाठ्यात मोठी तफावत आढळली, त्यामुळे अशा हॉटेलंटवर कारवाई करण्यात आली, याविक्री दुकानांवर कारवाई करण्यात आली, त्यामध्ये श्रीरामपूर बेलापूर येथील हॉटेल गोल्डन चरीटर, हॉटेल गोविंदा गार्डन निमगाव जाळी, हॉटेल नेचर वडगाव पान, होटेल धनलक्ष्मी, देवळाली प्रवरा, हॉटेल उत्कर्ष सोनगाव सात्रळ, हॉटेल ईश्वर वडझिरे ,तालुका पारनेर, हॉटेल मंथन निघोज, पारनेर, याच बरोबर संगमनेरचे किरकोळ देशी दारू दुकान आणि शिर्डी जवळील निमगाव कोर्‍हाळे ययेथिल आनंद बिअर शॉपी याठिकाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून या सर्व नऊ मद्यविक्रीचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, शिर्डी येथील आनंद बिअर शॉपी च्यापाठीमागे बिअरचा सुमारे चोवीस लाख रुपये किमतीचा अवैध साठा सापडला होता, त्यामुळे या बिअरशॉपीवरहीपरवाना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे, तसेच या सर्व मद्यविक्री  दुकानाकडून 154 गुन्हे नोंद करत 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, एकूण 59 आरोपींना अटक केली असून 11 वाहने जप्त करण्यात आली आहेत, यापुढेही शासनाच्या अटी व नियमांचे पालन न करणाऱ्या मद्यविक्री केंद्रांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अहमदनगर अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे.

मालेगाव | प्रतिनिधी -मालेगावमध्ये करोनाचा कहर सुरूच आहे. सायंकाळी आलेल्या अहवालात एकूण ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर चिंता व्यक्त केली जात असतानाच मध्यरात्री प्राप्त झालेल्या दोन अहवालात जवळपास ४४ रुग्ण वाढल्यामुळे मालेगावची करोनाबाधित रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली होती. त्यानंतर पुन्हा २७ रुग्ण मालेगावात वाढले असून मालेगावी करोना बाधित रुग्णांचा आकडा आता २५३ वर पोहोचला आहे.मध्यरात्री मिळालेल्या अहवालात सहा पोलीस आढळून आल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा २७६  वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत अकरा रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.


बेलापूर ( प्रतिनिधी  )- कोरोनाच्या भितीपोटी घरातच बसा सुरक्षित रहा हा शासनाचा आदेश मानुन घरात बसलेल्या गोरगरीब परिवारासाठी लुक्कड परिवारा बरोबरच माहेश्वरी समाज तसेचअकबर टिन मेकरवाले  देखील पुढे सरसावले असुन  अडचणीत सापडलेल्या गोरगरीब जनतेसाठी हे देवदुतच ठरत आहे कोरोनामुळे लाँक डाऊन घोषित करण्यात आले या लाँक डाऊनमुळे दररोज कमाई करुन आपला चरितार्थ चालविणार्यांची दररोजच्या खाण्या पिण्याची पंचायत झाली हे लक्षात घेवुन सामाजिक कार्यात सतत अघाडीवर असणारे सुवालाल लुक्कड व लुक्कड परिवाराने अन्नछत्र चालु करण्याचा मनोदय व्यक्त केला बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांनी तातडीने तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क  साधला त्यांनी देखील  परिस्थीती लक्षात घेता नियमांचे काटेकोर पालन करुन
अन्नछत्र सुरु करण्यास अनुमती दिली अन बेलापूर गावात गोरगरीबासाठी सुरु झाले मोफत अन्नछत्र . लुक्कड परिवाराने स्वः खर्चातुन सुरु केलेल्या मोफत अन्न छत्रास मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावले . काहींनी वस्तू स्वरुपात तर काहींनी रोख स्वरुपात मदत केली . काही कार्यकर्त्यांनी सामाजिक वारसा जपत या कार्यात स्वतःला वाहुन घेतले . अन अनेक गोरगरीबांना मोठा आधार झाला . एक वेळच्या अन्नाची चिंता मिटली लाँक डाऊन मुळे पुशु पक्षाचेही हाल होत असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सुवालाल लुंक्कड यांच्या निदर्शनास आणुन दिले मग काय पक्षासाठीही अन्नाची व्यवस्था करण्यात आली.लुक्कड परिवाराने सुरु केलेले अन्नछत्र केवळ सकाळीच सुरु असते . त्यामुळे अनेक जण सायंकाळचे देखील पार्सल घरी नेत होते . या नागरीकांची सायंकाळची सोय होणे गरजेचे आहे हे लक्षात घेवुन माहेश्वरी समाज देखील पुढे सरसावला . त्यांनी संध्याकाळच्या भोजनाची व्यवस्था केली . गरम पोळ्या भाजी पिशवीत पँक करुन त्याचे वाटप सुरु करण्यात आले . या अन्नछत्रास देखील  मदत करण्यास अनेक हात पुढे सरसावत आहे .  मदत देणारे आपापल्या परीने गहु , भाजीपाला व रोख रकमेच्या स्वरुपात मदत करत आहे . यात मुस्लीम समाजही मागे राहीलेला नाही , मुस्लीम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अकबर टिन मेकरवाले यांनी आपल्या घरीच जेवण तयार करुन घर पोहोच करण्याचा निर्णय घेतला . अकबर व त्यांचे कुटुंबीय ,
मित्र परिवार दिवसा गरीब कुटुंबाच्या घरी जावुन घरी किती माणसे आहेत याची आस्थेने विचारापुस करुन सांयकाळचे आपले सर्वांचे जेवण आम्ही पोहोच करतो असे सांगुन सायंकाळी त्या कुटुंबांना न चुकता जेवण पोहोच करतात कोरोनाच्या धास्तीने सर्व प्रार्थनास्थळाचे दरवाजे बंद आहेत . परंतु अन्नछत्र ते ही मोफत चालविणार्या या देवदुतामुळे अनेकांना आपल्या मदतीला देवच धावुन आल्याची अनुभती होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget