Latest Post

मुंबई : शहरात करोनाचा प्रभाव वाढत असून नुकताच पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान करोना विषाणू विळखा दिवसेंदिवस वाढत आहे. करोनाचा पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा पुरवणारे डॉक्टर, वेद्यकीय कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता जीवापाड प्रयत्न करत आहेत. मात्र, आता वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आणि पोलीस कर्मचारीही करोनाच्या कचाट्यात येत असल्याचे समजत आहेत. दरम्यान, मुंबईत करोनामुळे एका ५७ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे.राज्यात २३ मार्चपासून ते २२ मार्चपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार एकूण ६४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. या सर्वांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे, २२ एप्रिलला एकाच दिवसात तब्बल १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यातील ९६ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. याचदरम्यान कोरोनाचा शिरकाव आता महाराष्ट्रातील पोलीस विभागातही झाला आहे.मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचार दरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे,त्यांना दोन मुले व एक मुलगी पत्नी आहे आहे अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

मुंबई - कोरोनाची लक्षण असूनही चार पालिका रुग्णालयांनी दाखल करून घेण्यासाठी नकार दिलेला पोलिसाचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. एका वरिष्ठ अधिका-यांनी त्याला दुजोरा दिला आहे. या पोलिसाला उपचारासाठी चार सरकारी रुग्णालयात फिरायला लागले. कोणीच त्यांना रु्ग्णालयात दाखल करून घेतले नाही, अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यांना रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात केले होते.संबंधीत पोलिस हवालदार कुर्ला वाहतुक विभागात कार्यरत आहेत. त्यांना सोमवारी (ता.20) ताप आल्यामुळे त्यांनी स्थानिक डॉक्टरकडे उपचार घेतले. पण फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. याबाबत त्यांनी मुलाला सांगितल्यानंतर त्यांचा मुलगा आजारी वडिलांना घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेला. तेथील डॉक्टरांनी या पोलिसाला जागा नसल्यामुळे तुम्ही नायर रुग्णालयात जा, असे सांगितले. त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही व बेड शिल्लक नसल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले.त्यानंतर या आजारी पोलिसाचा मुलगा त्यांना वडिलांना घेऊन परळ येथील केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे नऊ वाजले होते. सगळीकडे हेळसांड झाल्यानंतर केईएम रुग्णालयात तरी वडिलांना दाखल करण्यात येईल, असे त्यांना वाटले. पण तेथेही डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही व जागा नसल्यामुळे तुम्ही कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले. सगळीकडून भरती करण्यास नकार देण्यात आल्यामुळे अखेर त्यांनी वरिष्ठांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर या पोलिसाच्या वरिष्ठांनी केईएम रु्गणालय ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत येते अशा भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधला व घडलेल्या सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला.अखेर भोईवाड्यातील पोलिसांनी विनंती केलयानंतर या पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता या पोलिसाचा कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

तालुक्यातील तळणी येथील आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह शनिवारी सकाळी 10: 30 वाजेच्यासुमारास अग्निशमन दलाच्या जवानांना शोधण्यास यश आले. शुक्रवारी दुपारी या तरुणाने खदानीत साचलेल्या पाण्यात उडी मारून आत्महत्या केली होती.
    मयत पंजाब सुंदरसिंग ठाकूर शुक्रवारी दुपारच्या वेळी आपल्या भावासह दुचाकीवरुण एका मंदिराकडे जात असतांना रस्त्यातील खदानीजवळ दुचाकी उभी करुण पाण्यात उडी मारली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. ग्रामीण पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाचा मृतदेह
शोधण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, पण पाणी आधीक असल्याने यश न आल्याने अग्निशमन दलाला पाचारण केले होते. शनिवारी सकाळी 9 वाजता अग्निशमनचे जवान मोहन मुंगसे, सुभाष दुधे, परेश दूधे, प्रसाद शिंदे, इरफान पठान, विक्रम भुईगळ, किरण पागोरे, तुषार तौर, दिनेश मूंगसे यांनी शोध मोहीम हाती घेतली व मृतदेह शोधून काढला.
    सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक विलास आडे, मुश्ताख शेख, देवीदास जाधव, काकासाहेब सोनवणे शुक्रवारी रात्री उशिरा पर्यंत घटनास्थळी ठान मांडून होते. सकाळी मृतदेह मिळून आल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करुण शवविच्छेदनासाठी सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेची ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तरुणाच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. मृतदेह शोधण्यास माजी सभापती अशोक गरुड, प्रभाकर ठोंबरे, पोलिस पाटील संतोष वाघ, प्रभाकर वाघ, काकासाहेब वाघ आदी गावकऱ्यांनी मदत केली.
तरुणाला केले होते होम क्वारंटाईन
        मयत तरुण औरंगाबाद येथे रिक्षा चालवत होता. लॉकडाऊन सुरु असल्याने आठ दिवसापूर्वी तो गावाकडे (तळणी) येथे आला होता. यामुळे आरोग्य तपासणी करुण त्याला होम क्वारंटाईन केले होते. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात असून तरुणावर दुपारी 2 वाजेच्यासुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.


।।। रोजाःतराविहःऐक आलौकीक पुण्य ।।।
अल्लाहाच्या अद्वितीय पर्वाची सुरूवात  शाबान महिनाच्या 30 तारीखेला चंद्रदर्शना नंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या नंतर आपआपल्या मनातील ईच्छा आल्लाहा जवळ मांगुन ,त्या दिवशी जेवढ पुण्य असेल ते सर्व पदरात पाडून, बांधव ज्या ऐका विशिष्ट आशी पवित्र रमजानुल मुबारक चीच खास वैशिष्ट्य पुर्ण ""तराविह नमाज" ची तैयारी करण्याची असते .आपल्या रोजच्या आयुष्यातील ५पाच वेळची जे आल्लाहाने केलेल्या आनिवार्य केलेल्या१),फजर२)जोहर३)असर४)मगरीब५)ईशा या, व्यतिरिक्त फक्त पवित्र रमजानुल मुबारक च्याच महिन्यातील खास वैशिष्ट्य पुर्ण नमाज ""तराविह"'
रात्रीच्या ईशाह नमाजनंतरच तराविह नमाज ला सुरुवात होते ,बांधव आपल्या वडील- धाऱ्यासह,मुलांना, घेऊन सहभागी होतात,
खास वैशिष्ट्य म्हणजे या नमाज मधे संपूर्ण पवित्र "कुरआन शरिफ " चे पढण होतात.पवित्र कुरआन शरिफ आल्लाहाने आपल्याला धरतीवर स्वर्गातूनआपल्या खास दूता मार्फत दररोज हजरत प्रेषित मुहम्मद (स्व.)ला विशेष करून रमजानुल मुबारक च्या महिन्यातच आवतरित केले ,जगाला ऐकमेवद्धैताय,आलौकीक,आदभुत आशी ऐक पवित्र देणगी, भेटच दिली ,पाठवली.
पवित्र कुरआनशरिफ हे ३०तिस पारे(आध्याय) आसतात,६६६६(सहाहाजार सहाशे सहाशष्ट) आयाती.११४ सुरहाअसतात, अशा अदुतिय पवित्र कुराण शरिफचे पठण तराविह नमाजमध्ये ऐक खास व्यक्ती असते त्यांना संपूर्ण कुराण शरिफ तोंडपाठ(मुखद) असते ते व्याकरणासह,आलंकारासह, विशेष म्हणजे सात(७)विविध प्रकारे सुंदर,  ,मंजुळ स्वरांच्या, आवाजात पठन करतात, त्यांना आम्ही " हाफिज-ऐ-कुरआन'" व "कारी-ऐ-कुरआन"" म्हणतात
तराविह नमाजमध्ये २-२-२-२-२चे विभागात आशा प्रकारे २० विस रकात पुर्णपणे करतात ,रोज १-१/२ऐक ते दिड आध्याय पारा घेऊन २६व्या रोजाच्या तराविह नमाजमध्ये ३० पारे पुर्ण (खत्मुल कुरआन) करून आशा आदुतिय पर्वाची सुरुवात होवुन सांगताही  आलौकीक पद्धतीने होत असते,
जगातील सर्व बांधव या आदभुत आशा पर्वणीची वर्षभर आतुरतेनेवाट बघत असतात,कारण वर्षातील ऐक महिना आपल्याला आलेली मरगळ, आळस, आलेले दुर्गुण, आलेल्या मानसिक व शारीरिक त्रासदायक घटना,सुस्तावलेले शरीर निरोगी राहिले पाहिजे म्हणून,झालेला सहन शिलतेचा अंत, धासळलेला आत्मविश्वास ,पोखरलेले मन ,या सर्वांना ऐक नियोजन बध्य ,नैसर्गिक व साचेबद्ध लयबद्ध आध्यात्मिक रिफ्रेश शर कार्यक्रम कोर्स पवित्र रमजानुल मुबारक असते तर बांधवांनी हि संधीआहे या संधी चा फायदा होईल तेवढा करून ,जेवढे पुण्य प्राप्त करता येईल तेवढे थोडेच आहे,,
परंतु या वर्षी संपूर्ण भारतात जगामध्ये CORONA_covid_19 सारख्या महाभयंकर महामारीने धुमाकूळ घातला आहे, तर Corona virus चा आजाराची लागण ,संसर्ग पसरवु नयेत म्हणून ,,
महाराष्ट्र व भारत सरकार ने ,WHO या जागतिक आरोग्य संघटनेचे आदेशानुसार सर्व बांधवांनी आपल्याला आपल्या घरात बसून राहुन घरात च ,
रोजा,नमाज,तराविह नमाज , रोजची नमाज घरामध्ये च आदा करून ,नमाज चे पुण्य ,सबाब, कमावायचेआहेत ,हे सर्वंचेआरोग्य चांगले राहण्यासाठी फायदा आपल्या च आहेत.तर मग अपण सर्व प्रकारे सरकार ला साथ देऊन,सरकारी आदेश पाळु या ,
stay Home,
stay Healthy,
You are Healthy ,
Nation Healthy ,.
लेखक डॉ. सलीम सिकंदर शेख,बैतुशशिफा. दवाखाना ,श्रीरामपुर,
9271640014

 शिर्डी जितेश लोकचंदानी
राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे गावात फळे भाजीपाला ची दुकाने आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार अशी लावण्यात यावी, असा शासकीय आदेश असताना या आदेशाला पहिल्याच दिवशी फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी केराची टोपली दाखवली, आज शनिवार असताना व कायद्याने, नियमाने बंधन असताना अनेक फळे, भाजीपाला विक्रेते हे नगर मनमाड रोडच्या दुतर्फा मोठ्या संख्येने बसलेले होते, हे लॉक डाऊन च्या नियमाच्या विरोधात तसेच शासकीय आदेशाच्या विरोधात असूनही या विक्रेत्यांवर काय कारवाई झाली। असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे,
सध्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू आहे, या काळात गर्दी होऊ नये, कोरोना चा प्रादुर्भाव वाढू नये ,म्हणून मोठी दक्षता घेतली जात आहे, त्यासाठी कालच राहता चे तहसीलदार कुंदन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कामगार तलाठी गायके व ग्रामसेवक खरडे यांनी शासकीय आदेश काढून सावळीविहीर येथे हे फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी आठवड्यातून दोनच दिवस मंगळवार व शुक्रवार दुकाने मांडावीत ,अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा आदेश काढला ,सर्वांना सूचनाही देण्यातआल्या ,वृत्तपत्रात बातम्याही आल्या मात्र तरीही आज या आदेशाच्या केराची टोपली दाखवत अनेक फळ व भाजीपाला विक्री ते मोठ्या संख्येने नगर मनमाड रोडच्या कडेला सावळीविहीर गावात बसलेले होते ,फळे व भाजीपाला विक्री मुळे व घेणाऱ्या ग्राहकां मुळे येथे गर्दी दिसत होती, शासकीय आदेशाला व लॉकडाऊनच्या नियमाला या गोष्टीमुळे हरताळ फासला गेला, यावर आता काय कारवाई होणार। याकडे सर्व नागरिकांचे लक्ष आहे.

शिर्डी जय शर्मा 
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्यातील सर्व शाळा ,महाविद्यालये बंद आहेत,  शिर्डी येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयही बंद आहे, शाळा बंद असल्याने व विद्यार्थी घरातच बसून आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाने मोबाईल ॲप्सद्वारे मुलांना घरबसल्या अभ्यास करता यावा, यासाठी सोय केली आहे ,विद्यार्थी घरी बसून या मोबाईल ॲपवर ऑनलाईन , व्हाट्सअप वर अभ्यास करू शकतो, अशी माहिती या  श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मनोज लोढा व मुख्याध्यापक कुठाळ यांनी दिली,
   सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व काही बंद आहे , शाळा, महाविद्यालय सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत, शिर्डी येथील श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयही बंद आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, सर्वजण घरातच आहेत, घरातल्या घरातच विद्यार्थ्यांना सर्व विषयांचा अभ्यास करता यावा, यासाठी ही सुविधा  करण्यात आली आहे, सर्व वर्ग अध्यापक व विशेष शिक्षक व त्या वर्गाच्या पालकांचा ग्रुप तयार करून त्यामध्ये विविध विषयांची माहिती विविध मोबाईल ॲप द्वारे पुस्तके डाऊनलोड करू शकतात, शिक्षक विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत या मोबाईल द्वारे सोडवण्यासाठी सोय करण्यात आली आहे, तसेच पालकांनाही या मोबाईल ॲपद्वारे मुलांना शिकवता येणार आहे, या मोबाईलॲप वर आपल्या वर्गातील प्रत्येक विषयाचा अभ्यास करता येईलच पण काही अडचण आल्यास आपापल्या वर्गशिक्षक किंवा त्या विषयाच्या शिक्षकांशीही  बोलून किंवा व्हाट्सअप द्वारे आपण समस्या सोडू शकता, अशी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे, या शाळेतील इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना या मोबाईल शैक्षणिक ॲपचा उपयोग होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या लॉकडाऊनच्या काळात घरात राहून आपला अभ्यास या मोबाईल  ॲपद्वारे  करावा, ह्या काळात मिळालेल्या सुट्टीचा चांगला उपयोग करावा, पालकांनीही या मोबाईल ॲप द्वारे विद्यार्थ्यांना शिकवावे ,काही अडचण आल्यास समजून सांगावे किंवा शिक्षकांशी संपर्क करावा ,यासाठी या शाळेचे सर्व शिक्षक व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष ,सदस्य, शिक्षक सर्व प्रयत्न करीत आहेत ,त्यामुळे सर्वांनी आपल्या घरातच बसावे, विद्यार्थ्यांनी बाहेर फिरू नये, पालकांनीही घरबसल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी या मोबाईल शैक्षणिक ॲप्स वापर मुलांना करता यावा म्हणून आपले मोबाईल मुलांना, विद्यार्थ्यांकडे अभ्यासासाठी द्यावेत व स्वतः लक्ष ठेवावे, मुलांचे व आपले आरोग्य सांभाळावे, आपण व मुलांनाही घराबाहेर विनाकारण  पडू नये, आपला अधिकाधिक वेळ घरात  या मोबाईल ॲप द्वारे  अभ्यास करण्याकडे कसा जाईल, असे विद्यार्थ्यांनी पाहावे, या लॉक डाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाहक छायाताई फिरोदिया , श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष मनोज लोढा, मुख्याध्यापक   मुठाळ उपमुख्याध्यापिका बोराडे पर्यवेक्षक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन करण्यात आले असून या शाळेतील ज्येष्ठ शिक्षक डुबल सर जाधव सर वाबळे सर वारुळे सर काळापहाड सर मुंगेकर सर डोमल सर ठाकरे सर यांच्यासह सर्व शिक्षक अतिशय मेहनत घेत आहेत वया  या मोबाईलचा सर्व विद्यार्थी पालकांनी जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहनही  स्कूल कमिटीचे अध्यक्ष व शिक्षकांनी केले आहे.

बुलडाणा - 25 एप्रिल
एकीकडे देश कोरोनाशी लढत आहे तर दूसरी कडे काही विघ्नसंतोषी सोशल मिडियाचा वापर करून समाजात तेड निर्माण करण्याची संधी साधत आहे.असेच बुलडाणा जिल्ह्यातील 3 आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथक बुलडाणा च्या सतर्कतेने विविध कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यात 2 आरोपी बुलडाणा शहरातील तर एक आरोपी नांदुरा येथील आहे.
       या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पोलीस अधीक्षक बुलडाणा डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिलेल्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी स्वतःच्या अधिपत्याखाली असलेल्या दहशतवाद विरोधी पथक
बुलडाणाचे पोउपनि इम्रान इनामदार, पोहेकॉ साजीद शेख, पोहेकॉ श्रीकृष्ण चांदुरकर, पोकॉ सतीश जाधव व पोकॉ विजय वारुळे यांचे सह एक विशेष पथक तयार करुन कोरोना कोविड-19 या महामारीच्या अनुशंघाने जे लोक सोशल मिडीया साईट जसे फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, ट्वीटर, टीकटॉक इत्यादींचा वापर करुन समाजामध्ये या विषाणुबद्दल गैरसमज व भ्रम तथा जातीय द्वेष पसरविणारे पोस्ट प्रसारीत करुन अफवा पसरवितात अशा लोकांवर स्वतः सदर पथकासोबत बारीक लक्ष ठेवुन होते. या दरम्यान शासनाने केलेल्या कोरोना कोविड-19 संदर्भाने केलेल्या उपाययोजना व वेळोवेळी पारीत केलेल्या सुचनांचे उल्लंघन करुन सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या अशा प्रकारची समाज विघातक पोस्ट प्रसारीत करणारे इसम नामे १) राहुल भगवान बेंडवाल, २) अंकेश मुठठे दोघे रा. बुलडाणा व ३) फिरोजखान अमानुल्ला खान रा.नांदुरा यांची गोपनीय माहिती मिळालेवरुन त्यांचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या पोस्टची सखोल पडताळणी करुन सदर तिन्ही आरोपी विरुध्द कलम 188 ,295 अ ,190 भादंवि सह कलम 52 , 54 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कलमांन्वये पो.स्टे. बुलडाणा शहर व पो.स्टे. नांदुरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना दक्षता बाळगावी व चुकीची माहिती देणारे पोस्ट प्रसारीत करु नये अन्यथा सूचनांचे भंग करणा-यांवर प्रचलित कायदयान्वये कार्यवाही करण्यात येईल असा इशारा एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget