सोशल मिडियावर सामाजिक अशांति पसरवणारे 3 भामट्यावर गुन्हे दाखल, 2 बुलडाणा व 1 आरोपी नांदुरा येथील.

बुलडाणा - 25 एप्रिल
एकीकडे देश कोरोनाशी लढत आहे तर दूसरी कडे काही विघ्नसंतोषी सोशल मिडियाचा वापर करून समाजात तेड निर्माण करण्याची संधी साधत आहे.असेच बुलडाणा जिल्ह्यातील 3 आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथक बुलडाणा च्या सतर्कतेने विविध कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यात 2 आरोपी बुलडाणा शहरातील तर एक आरोपी नांदुरा येथील आहे.
       या बाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा पोलीस अधीक्षक बुलडाणा डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांनी दिलेल्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाणा यांनी स्वतःच्या अधिपत्याखाली असलेल्या दहशतवाद विरोधी पथक
बुलडाणाचे पोउपनि इम्रान इनामदार, पोहेकॉ साजीद शेख, पोहेकॉ श्रीकृष्ण चांदुरकर, पोकॉ सतीश जाधव व पोकॉ विजय वारुळे यांचे सह एक विशेष पथक तयार करुन कोरोना कोविड-19 या महामारीच्या अनुशंघाने जे लोक सोशल मिडीया साईट जसे फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम, ट्वीटर, टीकटॉक इत्यादींचा वापर करुन समाजामध्ये या विषाणुबद्दल गैरसमज व भ्रम तथा जातीय द्वेष पसरविणारे पोस्ट प्रसारीत करुन अफवा पसरवितात अशा लोकांवर स्वतः सदर पथकासोबत बारीक लक्ष ठेवुन होते. या दरम्यान शासनाने केलेल्या कोरोना कोविड-19 संदर्भाने केलेल्या उपाययोजना व वेळोवेळी पारीत केलेल्या सुचनांचे उल्लंघन करुन सार्वजनिक उपद्रव करणाऱ्या अशा प्रकारची समाज विघातक पोस्ट प्रसारीत करणारे इसम नामे १) राहुल भगवान बेंडवाल, २) अंकेश मुठठे दोघे रा. बुलडाणा व ३) फिरोजखान अमानुल्ला खान रा.नांदुरा यांची गोपनीय माहिती मिळालेवरुन त्यांचा शोध घेऊन त्यांनी केलेल्या पोस्टची सखोल पडताळणी करुन सदर तिन्ही आरोपी विरुध्द कलम 188 ,295 अ ,190 भादंवि सह कलम 52 , 54 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 या कलमांन्वये पो.स्टे. बुलडाणा शहर व पो.स्टे. नांदुरा येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व नागरीकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी सोशल मिडीयाचा वापर करतांना दक्षता बाळगावी व चुकीची माहिती देणारे पोस्ट प्रसारीत करु नये अन्यथा सूचनांचे भंग करणा-यांवर प्रचलित कायदयान्वये कार्यवाही करण्यात येईल असा इशारा एलसीबी प्रमुख महेंद्र देशमुख यांनी दिला आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget