Latest Post

शिर्डी जितेश लोकचंदानी-श्री साईबाबा मुळे देश-विदेशात प्रसिद्ध असलेल्या शिर्डी शहरात सध्या कोरोना मुळे लॉकडाऊन सुरू आहे, तरी काही लोक लॉक डाऊन चे नियम मोडून फिरत असतात ,अश्या नियम न पाळणाऱ्या लोकांवर नगरपंचायतीने एक पथक बनवून दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे, हा निर्णय चांगला आहे ,मात्र नगरपंचायत चे काही कर्मचारी व  अधिकारी कुठेही धूम्रपान करतात, मात्र यांच्यावर कानाडोळा केला जातो , नियम मोडणार्‍या नगरपंचायत कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का। की, दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण।। अशी तर शिर्डी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांची व या पथकाची रीत आहे काय। असा सवाल शिर्डीकर मधून होत आहे,
      शिर्डीत सध्या लॉक डाऊन सुरू आहे ,सर्वव्य्स्वसाय  बंद आहे, रस्ते ओस आहे, तरीही काही लोक विनाकारण फिरतात, तोंडाला मास्क बांधणे ,सोशल डिस्टन्स पाळणे ,धूम्रपान करणे, रस्त्यावर कोठेही थुंकणे ,असा प्रकार या लोकांकडून होतो, अशा लोकांवर नगरपंचायत एक पथक बनवून आता लक्ष देत आहे ,असे नियम मोडणाऱ्या व्यक्तीला प्रथम वेळी पाचशे रुपये दंड ,दुसऱ्या वेळी दोन हजार रुपये दंड, तिसऱ्या वेळी पाच हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, असे नगरपंचायत तिने घोषित केले आहे, हा निर्णय नगरपंचायत चा चांगला आहे  आता सध्या लॉक डाऊन सुरू आहे, बंद होईल  मात्र  इतर वेळीही शिर्डीत श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून हजारोंच्या संख्येने साईभक्त येत असतात  ,अनेक  ठिकाणी रस्त्यावर  गुटखा खाऊन थुकंणाऱ्यांची संख्या मोठी आहे,  सिमला,मुंबई सारख्या राजधानीच्या ठिकाणी रस्त्यात थुकंल्यानंतर  लगेच दंड आहे , मात्र शिर्डी  आंतरराष्ट्रीय तीर्थस्थानाचे शहर आहे,  येथे  स्वच्छ ,सुंदर शहराचा  देशाचा तीसरा क्रमांकचा पुरस्कार शिर्डी शहराला मिळाला आहे  ,असे असतांनाही  शिर्डीत रस्त्यावर , कुठेही,कोणत्यीही ठिकाणी गुटखा खाऊन थुंकून  रांगोळ्या काढल्याचे चित्र दिसत असते  व तो अस्वच्छतेचा मेसेज पूर्ण देश-विदेशात जातो येथे  श्री साईंच्या दर्शनासाठी लोक अनवाणी रस्त्याने फिरत असतात त्यांना मोठा त्रास  सहन करावा लागतो  त्यामुळे हा निर्णय नगरपंचायतीने चांगला केला आहे, परंतु फक्त हा लॉक डाऊन काळापुरता निर्णय योग्य नाही  ,त्यानंतरही तो अमलात येणे गरजेचे आहे ,तसेच हा नगरपंचायतीचा कायदा,हा  नियम सर्वसामान्यांसाठीआहे, पण मग आपले नगरपंचायत कर्मचारी ,आधिकारी सुद्धा हा नियम मोडतात, कुठेही धूम्रपान करतात, काहीजण तोंडाला मास्क लावत नाहीत, तेवढ्यापुरते तेवढे मास्क लावून परत काढून टाकले जाते ,किंवा सोशल डिस्टंन्स पाळत नाही, अश्या नियम मोडणाऱ्या कर्मचार्‍यांवर कारवाई कोण करणार। असा प्रश्न साईभक्त ,शिर्डीकर विचारत आहे, ।।आपले झाकायचे व दुसऱ्याचे वाकून पाहायचे ।।असा हा प्रकार शिर्डी नगरपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सध्या होत आहे, सर्वसामान्यांना आहे  तोच नियम आपल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठीही पाहिजे व नगरपंचायत कर्मचारी ,अधिकारी यांनी नियम मोडला तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे ,पण तसे होताना दिसत नाही ,यामुळे शिर्डी नगरपंचायत कर्मचारी अधिकारी नियम पाळण्यास तयार नाही ,तेव्हा प्रथम आपण नियम पाळण्यात शिकले पाहिजे, नंतर दुसऱ्याला नेम सांगणे उचित ठरेल , असे शिर्डीकरांमधून बोलले जात आहे.

शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र भुजबळ/ राजेंद्र गडकरी ) -राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल केली आणि त्याचा परिणाम म्हणून अतिउत्साही नागरिकांनी लगेचच विना कामाचे बाहेर पडण्यास सुरुवात केली.परंतु सध्या संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून ती अमर्यादित काळासाठी आहे.याची कल्पना असून सुद्धा लॉक डाऊनच्या काळात अनेक नागरिक कायद्याच व नियमांचं उल्लंघन करत आहेत.याच गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उप.अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले व या कारवाईसाठी पोलीस कर्मचारी व शिर्डी नागपंचायतीचे कर्मचारी यांचे विशिष्ट पथक तयार करून गुरुवारी सकाळी सहा वाजता द्वारावती सर्कल या ठिकाणी बंदोबस्त लावला. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या सत्तर नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात दहा महिलांचाही समावेश आहे.वीस जणांवर शिर्डी पोलिसांनी प्रत्तेकी दोनशे रुपये दंड केला तर शिर्डी नागरपणाचायतीने पस्तीस नागरिकांवर प्रत्तेकी पाचशे रुपये दंड वसूल केला आहे.या वेतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारावर कारवाई करत दहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहे.या कारवाईचे विशेष म्हणजे ह्या सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेऊन रांगेमध्ये बसवून जवळपास दीड तास शारीरिक कवायत शिक्षा म्हणून करून घेण्यात आली.यामुळे आता संध्याकाळी निवांत फेरफटका मारणाऱ्यांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.आता ही कारवाई आणखी कडक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे  यांनी दिली आहे.
एकंदरीतच राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा जरी तहसीलदार यांनी केली असली तरी नारीकांनी घरातच राहावे , सुरक्षित राहावे अन्यथा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावे लागेल असे निर्देश सोमनाथ वाघचौरे यांनी शिर्डीतील नारीकांनी दिले आहेत.

गिनी गवत कापताना अंबादास गिते.
नेवासे :कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील जमावबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर काम करण्यात पोलिस आघाडीवर आहेत. हे करत असताना नियम मोडणाऱ्या अनेकांना दंडुक्‍याचा प्रसाद द्यावा लागला. त्यातून नागरिकांची नाराजी पचवून समाजाच्या भल्यासाठी ते लढत आहेत... त्यातच या काळातही घडणाऱ्या एखाद-दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठीही त्यांना धावपळ करावी लागत आहे. मात्र, आरोपींच्या घरी हंबरणाऱ्या जनावरांची सेवाही करण्याची संधी मिळेल, असे कोणा पोलिसाला कधी वाटले नसेल... नेवासे तालुक्‍यात मात्र हा अनुभव सध्या येत आहे... अर्थात ही संधी स्वतः दोन पोलिसांनीच साधली आणि "खाकी'तील माणुसकीचा नवा प्रत्यय समाजाला दिला... खरे तर भुकेल्या जनावरांसाठी हे दोन पोलिस देवदूतच बनून आले...
घटनेनंतर घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय कोणीही फिरकत नव्हते. अशातच कुकाणे पोलिस दूरक्षेत्रातील हेड कॉन्स्टेबल भीमराज पवार व कॉन्स्टेबल अंबादास गिते तपासासाठी वस्तीवर गेले. त्यांना पाहून तेथे बांधलेल्या सहा गायी-म्हशी आणि आठ शेळ्यांनी जोरदार हंबरडा फोडला. शेतकरीपुत्र असलेले पवार व गिते यांच्या मनात कालवाकालव झाली. या जित्राबांच्या भावना ओळखून त्यांनी त्यांना गोंजारले. जवळच शेतातील गिनी गवत, घास कापून, ऊस तोडून त्यांना टाकला आणि त्यांच्यासाठी पाणीही ठेवले. पवार व गिते हे फक्त एकच दिवस करून थांबले नाहीत, तर रविवारपासून आजपर्यंत ते आपल्या कर्तव्याच्या वेळेतून वेळ काढून सकाळ-सायंकाळ न चुकता या जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करत आहेत. या दोन्ही "खाकीधारीं'च्या या अनोख्या कर्तव्याचे परिसरात कौतुक होत आहे.


मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांनी घरातच राहावे, यासाठी पोलिस जिवाची पर्वा न करता रस्त्यांवर पहारा देत आहेत. अशा एका आजारी पोलिसाला दाखल करून घेण्यास महापालिकेच्या चार रुग्णालयांनी नकार दिला. अखेरीस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर या आजारी पोलिसाला मंगळवारी रात्री केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे पोलिस दलात नाराजी आहे.कुर्ला वाहतूक विभागातील एका पोलिस हवालदाराने सोमवारी (ता. 20) ताप आल्यामुळे स्थानिक डॉक्टरांकडे उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत फारसा फरक न पडल्यामुळे मंगळवारी सकाळी ते घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी त्यांना सात रस्ता येथील कस्तुरबा रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यामुळे ते मुलाला सोबत घेऊन कस्तुरबा रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरांनी रुग्णालयात जागा नसल्यामुळे मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात जाण्याची सूचना केली.त्यानुसार ते नायर रुग्णालयात गेले; मात्र तेथील डॉक्टरांनीही त्यांना दाखल करून घेतले नाही आणि परळच्या केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले. त्यानंतर या आजारी पोलिसाला घेऊन त्यांचा मुलगा केईएम रुग्णालयात गेला. तोपर्यंत रात्रीचे ९ वाजले होते. आता तरी वडिलांना उपचार मिळतील, असे त्यांच्या मुलाला वाटले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासले नाही आणि जागा नसल्यामुळे पुन्हा कस्तुरबा रुग्णालयात जाण्यात सांगितले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची मध्यस्थी हवालदिल झालेल्या या पोलिस हवालदाराने अखेरीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर वरिष्ठांनी भोईवाडा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. भोईवाडा पोलिसांनी विनंती केल्यानंतर या आजारी पोलिसाला रात्री 10 वाजता केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर वॉर्ड क्रमांक 20 मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पोलिस दलात नाराजी पसरली आहे. सध्याच्या काळातही पोलिसाला अशी वागणूक मिळत असेल; तर सामान्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शिर्डी  जितेश लोकचंदानी
सध्या देशात कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत  सेवकांना व गरिबांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळेच माणुसकीच्या नात्यातून शिर्डी येथील श्री मार्तंड म्हाळसापती ट्रस्ट व खंडोबा मंदिर यांच्यावतीने कोरोणा च्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीत सेवा करणारे सेवक व गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले,
 येथील श्री खंडोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, खजिनदार दिपक नागरे ,विश्वस्त निलेश नागरे ,आदींनी पुढाकार घेत आपल्या घरी सोशल डिस्टेंस पाळत या जीवनावश्यक वस्तूंची योग्य खबरदारी घेत या
जीवनावश्यक वस्तू या सध्याच्या आपत्तिजनक परिस्थितीत आवश्यक सेवा पुरवीत असणाऱ्या सेवकांना देण्यात आल्या, त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 200 किलो धान्य देण्यात आले, हे धान्य कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस बांधवांना देण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे शिर्डी नगरपंचायत मध्ये स्वच्छता चे काम करणारे स्वच्छता कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी अशा एकूण 160 गरजवंतांना मदतीचा हात देऊन  हे जीवनावश्यक वस्तूंचे किट श्री खंडोबा देवस्थान च्या वतीने देण्यात आले,
तसेच श्रीमार्तंड म्हाळसापती महाराज व साई खंडोबा देवस्थान आणि कै, मनोहर मार्तंड नागरे यांच्या आशीर्वादाने आशिर्वादाने या कोरोनाच्या संकटात या।देवस्थानच्या वतीने लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता निधीला  एक लाख पंचवीस हजार रुपये निधी दिलाअसून  दुसऱ्या टप्प्यात गरजवंतांना व सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन हा उपक्रम राबवण्यात आला, अशी माहिती या देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी दिली,

शिर्डी राजेंद्र गडकरी -सध्या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी विविध प्रकारे सरकार अंमलबजावणी करीत आहे, या मुळे सर्व बंद आहे, शाळा ,महाविद्यालयही  बंद आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही सर्वत्र बंद आहे, कोरोना मुळे यावर्षी परीक्षाही रद्द झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना आता पुढच्या वर्गात थेट प्रवेश मिळणार आहे,  त्यामुळे अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता पुढील वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी या कोरोनाच्या आपत्तीजनक कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये व सोपे ,सुलभ पद्धतीने प्रवेश मिळावा म्हणून काही शाळांनी ऑनलाईन प्रवेश फार्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे ,घरबसल्या हा फॉर्म भरून आपण आपल्या विद्यार्थ्यांचां प्रवेश घेऊ शकतो ,सावळीविहीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तसे आव्हानही केले आहे , व फॉर्म तसेच माहितीसाठी  मोबाईल नंबर देण्यात आला आहे, तालुक्यात प्रथमच यावर्षी काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे,
   सध्या देशात ,राज्यात कोरोना मुळे मोठी संकटकालीन  समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्व शाळा बंद आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जिल्ह्यात पूर्ण बंद आहे ,विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत ,मात्र पुढच्या वर्षी शैक्षणिक नियोजन शाळेतील शिक्षक वर्गाकडून कडून होत आहे,   सर्व विद्यार्थ्यांना या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या घरीच राहण्याचे सांगण्यात आले आहे, मात्र  शिक्षकांना दरवर्षाप्रमाणे  गावात किंवा घरोघर जाऊन विद्यार्थ्यांचे   सर्वेक्षण  करणे या कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे व  या संचारबंदी मुळे यावर्षी शक्य नाही,  त्यामुळे  ऑनलाइन  फॉर्म  भरून प्रवेश दिला जात आहे, विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत गर्दी न करता किंवा लॉक डाऊन चे नियम पाळत घरूनच आपल्या पाल्याला प्रवेश घेता येणार आहे, त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढील  शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी शाळेत येण्याची गरज नाही ,साध्या ऑनलाइन फॉर्मवर किंवा मोबाईलचे व्हाट्सअप द्वारे सुद्धा ह्या 7020054933 नंबर वर संपर्क साधून  सावळीविहिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ शकतो, तसेच  शाळा सुरू झाल्यानंतर  जन्मतारखेचा दाखला ,आधार कार्ड  नंतर  दिले तरी चालणार आहे, अशी ऑनलाईन व सोप्या पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी सावळीविहीर जिल्हा परिषद शाळेने प्रथमच योजनाआणली व त्यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, दत्ता गायकवाड सर, पकंज दर्शने सर, सौ, चवाळे मॅडम,  मंद्रे मॅडम, गोरडे मॅडम, संगीता यासीन, सविता बर्डे ,आदी शिक्षक त्यासाठी परिश्रम घेत असून येथे संगणक, सीसीटीव्ही, सर्व काही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून तालुक्यात अपडेट शाळा असल्याचे बोलले जात आहे ,त्यात ऑनलाइन प्रवेश तेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात येत असल्यामुळे ह्या शाळेचे तालुक्‍यातून, पालक वर्गातून, व सावळीविहीर परिसरातून कौतुक होत आहे.

शिर्डी (राजेंद्र गडकरी )सध्या देशात कोरोना मुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे ,या रुग्णांमध्ये आता डॉक्टर, शासकीय कर्मचारी, यांच्या बरोबरच पत्रकार व पोलिसही कोरोनाच्या साथीला बळी पडत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ड्युटीवर तैनात असलेल्या राज्यात सूमारे 49  पोलिसांनाही झाल्याची चर्चा आहे, व त्यामुळेच शिर्डी येथील पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी ,कर्मचाऱ्यांची कोरोना संदर्भात तपासणी करण्यात आली ,यात एकही कर्मचारी कोरोना ग्रस्त किंवा संशयित कोरोना ग्रस्त आढळला नाही, त्यामुळे शिर्डी पोलिसांमध्ये समाधानाचे  वातावरण आहे,
   सध्या जगात, देशात कोरोणाने हाहाकार माजवला आहे, राज्यातही कोरोना चे मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, त्यामध्ये आता उपचार करणारे डॉक्टर, नर्स ,आरोग्यसेविका, तसेच शासकीय कर्मचारी स्वच्छता कर्मचारी ,पत्रकार यांच्याबरोबरच पोलिसही सापडत आहे, राज्यांमध्ये काही पोलिसांना ही कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा परिस्थितीत पोलीस रात्रंदिवस आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस या संकट समयी लॉकडाऊनच्या काळात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, अबाधित राहावी ,यासाठी झटत आहेत, अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निगा, आरोग्य व्यवस्थित राहावे, त्यांचा संपर्क जनतेशी असल्यामुळे त्यांची कोरोनासंबंधी तपासणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनानेही ही लक्ष दिले असून त्यानुसारच राहता तहसीलदार कुंदन हिरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, यांच्या सूचनेनुसार सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्रीधर गागरे व त्यांचे वैद्यकीय पथक यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन  सर्व पोलिस कर्मचारी तसेच शिर्डी वाहतूक शाखेचे  सर्व पोलीसकर्मचारी, बीडीएस पथकातील सर्व पोलिस कर्मचारी या सर्वांची वैद्यकीय पथकाने कोरोना संबंधी तपासणी केली ,सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांचे बीपी ,शुगर ,ब्लड व आधुनिक पद्धतीने ही कोरोना तपासणी करण्यात आली ,या आधुनिक कोरोना तपासणीमध्ये एकही पोलीस कोरोना ग्रस्त किंवा संशयित नसल्याचे स्पष्ट झाले, प्रथमच शिर्डी येथे कोरोना आजारा संबंधी ही आरोग्य तपासणी करण्यात आली ,पोलीस या  कोरोनाने उद्भवलेल्या  संकट काळात आपले कर्तव्य आपत्तिजनक परिस्थितीत रात्रंदिवस करत आहे, पोलीस माणूसच आहे, त्यांनाही कुटुंब परिवार आहे ,अशा ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना पोलिसांचा संपर्क जनतेशी सारखा येतो त्यामुळे कोणी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले की काय याची प्रत्येकाला मनात शंका असते, मात्र आता ही कोरोणा तपासणी झाल्यानंतर प्रत्येकाला खात्री व आत्मविश्वास निर्माण होऊन यापुढे सर्व पोलिस कर्मचारी, अधिकारी आणखी नेटाने काम चांगले करतील, असे यावेळी डॉक्टर गागरे यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget