शिर्डी प्रतिनिधी (राजेंद्र भुजबळ/ राजेंद्र गडकरी ) -राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल केली आणि त्याचा परिणाम म्हणून अतिउत्साही नागरिकांनी लगेचच विना कामाचे बाहेर पडण्यास सुरुवात केली.परंतु सध्या संपूर्ण देशात संचारबंदी लागू असून ती अमर्यादित काळासाठी आहे.याची कल्पना असून सुद्धा लॉक डाऊनच्या काळात अनेक नागरिक कायद्याच व नियमांचं उल्लंघन करत आहेत.याच गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस उप.अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सक्त कारवाईचे आदेश दिले व या कारवाईसाठी पोलीस कर्मचारी व शिर्डी नागपंचायतीचे कर्मचारी यांचे विशिष्ट पथक तयार करून गुरुवारी सकाळी सहा वाजता द्वारावती सर्कल या ठिकाणी बंदोबस्त लावला. यावेळी सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या सत्तर नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून यात दहा महिलांचाही समावेश आहे.वीस जणांवर शिर्डी पोलिसांनी प्रत्तेकी दोनशे रुपये दंड केला तर शिर्डी नागरपणाचायतीने पस्तीस नागरिकांवर प्रत्तेकी पाचशे रुपये दंड वसूल केला आहे.या वेतिरिक्त विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी स्वारावर कारवाई करत दहा दुचाकी वाहने जप्त करण्यात आले आहे.या कारवाईचे विशेष म्हणजे ह्या सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेऊन रांगेमध्ये बसवून जवळपास दीड तास शारीरिक कवायत शिक्षा म्हणून करून घेण्यात आली.यामुळे आता संध्याकाळी निवांत फेरफटका मारणाऱ्यांनी या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.आता ही कारवाई आणखी कडक करणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी दिली आहे.
एकंदरीतच राहाता तालुका कोरोनामुक्त झाल्याची घोषणा जरी तहसीलदार यांनी केली असली तरी नारीकांनी घरातच राहावे , सुरक्षित राहावे अन्यथा विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या कारवाईला सामोरं जावे लागेल असे निर्देश सोमनाथ वाघचौरे यांनी शिर्डीतील नारीकांनी दिले आहेत.
Post a Comment