![]() |
गिनी गवत कापताना अंबादास गिते. |
नेवासे :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळातील जमावबंदी आणि संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर काम करण्यात पोलिस आघाडीवर आहेत. हे करत असताना नियम मोडणाऱ्या अनेकांना दंडुक्याचा प्रसाद द्यावा लागला. त्यातून नागरिकांची नाराजी पचवून समाजाच्या भल्यासाठी ते लढत आहेत... त्यातच या काळातही घडणाऱ्या एखाद-दुसऱ्या गुन्ह्याच्या तपासासाठीही त्यांना धावपळ करावी लागत आहे. मात्र, आरोपींच्या घरी हंबरणाऱ्या जनावरांची सेवाही करण्याची संधी मिळेल, असे कोणा पोलिसाला कधी वाटले नसेल... नेवासे तालुक्यात मात्र हा अनुभव सध्या येत आहे... अर्थात ही संधी स्वतः दोन पोलिसांनीच साधली आणि "खाकी'तील माणुसकीचा नवा प्रत्यय समाजाला दिला... खरे तर भुकेल्या जनावरांसाठी हे दोन पोलिस देवदूतच बनून आले...
Post a Comment