शिर्डी जितेश लोकचंदानी
सध्या देशात कोरोना मुळे लॉक डाऊन सुरू आहे ,अशा परिस्थितीत सेवकांना व गरिबांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळेच माणुसकीच्या नात्यातून शिर्डी येथील श्री मार्तंड म्हाळसापती ट्रस्ट व खंडोबा मंदिर यांच्यावतीने कोरोणा च्या पार्श्वभूमीवर या परिस्थितीत सेवा करणारे सेवक व गरजवंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले,
येथील श्री खंडोबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे, उपाध्यक्ष अजय नागरे, खजिनदार दिपक नागरे ,विश्वस्त निलेश नागरे ,आदींनी पुढाकार घेत आपल्या घरी सोशल डिस्टेंस पाळत या जीवनावश्यक वस्तूंची योग्य खबरदारी घेत या
जीवनावश्यक वस्तू या सध्याच्या आपत्तिजनक परिस्थितीत आवश्यक सेवा पुरवीत असणाऱ्या सेवकांना देण्यात आल्या, त्यामध्ये शिर्डी पोलीस स्टेशनला एकूण 200 किलो धान्य देण्यात आले, हे धान्य कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिस बांधवांना देण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे शिर्डी नगरपंचायत मध्ये स्वच्छता चे काम करणारे स्वच्छता कर्मचारी व अत्यावश्यक सेवेत असणारे कर्मचारी अशा एकूण 160 गरजवंतांना मदतीचा हात देऊन हे जीवनावश्यक वस्तूंचे किट श्री खंडोबा देवस्थान च्या वतीने देण्यात आले,
तसेच श्रीमार्तंड म्हाळसापती महाराज व साई खंडोबा देवस्थान आणि कै, मनोहर मार्तंड नागरे यांच्या आशीर्वादाने आशिर्वादाने या कोरोनाच्या संकटात या।देवस्थानच्या वतीने लॉकडाऊन च्या पहिल्या टप्प्यात राज्याचे मुख्यमंत्री यांच्या सहाय्यता निधीला एक लाख पंचवीस हजार रुपये निधी दिलाअसून दुसऱ्या टप्प्यात गरजवंतांना व सेवकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देऊन हा उपक्रम राबवण्यात आला, अशी माहिती या देवस्थानचे अध्यक्ष संदीप नागरे यांनी दिली,
Post a Comment