शिर्डी राजेंद्र गडकरी -सध्या कोरोना चा मुकाबला करण्यासाठी विविध प्रकारे सरकार अंमलबजावणी करीत आहे, या मुळे सर्व बंद आहे, शाळा ,महाविद्यालयही बंद आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळाही सर्वत्र बंद आहे, कोरोना मुळे यावर्षी परीक्षाही रद्द झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना आता पुढच्या वर्गात थेट प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे अशा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आता पुढील वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी या कोरोनाच्या आपत्तीजनक कालावधीत कोणतीही अडचण येऊ नये व सोपे ,सुलभ पद्धतीने प्रवेश मिळावा म्हणून काही शाळांनी ऑनलाईन प्रवेश फार्म भरून घेण्यास सुरुवात केली आहे ,घरबसल्या हा फॉर्म भरून आपण आपल्या विद्यार्थ्यांचां प्रवेश घेऊ शकतो ,सावळीविहीर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तसे आव्हानही केले आहे , व फॉर्म तसेच माहितीसाठी मोबाईल नंबर देण्यात आला आहे, तालुक्यात प्रथमच यावर्षी काही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे,
सध्या देशात ,राज्यात कोरोना मुळे मोठी संकटकालीन समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे सर्व शाळा बंद आहेत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही जिल्ह्यात पूर्ण बंद आहे ,विद्यार्थ्यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत ,मात्र पुढच्या वर्षी शैक्षणिक नियोजन शाळेतील शिक्षक वर्गाकडून कडून होत आहे, सर्व विद्यार्थ्यांना या कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपापल्या घरीच राहण्याचे सांगण्यात आले आहे, मात्र शिक्षकांना दरवर्षाप्रमाणे गावात किंवा घरोघर जाऊन विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करणे या कोरोना च्या पार्श्वभूमीमुळे व या संचारबंदी मुळे यावर्षी शक्य नाही, त्यामुळे ऑनलाइन फॉर्म भरून प्रवेश दिला जात आहे, विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत गर्दी न करता किंवा लॉक डाऊन चे नियम पाळत घरूनच आपल्या पाल्याला प्रवेश घेता येणार आहे, त्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशासाठी शाळेत येण्याची गरज नाही ,साध्या ऑनलाइन फॉर्मवर किंवा मोबाईलचे व्हाट्सअप द्वारे सुद्धा ह्या 7020054933 नंबर वर संपर्क साधून सावळीविहिर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ शकतो, तसेच शाळा सुरू झाल्यानंतर जन्मतारखेचा दाखला ,आधार कार्ड नंतर दिले तरी चालणार आहे, अशी ऑनलाईन व सोप्या पद्धतीने प्रवेश घेण्यासाठी सावळीविहीर जिल्हा परिषद शाळेने प्रथमच योजनाआणली व त्यासाठी या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम, दत्ता गायकवाड सर, पकंज दर्शने सर, सौ, चवाळे मॅडम, मंद्रे मॅडम, गोरडे मॅडम, संगीता यासीन, सविता बर्डे ,आदी शिक्षक त्यासाठी परिश्रम घेत असून येथे संगणक, सीसीटीव्ही, सर्व काही सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून तालुक्यात अपडेट शाळा असल्याचे बोलले जात आहे ,त्यात ऑनलाइन प्रवेश तेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घेण्यात येत असल्यामुळे ह्या शाळेचे तालुक्यातून, पालक वर्गातून, व सावळीविहीर परिसरातून कौतुक होत आहे.
Post a Comment