शिर्डी (राजेंद्र गडकरी )सध्या देशात कोरोना मुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे ,या रुग्णांमध्ये आता डॉक्टर, शासकीय कर्मचारी, यांच्या बरोबरच पत्रकार व पोलिसही कोरोनाच्या साथीला बळी पडत आहेत, त्यामुळे कोरोनाचा संसर्ग ड्युटीवर तैनात असलेल्या राज्यात सूमारे 49 पोलिसांनाही झाल्याची चर्चा आहे, व त्यामुळेच शिर्डी येथील पोलिस स्टेशन मधील सर्व अधिकारी ,कर्मचाऱ्यांची कोरोना संदर्भात तपासणी करण्यात आली ,यात एकही कर्मचारी कोरोना ग्रस्त किंवा संशयित कोरोना ग्रस्त आढळला नाही, त्यामुळे शिर्डी पोलिसांमध्ये समाधानाचे वातावरण आहे,
सध्या जगात, देशात कोरोणाने हाहाकार माजवला आहे, राज्यातही कोरोना चे मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, त्यामध्ये आता उपचार करणारे डॉक्टर, नर्स ,आरोग्यसेविका, तसेच शासकीय कर्मचारी स्वच्छता कर्मचारी ,पत्रकार यांच्याबरोबरच पोलिसही सापडत आहे, राज्यांमध्ये काही पोलिसांना ही कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, अशा परिस्थितीत पोलीस रात्रंदिवस आपले कर्तव्य चोख बजावत आहेत, आपला जीव धोक्यात घालून रात्रंदिवस या संकट समयी लॉकडाऊनच्या काळात कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी, अबाधित राहावी ,यासाठी झटत आहेत, अशा पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निगा, आरोग्य व्यवस्थित राहावे, त्यांचा संपर्क जनतेशी असल्यामुळे त्यांची कोरोनासंबंधी तपासणी व्हावी, यासाठी महाराष्ट्र शासनानेही ही लक्ष दिले असून त्यानुसारच राहता तहसीलदार कुंदन हिरे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, यांच्या सूचनेनुसार सावळीविहीर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर श्रीधर गागरे व त्यांचे वैद्यकीय पथक यांनी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सर्व पोलिस कर्मचारी तसेच शिर्डी वाहतूक शाखेचे सर्व पोलीसकर्मचारी, बीडीएस पथकातील सर्व पोलिस कर्मचारी या सर्वांची वैद्यकीय पथकाने कोरोना संबंधी तपासणी केली ,सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची अधिकाऱ्यांचे बीपी ,शुगर ,ब्लड व आधुनिक पद्धतीने ही कोरोना तपासणी करण्यात आली ,या आधुनिक कोरोना तपासणीमध्ये एकही पोलीस कोरोना ग्रस्त किंवा संशयित नसल्याचे स्पष्ट झाले, प्रथमच शिर्डी येथे कोरोना आजारा संबंधी ही आरोग्य तपासणी करण्यात आली ,पोलीस या कोरोनाने उद्भवलेल्या संकट काळात आपले कर्तव्य आपत्तिजनक परिस्थितीत रात्रंदिवस करत आहे, पोलीस माणूसच आहे, त्यांनाही कुटुंब परिवार आहे ,अशा ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना पोलिसांचा संपर्क जनतेशी सारखा येतो त्यामुळे कोणी कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आले की काय याची प्रत्येकाला मनात शंका असते, मात्र आता ही कोरोणा तपासणी झाल्यानंतर प्रत्येकाला खात्री व आत्मविश्वास निर्माण होऊन यापुढे सर्व पोलिस कर्मचारी, अधिकारी आणखी नेटाने काम चांगले करतील, असे यावेळी डॉक्टर गागरे यांनी सांगितले.
Post a Comment