अहमदनगर - दिनांक २२/०४/२०२० रोजी श्री.दिलीप पवार, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना गोपनिय माहीती मिळाली कि, शेख जमीर रशीद रा.बोधेगाव ता.शेवगाव व रविंद्र पंढरीनाथ शिंदे रा.घोरतळे गल्ली बोधेगाव ता.शेवगाव हे त्यांचे राहते घरात महाराष्ट्र राज्यात सुगंधी तंबाखू विक्रीस बंदी असतानाही चोरुन मशीनरीचे सहाय्याने सुगंधी तंबाखु मिक्स करुन मावा तयार करुन विक्री करत आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने पोहेकॉ/मनोज गोसावी, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना रविन्द्र कर्डीले, संतोष लोढे , राहुल सोळंके, रविंद्र घुगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहीदास नवगिरे यांनी मिळालेल्या गोपनिय माहीतीनुसार दोन पंचासमक्ष बातमीतील पहील्या नमुद ठिकाणी जावुन खात्री केली असता तेथील १)जमीर रशिद शेख रा.बोधेगाव ता.शेवगाव याचे राहते घरामध्ये व २) रविंद्र पंढरीनाथ शिंदे रा.घोरतळे गल्ली बोधेगाव ता.शेवगाव यांचे राहते घरामध्ये सुंगधी तंबाखूचे पुढे, तयार मावा, तसेच दोन मावा तयार करण्याच्या इलेक्ट्रीक मिक्सअप मशीन
असा एकुण १,६४,६००/- रु किंमतीचा मुददेमाल मिळुनआल्याने तो जप्त करुन पंचनामा करुन पुढिल कारवाई कामी शेवगाव पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कारवाई मा. श्री. अखिलेश कुमार सिंह साहेब पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. सागर पाटील साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा.श्री. मंदार जावळे साहेब, उप.विभा.पोलीस अधिकारी साो, शेवगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे.
Post a Comment