नगरमध्ये आणखी दोन कोरोनाबाधितांना डिस्चार्ज; आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ३१ वर तर २० जण झाले बरे , केवळ ९ जणांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर : अहमदनगरमधील कोरोनाबाधितांचा आकडा जेवढ्या वेगाने वर गेला, आता तेवढ्याच वेगाने तो खालीही येत आहे. बुधवारी बूथ हॉस्पिटलमधून दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत नगरमध्ये बरे झालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. आता केवळ ९ जणांवर उपचार सुरू आहेत.अहमदनगरमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा ३१वर पोहोचला आहे. त्यातील कोपरगाव व जामखेड येथील दोघांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत २० जणांना डिस्चार्ज मिळाल्याने आता बूथ हॉस्पिटलमध्ये केवळ ९ रूग्ण उपचार घेत आहेत. त्यातील एक जिल्ह्याबाहेरील म्हणजे आष्टी तालुक्यातील आहे. तर श्रीरामपूर येथील रूग्णाचा मृत्यू पुणे येथे झाला आहे.आतापर्यंत जामखेड ५, संगमनेर ४, नगर शहर ८ व नेवासा १ अशा १८ जणांना डिस्चार्ज मिळाला होता. बुधवारी नगर शहरातील मुकुंदनगर व राहाता तालुक्यातील लोणी अशा दोघांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे डिस्चार्ज मिळालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget