Latest Post

चिखली - 13 एप्रिल - कोरोना मुळे एकी कडे देशात लॉकडाउन आहे तर दूसरी कडे या परिस्थित ही आपला व आपल्या परिवाराच्या पोटची खळगी भरण्यासाठी हमालाना कामावर जावे लागत आहे.आज एका दुर्दैवी घटनेट एका हमालाला आपला जीव गमवावा लागला तर इतर 6 हमाल जख्मी झाल्याची घटना चिखली एमआईडीसी मध्ये घडली आहे.
       मिळालेली माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहरातील एमआयडीसी मधील महाबीज महामंडळने भाडेतत्त्वावर घेतलेल्या जाजू यांच्या गोडाऊन वरुण सोयाबीन घेऊन महाबीज मध्ये घेऊन येत असताना एमआयडीसी मधील  मिरा इंडस्ट्रीज जवळ टर्निंग मध्ये ड्रायव्हरचा तोल गेल्याने ट्रॅक्टर पलटी झाला व त्या मध्ये बसलेले हमाल शेख शब्बीर शेख जमाल वय 50 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला तर ईतर सहा जन हमाल जखमी झाले आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालय चिखली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जख्मी मध्ये शेख जमील शेख चांद 40,बालू सोनाजी इंगले 36, सै.वाजिद सै.जावेद 27, सुनील रक्ताडे 27, शेख शाहिद शेख जुलकर्नैन 32 व शाहेद काज़ी 38 यांचा समावेश आहे.आपल्या रक्ताच घाम करून गाळणाऱ्या हमालांना बांधकाम कामगार महामंडळ सारखीच मृत्यू पूर्व व नंतर मिळणाऱ्या शासकीय सुविधा देण्यात याव्या व महामंडळ कडून हमालांचे विमा तसेच मृत्यू पावलेल्या व्यक्तीस आणि जखमींना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी मृत हमालाच्या परिवाराकडून होत आहे.

नेवासे येथील ५० वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण.
अहमदनगर : जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे त्या रुग्णाच्या संपर्कातील इतर नागरिकांना तपासणीसाठी प्रशासनाने हालचाली केल्या आहेत. या रुग्णाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यामुळे कोरोनाबाधितांची नगर जिल्ह्यातील संख्या आता २८ इतकी झाली आहे.जिल्हा रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव नमुन्यापैकी एका व्यक्तीचा स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाला असून तो कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर ५० वर्षीय व्यक्ती नेवासे शहरातील असून त्याला सर्दी, दम लागणे आणि खोकल्याचा त्रास होत असल्याने जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले होते. दिनांक ११ एप्रिल रोजी या व्यक्तीच्या घशातील स्त्राव नमुना चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते, तो अहवाल आज प्राप्त झाला. त्यात ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.   दरम्यान, कालच या व्यक्तीचा एक्स रे काढण्यात आला होता. त्यात त्याला न्यूमोनिया झाल्याचे तसेच सारीसदश्य आजाराची लक्षणे आढळल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज सकाळी या व्यक्तीचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत तात्काळ ससून रुग्णालयास देण्यात आल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आज, सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत ११२३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १०१६ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले असून सध्या ७३ अहवालांची प्रतीक्षा आहे. तसेच एकूण २८ कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात बीड येथील आष्टी तालुक्यातील एक व्यक्ती आणि मुळची श्रीरामपूर तालुक्यातील परंतू ससुन मध्ये उपचार घेणारी अशा दोन व्यक्तींचा समावेश आहे. ससून मध्ये उपचार घेणार्‍या व्यक्तीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता, अशी माहितीही त्यांनी दिली. सध्या वैदयकीय देखरेखीखाली ७६ जणांना ठेवण्यात आले असून ४४९ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे तर ६७९ जणांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
नगर जिल्ह्यातील संशयितांचे अहवाल शनिवारी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी रविवारी ५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. त्यामुळे जिल्ह्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले होते. मात्र सोमवारी सकाळी काही रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर रुग्ण हा नेवासा तालुक्यातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे नेवासा तालुक्यात शंभर टक्के लॉकडाऊन करण्यात येणार आहे. त्यादृष्टिने पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. आता या रुग्णाच्या संपर्कात आणखी कोण-कोण आहेत, त्याचा शोध प्रशासन घेत आहे.

पहिल्यांदाच अशी झाले मी शांत शिर्डी
शिर्डी (राजेंद्र गडकरी) - सध्या कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, देशात, राज्यात या भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे, या कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे,त्यामुळे श्रीमंत व स्वतःला महासत्ता समजणारे देशही हतबल झाले आहे, अशा परिस्थितीत आपल्या भारत भूमीमध्ये सुद्धा या कोरोनाने  शिरकाव केला आहे, अशा कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आपल्या भारत देशात वेळेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला , अश्या 25 मार्चपासून सुरू झालेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदाच 135कोटी लोकसंख्या
असणाऱ्या या भारत देशातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व उद्योग ,काम, धंदा बस, रेल्वे ,विमान सर्व काही बंद आहे, रस्ते ओस आहे ,सर्वजण आपापल्या घरात आहेत, अशा परिस्थितीमुळे देशात ,राज्यात, जिल्ह्यात सर्वत्र शांत, शांत आहे, अश्याच परिस्थितीत मी तरी कशी गजबजलेली राहणार.श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी हि भूमी, मी रात्रंदिवस गजबजलेली, साई नामाचा जयजयकार एेकणारी, नेहमी साईभक्तीची गीते, जयघोष, कानाला ऐकू येणारीसाईचीं ललकारी, हे सर्व आता मी शांत शांत ऐकत आहे,
देशातील सर्वच मंदिरे, चर्च ,मज्जिद, गुरुद्वारे, सर्वकाही भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहे ,मग येथे असणारे श्री साईबाबांचे मंदिरही 17 मार्च 2020 दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले ,श्री साई संस्थानने आपले निवासस्थाने व प्रसादलय बंद केली ,त्यानंतर 25 मार्चला देशभर लॉकडाऊन सुरु झाला, आणि मग काय सर्वच बस, रेल्वे, विमाने, खाजगी वाहने, येणे बंद झाले,येथे येणारे साईभक्तांची संख्या शून्य झाली, दररोज फुलांचा भरणारा बाजारही बंद आहे, जिकडेतिकडे दिसणारे मोठे गुलाबाचे पुष्पहार व वेगवेगळ्या फुलांचा सुगंध ही दिसेनासा झाला आहे.या लॉकं डाऊन काळातच आलेला श्रीरामनवमी चा मोठाउत्सव सुद्धा बिगरसाईपालख्या  व पदयात्री आणि साईभक्तांच्या अनुपस्थित साजरा झाला, दरवर्षी रामनवमीला माझ्या  भूमीत येणारे लाखो साईभक्त मात्र यावर्षी एकही साईभक्त आला नाही, ना विद्युतरोषणाई ना पताका, ना जयजयकार ना गजबजलेले वातावरण, ना गर्दी,ना वाहनांची ये-जा,ना संस्कृतिक कार्यक्रम,ना पाळणे,ना खेळण्याची दुकाने, सर्वकाही रद्द झाले, श्री साईबाबांनी 1911 पासून हा श्रीरामनवमी उत्सव सुरू केला,  एकदा शिरडीत।महामारी प्लेगची  साथ आली, मात्र त्यावेळी एवढे वातावरण झाले नाही, कारण तीचा बंदोबस्त श्री साईंनी मिशीवर पीठ टाकून   केला होता,  त्यावेळेस श्री साईंनी लक्ष्मणरेषा आखली होती, जणू तीच लक्ष्मणरेषा, तोच संदेश आज घराबाहेर न पडण्यासाठी कामात येत आहे ,
 या कोरोना महामारी मुळे ह्या माझ्या नगरी तला श्रीरामनवमीचा  उत्सव मात्र यावर्षी साजरा झाला खरा परंतु सुनासुना, ।।माझ्या कानावर ना श्री साईचा जयजयकार आला ,ना साईरथावरील गीते ,ना पादचाऱ्यांचा तो जयघोष ,माझ्या कानी पडला नाही, अशी ही रामनवमी पहिल्यादाच अगदी शांत गेली, अशा या शांत शांत परिस्थितीत मलाही आता खरं उबग आली आहे,कारण येथे  सर्व काही बंद आहे, सर्व रस्ते ओस पडले आहेत, अत्यावश्यक सेवा ची दुकाने सोडून सर्व काही बंद आहे, प्रत्येकजण आपापल्या घरात आहे, शाळा, महाविद्यालये, खासगी ट्रॅव्हल्स ,व्यवसायिक नोकरदार, यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, सर्वत्र सुने, सुने वातावरण आहे, अशा या सुन्या सुन्या ,शांत ,शांत वातावरणाचा मलाही या पंधरा वीस दिवसात अनुभव आला आहे, मीही आता ही आता आनंद घेत आहे, नेहमी गजबजलेल्या वातावरणापेक्षा हे शांत शांत वातावरण मलाही जरा हळूहळू बरे वाटायला लागले आहे, नेहमी गजबजलेली माझी शिर्डीचीभूमी आणि आत्ताची शांत माझी भूमी,  यात मोठा फरक मला जाणवत आहे, पहाटेच उठून येथील प्रत्येक माणूस व त्याचे जीवन हे सुरू होऊन दिवसभर धावपळ दिसायची, प्रत्येक जण सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी रात्री उशिरा झोपेपर्यंत आपल्या कामात दंग, कोणी दुकान उघडतो, कोणी येणाऱ्या साईभक्तांचे स्वागत करण्यास नाक्यावर तत्पर असतो ,कोणी फुले  विकतो, कुणी साई सेवक म्हणून पॉलिसी चे काम करतो, कोणी दुकानात धंदा करतो, कुणी दर्शनासाठी गडबड करतो, तर कोणी नोकरीवर जाण्यासाठी, मुले ,विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी, कुणी बस पकडण्यासाठी, कोणी रेल्वे ,विमान, पकडण्यासाठी मोठी धावपळ करताना नेहमी मी पाहत होते, मात्र गेल्या काही दिवसापासून कोणाचीही धावपळ दिसत नाही ,माझ्या भूमीत असणारे ,अनेक बसेस व प्रवाशांनी नि गजबजलेले बसस्टॅन्ड आता सुनेसुने आहे, कधीही सामसूम न दिसणारे शिर्डी बस स्थानक मात्र अगदी सुनेसुने दिसत आहे , साई नगरीला रेल्वेही येत नाही, रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेची वाट बघणारे रिक्षा चालक, व त्यांच्या रिक्षांचा घोळका आता शांत झाला आहे, शिर्डीला  येणारे विमानेही  बंद झाल्याने येथील विमानतळ शांत झाला आहे, या विमानतळा बाहेर प्रवाशांना ने आण करणाऱ्या कारही आता आपल्या घराच्या अंगणात उभ्या आहेत, शिर्डीत सर्वकाही शांत आहे ,नेहमी मी गजबजलेली शिर्डी  एकदमच शांत झाली आहे ,त्यामुळे एक प्रकारे हा एक वेगळाच अनुभव पहिल्यांदाच या लॉकडाऊन मुळे मला मिळत आहे, माझ्या शहरात राहणारे प्रत्येक कुटुंब प्रत्येक, व्यक्ती ,घराघरात आहे, कुणी टीव्ही पाहतो, कुणी आपल्या परिवाराबरोबर रमत-गमत खेळतो, कोणी प्राणायाम योगासनं करतो आहे,  कोणी  श्री साईसतचरित्र ग्रंथ वाचतआहे,कोणी श्री साई स्तवन मंजिरी , कोणी श्री हनुमान चालीसा  वाचत आहे,  कुणी ऐतिहासिक , कुणी कादंबऱ्या , पुस्तके  वाचून  आपला वेळ घालवत आहे,  वेळेचा सदुपयोग होत आहे ,कधी इतका वेळ मिळाला नाही,असा हा वेळ प्रत्येक जण घरात कुटुंबाबरोबर घालवतोआहे, ,कोणाला धावपळ ,गडबड ,टेन्शन नाही,सर्व काही शांत शांत, ना कोणाची देणेदारी ,ना कोणाची घेणेदारी, सर्वजण आपल्या घरात आहे व आहे त्यावरच  समाधान मानत आहे, मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, लहान असो मोठा असो ,महिला असो वा पुरुष असो, सर्वजण सारखे झाले आहेत, कोणाचा अहंभाव दुखणे नाही किंवा कोणाचा मानापमान होत नाही शिवीगाळ, मारामाऱ्या पाकीटमारी ,मोटर सायकल चोरी, चेंज स्नेकिंग ,लुटालुट ,सर्व काही थांबले आहे, शिर्डी पोलीस स्टेशन सुद्धा मारामाऱ्या,भांडणे अशा अनेक फिर्यादी मुळे नेहमी गजबजलेले ,मात्र आता येत नाही  फिर्यादी यांची गर्दी नाही शिरडीमध्ये अैध दारूधंदे ,मटका जुगार  अवैध वाहतूक, सर्व अवैध व्यवसाय प्रयत्न करूनही बंद न होणारे असे अनेक अवैध व्यवसाय या लॉक डाऊन मुळे काही न करता बंद पडले आहेत, अनेकदा वाहनांची शिस्त, ट्राफिक जाम समस्या सुटता सुटल्या जात नव्हत्या, परंतु ह्या।लॉकडाऊन मुळे शिर्डीत न ट्राफिक जाम, न कोठेही पार्किंग, आता सर्वकाही सुरळीत आहे ,या लॉकडाऊनमुळे आई ,वडील ,भाऊ-बहीण ,मुले सर्व आपापल्या घरात एकत्रित नांदत आहेत ,माझ्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक घरात आता एकत्रित आनंद , समाधान शांतता, निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे, ना रस्त्यावर हॉनचा कर्कश आवाजाचा त्रास,ना अपघात ,ना प्रदूषण सर्व काही स्वच्छ , सुदंर वातावरण मला वाटत आहे, दररोज कितीही साफ केले तरी कचरा होणारे रस्ते आता मात्र दररोज साफसफाई न करताही स्वच्छ दिसत आहेत, माझ्या भूमीत रस्त्यावर गुटखा खाऊन लाल रांगोळ्या काढणारे आता दिसत नाहीत, त्यामुळे रस्तेही ही अशा रांगोळ्याविना झाले आहेत, स्वच्छ, सुंदर शिर्डी आता खरी वाटू लागली आहे ,येथे सर्वत्र चौकाचौकात गप्पा मारत थांबणारे ,आडव्या-तिडव्या मोटरसायकल चालवणारे ,इकडून तिकडे फिरणारे दिसत नाहीत, प्रत्येक जण आता आपल्या घरातलॉकडाऊनच्या नियमामुळेजणू घरात बंद आहे, आता प्रत्येक जण आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकाबरोबर भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत आहे,लॉकडाऊन मुळे  एकमेकांवरील वरील प्रेम वाढले आहे ,प्रत्येक जण आपल्या भ्रमणध्वनीद्वारे प्रत्येक।जवळच्याची चौकशी करत आहे, प्रत्येकाला या  संकटातून मुक्त होण्यासाठी, मुकाबला करण्यासाठी शक्ती देण्याची विनंती साईबाबाकडे करीत आहे, आज पर्यंत कधी असा लॉक डाऊन मी पाहिला नाही, या लॉक डाऊन मध्ये आलेले गुढीपाडवा, रामनवमी गुडफायडे, शब्बे ए  बारात अशा विविध धर्माचे सण साजरे झाले नाहीत,झाले तरी घरातच झाले, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती असो ,ती ही साजरी कोठेही करण्यात आली नाही, जो तो आपापल्या परीने गरजूंना मदत करताना पाहून मलाही मोठा आनंद होत होता, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा लॉक डाऊन  मी या दिवसात पाहिला, येथे पोलिसांनी कितीही वेळा दारू बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु अवैध दारूधंदे ,मटका, दारू जुगार ,चालूच ।।परंतु या लॉक डाऊन मुळे काही न करता ते आपोआप बंद पडण्याच्या स्थितीत आहे, कोणतीही गोष्ट प्रयत्न करूनही जी होत नाही ती लॉकडाऊनच्या  सिद्ध करून टाकली आहे, त्यामुळे एका दृष्टीने मी जरी चिंतेत आहे ,लोकांच्या आर्थिक विवचंनेमुळे, नागरिकांची आर्थिक प्रगती स्तब्ध झाल्यामुळे मी नाराज जरी असले ,तरी मात्र एका दृष्टीने या लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टी चांगल्या घडल्या आहेत, प्रदूषण कमी झाले आहे, सकाळी उठल्याबरोबर वाहनांच्या हर्णैा एेवजी आता पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे, नेहमीच्या या धावपळीमध्ये प्रत्येक ठिकाणी मग दवाखाना असो ।बस रेल्वेचे, तिकीट काढणे असो। दर्शनासाठी रांगेत असो। कुठेही असो। आपला नंबर लवकर कसा लागेल ,अशा पद्धतीने वशिला लावणे व कसा नंबर लावून आपण पराक्रम करू, अशी प्रत्येक ठिकाणी असलेली धावपळ ,चढाओढ ,स्पर्धा, वशिलेबाजी या लॉकडाऊनमुळे कुठेही दिसून येत नाही ,माझ्या भूमी मधला प्रत्येक कुटुंबातील सदस्य जो नोकरीनिमित्त दुकानात किंवा कोठेही आपला काम धंदा करण्यासाठी जीवाची परवा न करता धावपळ करीत होता ,घरी न जेवता बाहेर नाश्ता चहा ,जेवण करुन रात्री च झोपायला येत होता, अश्या धावपळ करणाऱ्यांनाही आता यामुळे घरचा चहा ,घरचेनाष्टा, घरचे  जेवण घेऊन तृप्तीचे ढेकर मिळत आहे, अशा या लॉक डाऊनचे फायदे मी  माझ्या शहरात राहणाऱ्यांमध्ये पाहत आहे, बंद असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरातच कोणी दर्शन करत आहे, कोणी नमाज पडत आहे ,कोणी येशूला प्रार्थना करत आहे ,घर एक मंदिर झाले आहे, मज्जिद, चर्चे झाले आहे, हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे,आतायेथे कुणी दारुडे रस्त्याला दिसत नाही ,भांडणे ऐकू येत नाही ,इतर साथीच्या आजाराने गजबजलेले दवाखाने आता शांत वाटत आहे, कुठेही ना मारामारी,ना वादावादी ,रस्त्याला अपघात होत नाहीत साईभक्तांच्या  वाहनी मागे धावणारी पॉलीशवाले दिसत नाही,  याचना  करणारे भिकारी  नाही ,माझे सर्व रस्ते  ,गल्ल्या , चौक  ,सार्वजनिक ठिकाणे, सर्वत्रच  सेनेटायंझशन  झाले आहे , माझी भूमी जंतनाशक फवारणीने  स्वच्छ झाली आहे,आता कशाची चिंता नाही, सर्व काही शांत सुरू आहे ,लॉक डाऊन मुळे मलाही प्रथम मोठी चिंता वाटली होती, गजबजलेली ही माझी भूमी,दररोज लाखो रुपयांची उलाढाल, हजारो येणारे साई भक्त, देशात तिरुपती नंतर सर्वात श्रीमंत असणारे व प्रसिद्ध श्री साई मंदिर हे सर्व काही दिवसासाठी बंद होणार बस रेल्वे विमाने येणार नाहीत साईभक्त येणार नाहीत माझ्या भूमीत राहणाऱ्या नागरिकांचे कसे होणार।,हे ऐकूनच मी  थक्क झाले होते, मात्र या लॉकडाऊनकाळात काही गोष्टी अडचणीचे ठरले असतीलही, मात्र यामुळे मोठा फायदाही झाल्याचे मला तरी दिसत आहे, आतापर्यंत तरी शिर्डी व परिसरात कोरोना चा रुग्ण या मूळे तरी आढळला नाही, माझ्या भूमीमधील लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जाणवत येत आहे,  भौतिक समाधाना पेक्षा आत्मिक समाधान खूप महत्त्वाचे आहे, व ह्या लॉकडाऊन मुळे ते दाखवून दिले आहे, मानवाने सर्व निर्माण केले आहे ,मात्र निसर्ग त्याच्याही पुढे आहे ,या जगात ,या विश्वात एक शक्ती अशी आहे हे की तीच सर्व संचालन करत असते, तिलाच आपण देव, कोणी ईश्वर, अल्ला, बौद्ध अशा आपल्या प्रमाणे म्हणतात ,सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा आहेत, श्री साईबाबांच्या या साईनगरीत असा प्रथम आलेला लॉकडाऊन निसर्गाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही व या विश्वात ,या जगात किती विज्ञानाने पुढे गेले ,किती भौतिक सुख मिळाले ,कितीही मिसाईल, रणगाडे तयार केले, तरी या शक्तीची ,या निसर्गाची ताकद मोठी आहे, तिला प्रत्येकाने यापुढे तरी झिडकारून चालणार नाही, निसर्गाला व सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या देवतेला आपण नतमस्तक झालेच पाहिजे, व हे़ या लॉकडाऊन मुळे सर्व जगाला दाखवून दिले आहे, मग अमेरिका असो ,जपान ,इटली ,रूस असो किंवा बांगलादेश ,पाकिस्तान, नेपाळ असो ,जगातील सर्व देशांना, डोळ्यांना न दिसणाऱ्या या कोरोना विषाणू च्या प्रसारामुळे, संसर्गामुळे हैराण करून सोडले, मोठमोठे श्रीमंत, बलाढ्य देश सुद्धा हतबल झाले आहेत ,अशा परिस्थितीत, धावपळीच्या युगात, शांतता व सबुरी महत्वाची आहे ,व हाच श्री साईबाबांनी श्रद्धा सबुरी चा संदेश देऊन जगाला मोठी शिकवण दिली आहे, व हीच शिकवण यापुढे प्रत्येकाच्या जीवनात कामाला येणार आहे, असे साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या या भूमीने अनुभवलेल्या आजपर्यंतच्या इतिहासातील विविध प्रसंगातून, संकटातून मला तरी दिसून येतआहे, व श्री साईच यातून सर्वांना निभावून नेतील, याची मला तरी खात्री आहे,पण त्यासाठी श्री साईंचा सबुरी चा संदेश प्रत्येकाने आचरणात    आणून अजून काही दिवस तरी आपल्या घरातच राहणे माझ्या दृष्टीने तरी महत्त्वाचे ठरणार आहे, व भारत मातेसाठी तुमची ही शिर्डीमाता  आपणा सर्वांना हेच सांगत आहे.

शिर्डी  ।जितेश लोकचंदानी।  सध्या कोरोना मुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येत असणारे शालेय पोषण आहार बंद आहे,  बंद शालेय पोषण आहार असल्यामुळे त्याचे  अन्नधान्य शिल्लक आहे ,या शिल्लक अन्नधान्य साठ्याचे वाटप या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना करावयाचे असून या शाळेतील शिक्षकांनी तसे वेळापत्रक जाहीर केले आहे ,त्यानुसार प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांचे शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य घेऊन जावे, असे आवाहन श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी केले आहे
श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या  पत्रात  म्हटले आहे की ,शासन आदेशाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती-शालेय  पोषण  आहार शिक्षण विभाग पत्र दि.27/3/2020 नुसार -शाळेत शिल्लक तांदूळ व कडधान्य ( हरभरा, मूगडाळ,  मटकी, व तुरडाळ ) वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सदर तांदूळ व कडधान्य वाटपाचे नियोजन खालील प्रमाणे आहे.
साईनाथ विद्यालयातील 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप
वेळ  9 ते 12
5 वी   14.4.2020 मंगळवार
6 वी    15.4.2020बुधवार
7 वी   16.4.2020 गुरुवार
8 वी   17.4.2020 शुक्रवार
पालकांनी आपल्या मुलांच्या इयत्तेनुसार त्या तारखेला व वेळेला यावे व धान्य घेऊन जावे
 सर्व पालकांनी याच वेळी यावे, म्हणजे नियमाचे पालन करता येईल. एक -एक मीटर च्या चौकोनात उभे राहून माल वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच यावे . पालकांनी सोबत आधार कार्ड ठेवावे.
येताना 2 पिशव्या घेऊन यावे, तांदूळ व मटकी, हरभरा, तूरडाळ, मूगडाळ वाटप केले जाणार आहे.नियमित आहारात बसमावेश करावा असे आवाहान
श्री.मुठाल एस एम मुख्याध्यापक व शिक्षक आणि श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे स्कूल  व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष व सदस्य यांनी केले आहे.

शिर्डी ।जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
सध्या देशात, राज्यात कोरोनामुळे लॉकंडाऊन सुरू आहे, या लॉक डाऊन  काळात  गोरगरीब सर्वसामान्य व गरजूंना  मदतीचा हात म्हणून अनेक ठिकाणी  अन्नदान,  जेवण, नाश्ता  व खाद्य पदार्थांचे वाटप  केले जात आहे,  मात्र  काही ठिकाणी  वाटप करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर देऊन  त्याचा मोठा प्रचार केला जातो, त्यामुळे समाज  मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो  आहे ,त्यावर बंधन येणे गरजेचे  आहे, किंवा अशा जाणीवपूर्वक या गोष्टीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो टाकून प्रचार करणाऱ्या विरोधात कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे, 
भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे  सर्व जग हादरले आहे , कोरोनाचा संसर्ग देशात  वाढू नये  ,म्हणून देशात एकविस दिवसाचा लॉक डाऊन करण्यात आला, हा 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल ला संपत आहे, त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून बंद आहे ,त्यामुळे अनेक जण सर्व कामकाज बंद असल्याने घरात आहेत, गोरगरीब सर्वसामान्यांना काम धंदा नसल्यामुळे आर्थिक चंणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे, ग्रामीण भागात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गोरगरीब व गरजूंना अन्न ,जेवण खाद्य पदार्थाचे अनेक ठिकाणी  मदत म्हणून वाटप केले जात आहे, मात्र या खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटोसेशन व हे फोटो सोशल मीडियावर टाकून प्रचार करण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आता घडत आहे, त्यामुळे या फोटोसेशन वर बंदी आणावी किंवा असे करणार्‍यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे व 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे, त्यामुळे सर्वजण कामधंदा सोडून घरात आहेत, सर्व दुकाने बंद आहेत, अशा परिस्थितीत सर्वांना आर्थिक चणचण भासत आहे ,मात्र अशा गोरगरीब सर्वसामान्य माणसांना एक माणुसकीचा हात दाखवत अनेक दानशूर व्यक्ती वेगवेगळ्या प्रकाराने या संकट समयी सर्वसामान्य व गरजूंना मदत करीत आहेत, ही  मदत वेगवेगळ्या प्रकारची आहे ,ही चांगली गोष्ट आहे, व अशा वेळी  मानवतेच्या दृष्टिकोनातून  एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे ,मात्र काहीजण अन्न, जेवण ,नाष्टा व खाद्य पदार्थांचे वाटप करताना आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकत असल्याने व त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आता होऊ लागल्याने यावर कारवाई होणे गरजेचे आहे,
 राजस्थानमधील अजमेर  येथील जिल्हाधिकारी शर्मा यांनी तसे आदेश काढले असून खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटो काढून ते जर सोशल मीडियावर टाकले तर अशा व्यक्तींवर भारतीय कायद्यान्वये कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे ,असेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करण्याची गरज आहे, कोरोणामुळे सध्या राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, मात्र असे करताना विशेषता अन्नदान करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे योग्य नाही ,अन्नदान किंवा मदत करण्यापेक्षा अनेक जण नुसता आपला प्रचार किंवा या प्रकाराचा जास्त बाऊ करण्यामध्ये पुढे आहेत, थोडेफार नावापुरते अन्नदान किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करायचे व फोटो काढून ते सोशल मेडीयावर टाकून त्याचा मोठा गवगवा करायचा, असे प्रकार आता अनेक ठिकाणी होऊ लागली आहेत ,त्यामुळे त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, म्हणून यापुढे तरी प्रत्येकाने मदत करताना विशेषता अन्नदान व खाद्यपदार्थ गरजूंना वाटप करताना, लॉक डाऊन चे नियम पाळत व त्याचे फोटो सोशल मीडियावर न देता ही मदत करावी ,अन्यथा जाणीवपूर्वक फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर व ते  उघडकीस आल्यानंतर  अशा व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,

श्रीरामपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोरगरीब, गरजू, हातावर पोट असणारे उपाशीपोटी राहू नये यासाठी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र कृषक समाज व आदिक कुटुंबियांच्या वतीने ३२ क्विंटल गहू, तांदूळ व १६ क्विंटल हरभरा दाळीचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य शहरातील प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना सुपूर्द करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात लॉकडाऊन आहे. त्यामुळे मजूर, गोरगरीबांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हा लॉकडाऊन आणखी १५ दिवसांनी वाढणार असल्याने असंख्य नागरिकांसमोर आता पोटापाण्याचा प्रश्न उभा राहणार आहे.
वडिल स्व. ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक याच्याच पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र कृषक समाज व अविनाश आदिक यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा छोटासा प्रयत्न असल्याचे सांगून नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणीही उपाशी पोटी राहू नये यासाठी शहरातील गरजुंना नगरसेवकांच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. यात प्रत्येकी ३२ क्विंटल गहू व तांदूळ व १६ क्विंटल हरभरा डाळीचा समावेश आहे. शहरातील ३२ प्रभागातील नगरसेवक राजकारणविरहीत कोणताही भेदभाव न पाळता आपल्यापरीने गरीब, गरजू कुटुंबांना मदत करत आहेत. या मध्यमातून त्यांना हातभार लागावा म्हणून प्रत्येक नगरसेवकाला १०० किलो गहू, तांदूळ व ५० किलो हरभरा दाळ देण्यात येत आहे. या धान्यात नगरसेवक त्यांच्याकडील अन्नधान्याची भर घालून ते आपल्या प्रभागातील गरजुंना वितरीत करणार आहेत.

तसेच शहरातील ४६० दिव्यांगांना मास्क, सॅनिटायझर, टॉवेल व साबण असा किट वाटण्यात येणार आहे. दशमेशनगरला गुरूद्वार व सरस्वती कॉलनी येथील साईमंदिरात अन्नछत्र चालू असून त्यांनाही प्रत्येकी १०० किलो तांदूळ देण्यात येणार असल्याचे आदिक यांनी सांगितले. यावेळी डॉ. रवींद्र जगधने, नगरसेवक राजेंद्र पवार, रवी पाटील, रोहित शिंदे, दीपक चरण चव्हाण, अल्तमश पटेल, डॉ. ऋतुजा जगधने आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर  ( प्रतिनिधी  )- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या तांदुळाचे वाटप श्रीरामपूर तालुक्यात सुरु झाले असुन प्रति व्यक्ती पाच किलो देण्यात येणारा तांदूळ विनामूल्य आहे त्याचा लाभ कार्डधाराकांनी घ्यावा असे अवाहन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांनी केले आहे    श्रीरामपूर  शहरातील  सरस्वती महीला बचत गट व भाग्यलक्ष्मी महीला बचत गटाच्या वतीने  केंद्र शासनाकडून   आलेल्या तांदुळाचे वाटप जिल्हाध्यक्ष देविदास देसाई  यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते या वेळी पत्रकार बद्रिनारायण वढणे उपस्थित  होते  जिल्हाध्यक्ष देविदास देसाई पुढे म्हणाले की केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला तांदुळ तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वाटप तालुक्यात सुरु झालेले आहे केशरी कार्डधारकासाठी शासनाने धान्य देण्याची घोषणा केली असली तरी ते गहु व तांदूळ मे महीन्यात मिळणार आहे केशरी कार्डावर मिळणारा गहु आठ रुपये व तांदूळ बारा रुपये किलोने दिला जाणार आहे सध्या केशरी कार्डधारकांचा माल दुकानदारांना मिळाला नसला तरी ते कार्डधारक दुकानदारांशी माल मिळण्या करीता वाद घालत आहे  तो माल दुकानात उपलब्ध होताच त्याचेही वाटप केले जाईल कोरोनाच्या संकट काळात दुकानदार जिव मुठीत धरुन आपले काम करत आहे शासन स्तरावर दुकानदारांना कसल्याच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाही तरीही दुकानदार आपले काम करत आहे अनेक दुकानदारांनी मास्कचे वाटप करुन वाटप करताना सोशल डिस्टनचा नियम पाळलेला आहे मानसिक दडपणा खाली असणार्या दुकानदारांना  कार्डधारकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे फार त्रास होत आहे  दुकानदारांचा उत्साह  वाढविणे आपल्या हातात आहे  माणूस म्हणून आपणही दुकानदारांच्या पाठीशी उभे रहावे असे अवाहनही देसाई यांनी केले आहे श्रीरामपूर तालुक्यात असणारे मांडवे येथेही मोफत तांदूळाचे वाटप प्रवरा साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बाजार समितीचे संचालक मुक्ताजी पटांगरे आण्णासाहेब गेठे यांच्या हस्ते करण्यात आले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget