शिर्डी ।जितेश लोकचंदानी। सध्या कोरोना मुळे शाळा बंद आहेत, त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येत असणारे शालेय पोषण आहार बंद आहे, बंद शालेय पोषण आहार असल्यामुळे त्याचे अन्नधान्य शिल्लक आहे ,या शिल्लक अन्नधान्य साठ्याचे वाटप या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना करावयाचे असून या शाळेतील शिक्षकांनी तसे वेळापत्रक जाहीर केले आहे ,त्यानुसार प्रत्येक पालकाने आपल्या पाल्यांचे शालेय पोषण आहाराचे अन्नधान्य घेऊन जावे, असे आवाहन श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांनी केले आहे
श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाच्या पत्रात म्हटले आहे की ,शासन आदेशाने व गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती-शालेय पोषण आहार शिक्षण विभाग पत्र दि.27/3/2020 नुसार -शाळेत शिल्लक तांदूळ व कडधान्य ( हरभरा, मूगडाळ, मटकी, व तुरडाळ ) वितरित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
सदर तांदूळ व कडधान्य वाटपाचे नियोजन खालील प्रमाणे आहे.
साईनाथ विद्यालयातील 5वी ते 8वी च्या विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप
वेळ 9 ते 12
5 वी 14.4.2020 मंगळवार
6 वी 15.4.2020बुधवार
7 वी 16.4.2020 गुरुवार
8 वी 17.4.2020 शुक्रवार
पालकांनी आपल्या मुलांच्या इयत्तेनुसार त्या तारखेला व वेळेला यावे व धान्य घेऊन जावे
सर्व पालकांनी याच वेळी यावे, म्हणजे नियमाचे पालन करता येईल. एक -एक मीटर च्या चौकोनात उभे राहून माल वितरित करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपल्या तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधूनच यावे . पालकांनी सोबत आधार कार्ड ठेवावे.
येताना 2 पिशव्या घेऊन यावे, तांदूळ व मटकी, हरभरा, तूरडाळ, मूगडाळ वाटप केले जाणार आहे.नियमित आहारात बसमावेश करावा असे आवाहान
श्री.मुठाल एस एम मुख्याध्यापक व शिक्षक आणि श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयाचे स्कूल व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष व सदस्य यांनी केले आहे.
Post a Comment