पहिल्यांदाच शिर्डी मी शांत शांत, गुदमरलेल्या श्वासातून मुक्त प्रत्येक जण निवांत।। घेऊ काही दिवस आनंद मनसोक्त.

पहिल्यांदाच अशी झाले मी शांत शिर्डी
शिर्डी (राजेंद्र गडकरी) - सध्या कोरोनामुळे देशभर लॉक डाऊन सुरू आहे, देशात, राज्यात या भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे मोठे संकट निर्माण झाले आहे, या कोरोनामुळे जगात हाहाकार उडाला आहे,त्यामुळे श्रीमंत व स्वतःला महासत्ता समजणारे देशही हतबल झाले आहे, अशा परिस्थितीत आपल्या भारत भूमीमध्ये सुद्धा या कोरोनाने  शिरकाव केला आहे, अशा कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी आपल्या भारत देशात वेळेत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला , अश्या 25 मार्चपासून सुरू झालेल्या 21 दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये पहिल्यांदाच 135कोटी लोकसंख्या
असणाऱ्या या भारत देशातील अत्यावश्यक सेवा सोडून सर्व उद्योग ,काम, धंदा बस, रेल्वे ,विमान सर्व काही बंद आहे, रस्ते ओस आहे ,सर्वजण आपापल्या घरात आहेत, अशा परिस्थितीमुळे देशात ,राज्यात, जिल्ह्यात सर्वत्र शांत, शांत आहे, अश्याच परिस्थितीत मी तरी कशी गजबजलेली राहणार.श्री साईबाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी हि भूमी, मी रात्रंदिवस गजबजलेली, साई नामाचा जयजयकार एेकणारी, नेहमी साईभक्तीची गीते, जयघोष, कानाला ऐकू येणारीसाईचीं ललकारी, हे सर्व आता मी शांत शांत ऐकत आहे,
देशातील सर्वच मंदिरे, चर्च ,मज्जिद, गुरुद्वारे, सर्वकाही भक्तांच्या दर्शनासाठी बंद आहे ,मग येथे असणारे श्री साईबाबांचे मंदिरही 17 मार्च 2020 दुपारी तीन वाजेपासून साईभक्तांना दर्शनासाठी बंद करण्यात आले ,श्री साई संस्थानने आपले निवासस्थाने व प्रसादलय बंद केली ,त्यानंतर 25 मार्चला देशभर लॉकडाऊन सुरु झाला, आणि मग काय सर्वच बस, रेल्वे, विमाने, खाजगी वाहने, येणे बंद झाले,येथे येणारे साईभक्तांची संख्या शून्य झाली, दररोज फुलांचा भरणारा बाजारही बंद आहे, जिकडेतिकडे दिसणारे मोठे गुलाबाचे पुष्पहार व वेगवेगळ्या फुलांचा सुगंध ही दिसेनासा झाला आहे.या लॉकं डाऊन काळातच आलेला श्रीरामनवमी चा मोठाउत्सव सुद्धा बिगरसाईपालख्या  व पदयात्री आणि साईभक्तांच्या अनुपस्थित साजरा झाला, दरवर्षी रामनवमीला माझ्या  भूमीत येणारे लाखो साईभक्त मात्र यावर्षी एकही साईभक्त आला नाही, ना विद्युतरोषणाई ना पताका, ना जयजयकार ना गजबजलेले वातावरण, ना गर्दी,ना वाहनांची ये-जा,ना संस्कृतिक कार्यक्रम,ना पाळणे,ना खेळण्याची दुकाने, सर्वकाही रद्द झाले, श्री साईबाबांनी 1911 पासून हा श्रीरामनवमी उत्सव सुरू केला,  एकदा शिरडीत।महामारी प्लेगची  साथ आली, मात्र त्यावेळी एवढे वातावरण झाले नाही, कारण तीचा बंदोबस्त श्री साईंनी मिशीवर पीठ टाकून   केला होता,  त्यावेळेस श्री साईंनी लक्ष्मणरेषा आखली होती, जणू तीच लक्ष्मणरेषा, तोच संदेश आज घराबाहेर न पडण्यासाठी कामात येत आहे ,
 या कोरोना महामारी मुळे ह्या माझ्या नगरी तला श्रीरामनवमीचा  उत्सव मात्र यावर्षी साजरा झाला खरा परंतु सुनासुना, ।।माझ्या कानावर ना श्री साईचा जयजयकार आला ,ना साईरथावरील गीते ,ना पादचाऱ्यांचा तो जयघोष ,माझ्या कानी पडला नाही, अशी ही रामनवमी पहिल्यादाच अगदी शांत गेली, अशा या शांत शांत परिस्थितीत मलाही आता खरं उबग आली आहे,कारण येथे  सर्व काही बंद आहे, सर्व रस्ते ओस पडले आहेत, अत्यावश्यक सेवा ची दुकाने सोडून सर्व काही बंद आहे, प्रत्येकजण आपापल्या घरात आहे, शाळा, महाविद्यालये, खासगी ट्रॅव्हल्स ,व्यवसायिक नोकरदार, यांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत, सर्वत्र सुने, सुने वातावरण आहे, अशा या सुन्या सुन्या ,शांत ,शांत वातावरणाचा मलाही या पंधरा वीस दिवसात अनुभव आला आहे, मीही आता ही आता आनंद घेत आहे, नेहमी गजबजलेल्या वातावरणापेक्षा हे शांत शांत वातावरण मलाही जरा हळूहळू बरे वाटायला लागले आहे, नेहमी गजबजलेली माझी शिर्डीचीभूमी आणि आत्ताची शांत माझी भूमी,  यात मोठा फरक मला जाणवत आहे, पहाटेच उठून येथील प्रत्येक माणूस व त्याचे जीवन हे सुरू होऊन दिवसभर धावपळ दिसायची, प्रत्येक जण सकाळी पहाटे उठल्यापासून संध्याकाळी रात्री उशिरा झोपेपर्यंत आपल्या कामात दंग, कोणी दुकान उघडतो, कोणी येणाऱ्या साईभक्तांचे स्वागत करण्यास नाक्यावर तत्पर असतो ,कोणी फुले  विकतो, कुणी साई सेवक म्हणून पॉलिसी चे काम करतो, कोणी दुकानात धंदा करतो, कुणी दर्शनासाठी गडबड करतो, तर कोणी नोकरीवर जाण्यासाठी, मुले ,विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी, कुणी बस पकडण्यासाठी, कोणी रेल्वे ,विमान, पकडण्यासाठी मोठी धावपळ करताना नेहमी मी पाहत होते, मात्र गेल्या काही दिवसापासून कोणाचीही धावपळ दिसत नाही ,माझ्या भूमीत असणारे ,अनेक बसेस व प्रवाशांनी नि गजबजलेले बसस्टॅन्ड आता सुनेसुने आहे, कधीही सामसूम न दिसणारे शिर्डी बस स्थानक मात्र अगदी सुनेसुने दिसत आहे , साई नगरीला रेल्वेही येत नाही, रेल्वे स्थानक, रेल्वे स्थानकाबाहेर रेल्वेची वाट बघणारे रिक्षा चालक, व त्यांच्या रिक्षांचा घोळका आता शांत झाला आहे, शिर्डीला  येणारे विमानेही  बंद झाल्याने येथील विमानतळ शांत झाला आहे, या विमानतळा बाहेर प्रवाशांना ने आण करणाऱ्या कारही आता आपल्या घराच्या अंगणात उभ्या आहेत, शिर्डीत सर्वकाही शांत आहे ,नेहमी मी गजबजलेली शिर्डी  एकदमच शांत झाली आहे ,त्यामुळे एक प्रकारे हा एक वेगळाच अनुभव पहिल्यांदाच या लॉकडाऊन मुळे मला मिळत आहे, माझ्या शहरात राहणारे प्रत्येक कुटुंब प्रत्येक, व्यक्ती ,घराघरात आहे, कुणी टीव्ही पाहतो, कुणी आपल्या परिवाराबरोबर रमत-गमत खेळतो, कोणी प्राणायाम योगासनं करतो आहे,  कोणी  श्री साईसतचरित्र ग्रंथ वाचतआहे,कोणी श्री साई स्तवन मंजिरी , कोणी श्री हनुमान चालीसा  वाचत आहे,  कुणी ऐतिहासिक , कुणी कादंबऱ्या , पुस्तके  वाचून  आपला वेळ घालवत आहे,  वेळेचा सदुपयोग होत आहे ,कधी इतका वेळ मिळाला नाही,असा हा वेळ प्रत्येक जण घरात कुटुंबाबरोबर घालवतोआहे, ,कोणाला धावपळ ,गडबड ,टेन्शन नाही,सर्व काही शांत शांत, ना कोणाची देणेदारी ,ना कोणाची घेणेदारी, सर्वजण आपल्या घरात आहे व आहे त्यावरच  समाधान मानत आहे, मग तो गरीब असो वा श्रीमंत असो, लहान असो मोठा असो ,महिला असो वा पुरुष असो, सर्वजण सारखे झाले आहेत, कोणाचा अहंभाव दुखणे नाही किंवा कोणाचा मानापमान होत नाही शिवीगाळ, मारामाऱ्या पाकीटमारी ,मोटर सायकल चोरी, चेंज स्नेकिंग ,लुटालुट ,सर्व काही थांबले आहे, शिर्डी पोलीस स्टेशन सुद्धा मारामाऱ्या,भांडणे अशा अनेक फिर्यादी मुळे नेहमी गजबजलेले ,मात्र आता येत नाही  फिर्यादी यांची गर्दी नाही शिरडीमध्ये अैध दारूधंदे ,मटका जुगार  अवैध वाहतूक, सर्व अवैध व्यवसाय प्रयत्न करूनही बंद न होणारे असे अनेक अवैध व्यवसाय या लॉक डाऊन मुळे काही न करता बंद पडले आहेत, अनेकदा वाहनांची शिस्त, ट्राफिक जाम समस्या सुटता सुटल्या जात नव्हत्या, परंतु ह्या।लॉकडाऊन मुळे शिर्डीत न ट्राफिक जाम, न कोठेही पार्किंग, आता सर्वकाही सुरळीत आहे ,या लॉकडाऊनमुळे आई ,वडील ,भाऊ-बहीण ,मुले सर्व आपापल्या घरात एकत्रित नांदत आहेत ,माझ्या शहरात राहणाऱ्या प्रत्येक घरात आता एकत्रित आनंद , समाधान शांतता, निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे, ना रस्त्यावर हॉनचा कर्कश आवाजाचा त्रास,ना अपघात ,ना प्रदूषण सर्व काही स्वच्छ , सुदंर वातावरण मला वाटत आहे, दररोज कितीही साफ केले तरी कचरा होणारे रस्ते आता मात्र दररोज साफसफाई न करताही स्वच्छ दिसत आहेत, माझ्या भूमीत रस्त्यावर गुटखा खाऊन लाल रांगोळ्या काढणारे आता दिसत नाहीत, त्यामुळे रस्तेही ही अशा रांगोळ्याविना झाले आहेत, स्वच्छ, सुंदर शिर्डी आता खरी वाटू लागली आहे ,येथे सर्वत्र चौकाचौकात गप्पा मारत थांबणारे ,आडव्या-तिडव्या मोटरसायकल चालवणारे ,इकडून तिकडे फिरणारे दिसत नाहीत, प्रत्येक जण आता आपल्या घरातलॉकडाऊनच्या नियमामुळेजणू घरात बंद आहे, आता प्रत्येक जण आपल्या मित्रांबरोबर, नातेवाईकाबरोबर भ्रमणध्वनीद्वारे एकमेकांची आपुलकीने विचारपूस करत आहे,लॉकडाऊन मुळे  एकमेकांवरील वरील प्रेम वाढले आहे ,प्रत्येक जण आपल्या भ्रमणध्वनीद्वारे प्रत्येक।जवळच्याची चौकशी करत आहे, प्रत्येकाला या  संकटातून मुक्त होण्यासाठी, मुकाबला करण्यासाठी शक्ती देण्याची विनंती साईबाबाकडे करीत आहे, आज पर्यंत कधी असा लॉक डाऊन मी पाहिला नाही, या लॉक डाऊन मध्ये आलेले गुढीपाडवा, रामनवमी गुडफायडे, शब्बे ए  बारात अशा विविध धर्माचे सण साजरे झाले नाहीत,झाले तरी घरातच झाले, हनुमान जयंती, महात्मा ज्योतिराव फुले जयंती असो ,ती ही साजरी कोठेही करण्यात आली नाही, जो तो आपापल्या परीने गरजूंना मदत करताना पाहून मलाही मोठा आनंद होत होता, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एवढा मोठा लॉक डाऊन  मी या दिवसात पाहिला, येथे पोलिसांनी कितीही वेळा दारू बंद करण्याचा प्रयत्न केला, परंतु अवैध दारूधंदे ,मटका, दारू जुगार ,चालूच ।।परंतु या लॉक डाऊन मुळे काही न करता ते आपोआप बंद पडण्याच्या स्थितीत आहे, कोणतीही गोष्ट प्रयत्न करूनही जी होत नाही ती लॉकडाऊनच्या  सिद्ध करून टाकली आहे, त्यामुळे एका दृष्टीने मी जरी चिंतेत आहे ,लोकांच्या आर्थिक विवचंनेमुळे, नागरिकांची आर्थिक प्रगती स्तब्ध झाल्यामुळे मी नाराज जरी असले ,तरी मात्र एका दृष्टीने या लॉकडाऊन मुळे अनेक गोष्टी चांगल्या घडल्या आहेत, प्रदूषण कमी झाले आहे, सकाळी उठल्याबरोबर वाहनांच्या हर्णैा एेवजी आता पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे, नेहमीच्या या धावपळीमध्ये प्रत्येक ठिकाणी मग दवाखाना असो ।बस रेल्वेचे, तिकीट काढणे असो। दर्शनासाठी रांगेत असो। कुठेही असो। आपला नंबर लवकर कसा लागेल ,अशा पद्धतीने वशिला लावणे व कसा नंबर लावून आपण पराक्रम करू, अशी प्रत्येक ठिकाणी असलेली धावपळ ,चढाओढ ,स्पर्धा, वशिलेबाजी या लॉकडाऊनमुळे कुठेही दिसून येत नाही ,माझ्या भूमी मधला प्रत्येक कुटुंबातील सदस्य जो नोकरीनिमित्त दुकानात किंवा कोठेही आपला काम धंदा करण्यासाठी जीवाची परवा न करता धावपळ करीत होता ,घरी न जेवता बाहेर नाश्ता चहा ,जेवण करुन रात्री च झोपायला येत होता, अश्या धावपळ करणाऱ्यांनाही आता यामुळे घरचा चहा ,घरचेनाष्टा, घरचे  जेवण घेऊन तृप्तीचे ढेकर मिळत आहे, अशा या लॉक डाऊनचे फायदे मी  माझ्या शहरात राहणाऱ्यांमध्ये पाहत आहे, बंद असल्यामुळे प्रत्येक जण आपल्या घरातच कोणी दर्शन करत आहे, कोणी नमाज पडत आहे ,कोणी येशूला प्रार्थना करत आहे ,घर एक मंदिर झाले आहे, मज्जिद, चर्चे झाले आहे, हे पाहून मला मोठे समाधान वाटत आहे,आतायेथे कुणी दारुडे रस्त्याला दिसत नाही ,भांडणे ऐकू येत नाही ,इतर साथीच्या आजाराने गजबजलेले दवाखाने आता शांत वाटत आहे, कुठेही ना मारामारी,ना वादावादी ,रस्त्याला अपघात होत नाहीत साईभक्तांच्या  वाहनी मागे धावणारी पॉलीशवाले दिसत नाही,  याचना  करणारे भिकारी  नाही ,माझे सर्व रस्ते  ,गल्ल्या , चौक  ,सार्वजनिक ठिकाणे, सर्वत्रच  सेनेटायंझशन  झाले आहे , माझी भूमी जंतनाशक फवारणीने  स्वच्छ झाली आहे,आता कशाची चिंता नाही, सर्व काही शांत सुरू आहे ,लॉक डाऊन मुळे मलाही प्रथम मोठी चिंता वाटली होती, गजबजलेली ही माझी भूमी,दररोज लाखो रुपयांची उलाढाल, हजारो येणारे साई भक्त, देशात तिरुपती नंतर सर्वात श्रीमंत असणारे व प्रसिद्ध श्री साई मंदिर हे सर्व काही दिवसासाठी बंद होणार बस रेल्वे विमाने येणार नाहीत साईभक्त येणार नाहीत माझ्या भूमीत राहणाऱ्या नागरिकांचे कसे होणार।,हे ऐकूनच मी  थक्क झाले होते, मात्र या लॉकडाऊनकाळात काही गोष्टी अडचणीचे ठरले असतीलही, मात्र यामुळे मोठा फायदाही झाल्याचे मला तरी दिसत आहे, आतापर्यंत तरी शिर्डी व परिसरात कोरोना चा रुग्ण या मूळे तरी आढळला नाही, माझ्या भूमीमधील लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला जाणवत येत आहे,  भौतिक समाधाना पेक्षा आत्मिक समाधान खूप महत्त्वाचे आहे, व ह्या लॉकडाऊन मुळे ते दाखवून दिले आहे, मानवाने सर्व निर्माण केले आहे ,मात्र निसर्ग त्याच्याही पुढे आहे ,या जगात ,या विश्वात एक शक्ती अशी आहे हे की तीच सर्व संचालन करत असते, तिलाच आपण देव, कोणी ईश्वर, अल्ला, बौद्ध अशा आपल्या प्रमाणे म्हणतात ,सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान श्री साईबाबा आहेत, श्री साईबाबांच्या या साईनगरीत असा प्रथम आलेला लॉकडाऊन निसर्गाची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही व या विश्वात ,या जगात किती विज्ञानाने पुढे गेले ,किती भौतिक सुख मिळाले ,कितीही मिसाईल, रणगाडे तयार केले, तरी या शक्तीची ,या निसर्गाची ताकद मोठी आहे, तिला प्रत्येकाने यापुढे तरी झिडकारून चालणार नाही, निसर्गाला व सर्वात मोठी शक्ती असणाऱ्या देवतेला आपण नतमस्तक झालेच पाहिजे, व हे़ या लॉकडाऊन मुळे सर्व जगाला दाखवून दिले आहे, मग अमेरिका असो ,जपान ,इटली ,रूस असो किंवा बांगलादेश ,पाकिस्तान, नेपाळ असो ,जगातील सर्व देशांना, डोळ्यांना न दिसणाऱ्या या कोरोना विषाणू च्या प्रसारामुळे, संसर्गामुळे हैराण करून सोडले, मोठमोठे श्रीमंत, बलाढ्य देश सुद्धा हतबल झाले आहेत ,अशा परिस्थितीत, धावपळीच्या युगात, शांतता व सबुरी महत्वाची आहे ,व हाच श्री साईबाबांनी श्रद्धा सबुरी चा संदेश देऊन जगाला मोठी शिकवण दिली आहे, व हीच शिकवण यापुढे प्रत्येकाच्या जीवनात कामाला येणार आहे, असे साईंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या माझ्या या भूमीने अनुभवलेल्या आजपर्यंतच्या इतिहासातील विविध प्रसंगातून, संकटातून मला तरी दिसून येतआहे, व श्री साईच यातून सर्वांना निभावून नेतील, याची मला तरी खात्री आहे,पण त्यासाठी श्री साईंचा सबुरी चा संदेश प्रत्येकाने आचरणात    आणून अजून काही दिवस तरी आपल्या घरातच राहणे माझ्या दृष्टीने तरी महत्त्वाचे ठरणार आहे, व भारत मातेसाठी तुमची ही शिर्डीमाता  आपणा सर्वांना हेच सांगत आहे.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget