शिर्डी ।जितेश लोकचंदानी। निवासी संपादक
सध्या देशात, राज्यात कोरोनामुळे लॉकंडाऊन सुरू आहे, या लॉक डाऊन काळात गोरगरीब सर्वसामान्य व गरजूंना मदतीचा हात म्हणून अनेक ठिकाणी अन्नदान, जेवण, नाश्ता व खाद्य पदार्थांचे वाटप केले जात आहे, मात्र काही ठिकाणी वाटप करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर देऊन त्याचा मोठा प्रचार केला जातो, त्यामुळे समाज मनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे ,त्यावर बंधन येणे गरजेचे आहे, किंवा अशा जाणीवपूर्वक या गोष्टीचा फायदा घेत सोशल मीडियावर फोटो टाकून प्रचार करणाऱ्या विरोधात कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे,
भयंकर अशा कोरोना विषाणूमुळे सर्व जग हादरले आहे , कोरोनाचा संसर्ग देशात वाढू नये ,म्हणून देशात एकविस दिवसाचा लॉक डाऊन करण्यात आला, हा 21 दिवसांचा लॉकडाऊन 14 एप्रिल ला संपत आहे, त्यानंतरही लॉकडाऊनचा कालावधी 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात आला आहे, सर्वत्र अत्यावश्यक सेवा सोडून बंद आहे ,त्यामुळे अनेक जण सर्व कामकाज बंद असल्याने घरात आहेत, गोरगरीब सर्वसामान्यांना काम धंदा नसल्यामुळे आर्थिक चंणचण मोठ्या प्रमाणात भासत आहे, ग्रामीण भागात हे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे गोरगरीब व गरजूंना अन्न ,जेवण खाद्य पदार्थाचे अनेक ठिकाणी मदत म्हणून वाटप केले जात आहे, मात्र या खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटोसेशन व हे फोटो सोशल मीडियावर टाकून प्रचार करण्याच्या प्रकार मोठ्या प्रमाणात आता घडत आहे, त्यामुळे या फोटोसेशन वर बंदी आणावी किंवा असे करणार्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,
सध्या कोरोनामुळे सर्वत्र लॉक डाऊन आहे व 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढला आहे, त्यामुळे सर्वजण कामधंदा सोडून घरात आहेत, सर्व दुकाने बंद आहेत, अशा परिस्थितीत सर्वांना आर्थिक चणचण भासत आहे ,मात्र अशा गोरगरीब सर्वसामान्य माणसांना एक माणुसकीचा हात दाखवत अनेक दानशूर व्यक्ती वेगवेगळ्या प्रकाराने या संकट समयी सर्वसामान्य व गरजूंना मदत करीत आहेत, ही मदत वेगवेगळ्या प्रकारची आहे ,ही चांगली गोष्ट आहे, व अशा वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे ,मात्र काहीजण अन्न, जेवण ,नाष्टा व खाद्य पदार्थांचे वाटप करताना आपले फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकत असल्याने व त्याचा प्रचार मोठ्या प्रमाणात आता होऊ लागल्याने यावर कारवाई होणे गरजेचे आहे,
राजस्थानमधील अजमेर येथील जिल्हाधिकारी शर्मा यांनी तसे आदेश काढले असून खाद्य पदार्थांचे वाटप करताना फोटो काढून ते जर सोशल मीडियावर टाकले तर अशा व्यक्तींवर भारतीय कायद्यान्वये कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे अजमेरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे ,असेच आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात करण्याची गरज आहे, कोरोणामुळे सध्या राज्यात मोठे संकट निर्माण झाले आहे, अशा परिस्थितीत मदत करणे, एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे, मात्र असे करताना विशेषता अन्नदान करताना फोटो काढून ते सोशल मीडियावर टाकणे योग्य नाही ,अन्नदान किंवा मदत करण्यापेक्षा अनेक जण नुसता आपला प्रचार किंवा या प्रकाराचा जास्त बाऊ करण्यामध्ये पुढे आहेत, थोडेफार नावापुरते अन्नदान किंवा खाद्य पदार्थांचे वाटप करायचे व फोटो काढून ते सोशल मेडीयावर टाकून त्याचा मोठा गवगवा करायचा, असे प्रकार आता अनेक ठिकाणी होऊ लागली आहेत ,त्यामुळे त्याचा समाजावर विपरीत परिणाम होत आहे, म्हणून यापुढे तरी प्रत्येकाने मदत करताना विशेषता अन्नदान व खाद्यपदार्थ गरजूंना वाटप करताना, लॉक डाऊन चे नियम पाळत व त्याचे फोटो सोशल मीडियावर न देता ही मदत करावी ,अन्यथा जाणीवपूर्वक फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यानंतर व ते उघडकीस आल्यानंतर अशा व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी आता सुज्ञ नागरिकांकडून होत आहे,
Post a Comment