श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या तांदुळाचे वाटप श्रीरामपूर तालुक्यात सुरु झाले असुन प्रति व्यक्ती पाच किलो देण्यात येणारा तांदूळ विनामूल्य आहे त्याचा लाभ कार्डधाराकांनी घ्यावा असे अवाहन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केले आहे श्रीरामपूर शहरातील सरस्वती महीला बचत गट व भाग्यलक्ष्मी महीला बचत गटाच्या वतीने केंद्र शासनाकडून आलेल्या तांदुळाचे वाटप जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते या वेळी पत्रकार बद्रिनारायण वढणे उपस्थित होते जिल्हाध्यक्ष देविदास देसाई पुढे म्हणाले की केंद्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला तांदुळ तालुक्यात पोहोच झाला असुन त्याचे वाटप तालुक्यात सुरु झालेले आहे केशरी कार्डधारकासाठी शासनाने धान्य देण्याची घोषणा केली असली तरी ते गहु व तांदूळ मे महीन्यात मिळणार आहे केशरी कार्डावर मिळणारा गहु आठ रुपये व तांदूळ बारा रुपये किलोने दिला जाणार आहे सध्या केशरी कार्डधारकांचा माल दुकानदारांना मिळाला नसला तरी ते कार्डधारक दुकानदारांशी माल मिळण्या करीता वाद घालत आहे तो माल दुकानात उपलब्ध होताच त्याचेही वाटप केले जाईल कोरोनाच्या संकट काळात दुकानदार जिव मुठीत धरुन आपले काम करत आहे शासन स्तरावर दुकानदारांना कसल्याच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या नाही तरीही दुकानदार आपले काम करत आहे अनेक दुकानदारांनी मास्कचे वाटप करुन वाटप करताना सोशल डिस्टनचा नियम पाळलेला आहे मानसिक दडपणा खाली असणार्या दुकानदारांना कार्डधारकांनी केलेल्या प्रश्नांच्या भडीमारामुळे फार त्रास होत आहे दुकानदारांचा उत्साह वाढविणे आपल्या हातात आहे माणूस म्हणून आपणही दुकानदारांच्या पाठीशी उभे रहावे असे अवाहनही देसाई यांनी केले आहे श्रीरामपूर तालुक्यात असणारे मांडवे येथेही मोफत तांदूळाचे वाटप प्रवरा साखर कारखान्याचे संचालक संपतराव चितळकर बाजार समितीचे संचालक मुक्ताजी पटांगरे आण्णासाहेब गेठे यांच्या हस्ते करण्यात आले
Post a Comment