लॉकडाऊनच्या काळातील वेळेचा ग्रामीण महिला करताहेत सदुपयोग।। घरातल्याघरात शेवया, कुरड्या असे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी होत आहे लगबग.

सावळीविहीर। राजेंद्र गडकरी।
 सध्या कोरोना मुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे, त्यामुळे सर्वजण आपल्या घराघरात आहे, अशा परिस्थितीत ग्रामीण भागातआता वाड्या, वस्त्यांवर या लॉकडाऊनच्या बंद काळात महिला वर्गाकडून दरवर्षाप्रमाणे घरातल्याघरात पापड लाटणे, शेवाया करणे, कुरडया करणे, फराळासाठी बटाट्याचे वेफर्स , आदी पदार्थ बनवण्याची कामे घरातील कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन केले जात असल्याचे दिसून येत आहे,   
 तोंडाला मास्क किंवा रूमाल, बांधून व काही अंतराचे बंधन पाळून ही कामे होत असून या लॉकडाऊनकाळात घरातील महिलांना इतर काम नाही म्हणून  घरातील कामे उरकून इतर वेळी  घरातील  सदस्यांना ,मुलांना  बरोबर घेत हे पदार्थ बनवण्याचा  सपाटा लावला असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे,
 सध्या जगभर कोराेनाने हाहाकार माजवला आहे, देशात व राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, सर्वत्र आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे देशभर लॉक डाऊन करण्यात आला आहे, सर्व बंद आहे ,अशा परिस्थितीत सर्वजण आपल्या घरात आहेत, मात्र या लॉकडाऊन काळात ग्रामीण भागात वाड्या-वस्त्यांवर असणाऱ्या, गावापासून काही अंतरावर निवांत आशा वस्त्यांवर, महिला या बंद काळात या वेळचा सदुपयोग करून घेण्यासाठी आपल्या घरातल्या घरात आपल्या घरातील कुटुंबाच्या सदस्यांसह पापड लाटणे किंवा अंगणामध्ये कुरडया, शेवया, फराळाचे पदार्थ आदि दरवर्षाप्रमाणे उन्हाळ्यात करण्यात येणारे हे पदार्थ करण्याकडे जोर देत आहेत, ग्रामीण भागात खेड्यापाड्यात वाड्या-वस्त्यांवर असे कुरडया, पापड ,शेवया करण्याकडे महिलावर्ग दिसून येत आहे, घरातील पुरुष ,शाळा-कॉलेजातील मुले, नोकरदार सर्वजण या बंदमुळे घरीच आहेत, त्यामुळे त्यांची मदत हे घरगुती पदार्थ बनवण्यासाठी घरातील महिलांना होत आहे ,लॉक डाऊन च्या बंद काळात ग्रामीण महिलांनी याकडे अधिक जोर दिला आहे ,अनेक ठिकाणी महिला स्कार्फ किंवा मास्क बांधून घरात हे पदार्थ बनवताना दिसून येत आहेत, त्यामुळे या लॉक डाऊन च्या काळातला वेळही चांगला जात आहे,
 दर वर्षी या काळात कुरडया, पापड ,शेवया घरोघरी बनवले जातात, यंदाही ग्रामीण भागात पण निवांत वस्त्यांवर आपापल्या घरी, अंगणात ते बनवणे सुरू आहे, तसेच सध्या शाळांना सुट्टी असल्यामुळे मुले घरीच आहेत, वस्त्यांवर एकांत राहणारे रहिवाशी निवांत आहेत ,त्यांची मुलेही ही आपल्या अंगणात ग्रामीण खेळ खेळताना दिसतात, गावापासून दूर निवांत वस्तीवर घराच्या अंगणात ,घरातीलच मुले गोटया खेळणे, क्रिकेट खेळणे, आधी दिवसभर टाइमपास करताना दिसतात, या लहान मुलांना लॉकडाऊन किंवा कोरोना याचे काही  सोयरसुतक नाही, अनेकांना काहीही माहिती नाही, मात्र ते खेळात दंग असतात, मात्र हा खेळ आपल्या अंगणातच खेळताना ते दिसतात,
 देश मोठ्या आर्थिक संकटात सापडला असताना, मोठे शहर ठप्प झालेले असताना, शहरापेक्षा ग्रामीण भागात मात्र बहुतांशी कुटुंबातील, घरातील जीवन मात्र सुरळीत सुरू आहे ,आता  लॉक डाऊन संपताच  मोठमोठ्या शहरातील  लोकही  ग्रामीण भागात  येण्यासाठी  इच्छुक आहेत ,असे  ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे,  यातून शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन कसे सुखकर आहे, हे मात्र या लॉकडाऊन ने  नक्की दाखवून दिले आहे,
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget